गुप्तधन मिळवून देण्यासाठी ससेमिरा लावणाऱ्या महिलेचा खून केल्याप्रकरणी मांत्रिक असलेल्या संशयित आरोपीला पोलिसांनी शनिवारी एका दिवसात अटक केली. नामदेव शामराव पोवार (वय २४, रा. जोगेवाडी, राधानगरी) असे मांत्रिकाचे नाव आहे.करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील एका शेतात आरती आनंद सामंत (वय ४५, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या महिलेचा खून झाल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता. करवीर पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध घेतल्यानंतर त्यांने गुन्ह्याची कबुली दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरती सामंत हिला घरात गुप्तधन असल्याची स्वप्न पडत होते. त्यासाठी तिने नामदेव पोवारसह काही मांत्रिकांच्या मागे गुप्तधन काढून देण्याचा तगादा लावला होता. हा ससेमिरा वाढत चालल्याने चिडलेल्या संशयित पोवार याने सामंत हिच्या डोक्यात वीट मारून खून केला. तिच्याजवळील पाटल्या, मंगळसूत्र, बांगड्या या सोन्याच्या वस्तू व मोबाईल घेऊन तो पळून गेला होता. पण पोलिसांनी त्याला २४ तासात जेरबंद केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspected sorcerer accused of murdering woman in case of secret money arrested amy
First published on: 01-10-2022 at 21:13 IST