महागाईविरोधात युवासेनेचे राज्यभर आंदोलन – सरदेसाई

नवी मुंबईत शिवसेनेने सोमवारी दरवाढीविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. 

नवी मुंबई :  केंद्र शासनाने महागाई लादल्याची टीका युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केली. याविरोधात राज्यव्यापी सायकल रॅली युवासेना काढणार आहे. नवी मुंबई शहरातील युवकांनी हे  आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नवी मुंबईत शिवसेनेने सोमवारी दरवाढीविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे.   इतर पक्षातील नेते शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. यामध्ये नवी मुंबई शहरातील बड्या तरुण नेत्यांचा समावेश असल्याचा दावा सरदेसाई यांनी वाशी येथील मेळाव्यात केला.

युवकांच्या आक्रमकतेची चुणूक बघितली आहे. १८ ते ३५ वयोगटातील तरुणांना शिवसेनेकडे खेचून आणू मात्र वरिष्ठांनी साथ द्यावी आमच्याकडे स्पर्धा म्हणून बघू नये. तर युवा पदाधिकारी नेमण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त  केली.

या वेळी उपनेते विजय नाहटा, खासदार राजन विचारे, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर आदी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Statewide agitation of yuvasena against inflation akp

Next Story
‘सही’ रे सई
ताज्या बातम्या