Super 30 first look out: हृतिकच्या ‘सुपर ३०’ चा फर्स्ट लूक पाहिलात का ?

‘सुपर ३०’ ची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर हृतिकने ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

‘सुपर ३०’ या आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये आनंद कुमार यांची भूमिका अभिनेता हृतिक रोशन साकारणार आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.

‘सुपर ३०’ ची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर हृतिकने ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये हृतिक एका वेगळ्याच अंदाजामध्ये झळकला असून त्याच्या डोळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचवण्याची जिद्द दिसून येत आहे. त्यामुळे हा फोटो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

‘सुपर ३०’ या चित्रपटाचं सध्या चित्रीकरण सुरु असून रिलायन्स एन्टटेंन्मेंट आणि फँटम फिल्म्सच्या अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून विकास बहल यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. या चित्रपटामध्ये पाटणा येथील आनंद कुमार यांच्या जीवनसंघर्षाचं चित्रण करण्यात आलं आहे. ‘सुपर ३०’ हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

#Super30

A post shared by HRITHIK ROSHAN TEAM (@hrithikroshanfanatics) on

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Super 30 poster hrithik roshans first look on teachers day