पाणजेत पाचही ठिकाणी भरतीच्या पाण्याला अडथळा कायम

पाणजे पानथळातील भरतीच्या पाण्याला वाट करून देत प्रवाह सुरळीत केल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हरित लवादाला दिली आहे.

प्रवाह सुरळीत नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल केल्याची ‘नॅट कनेक्ट’ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई : पाणजे पानथळातील भरतीच्या पाण्याला वाट करून देत प्रवाह सुरळीत केल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हरित लवादाला दिली आहे. मात्र तसे झालेले नसून जिल्हाधिकाऱ्यांकडून दिशाभूल करण्यात आल्याचे नॅट कनेक्टचे संचालक बी.एन. कुमार यांचे म्हणणे असून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

पाणजे येथे सुमारे २८९ पाणथळ क्षेत्र असून पाच ठिकाणी भरतीच्या पाण्याला अटकाव करण्यात आला आहे. नॅट कनेक्ट आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान यांच्या वतीने याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करीत या जागेवर बांधकाम करण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांनी पर्यावरण विभागाला लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या होत्या. नोव्हेंबर २०२० मध्ये विभागाचे संचालक नरेंद्र टोके यांनी पाण्याचे बुजवण्यात आलेले मार्ग खुले करण्याचे आदेश सिडको तसेच रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. या तक्रारींची दखल घेत भरतीच्या पाण्याची बुजविण्यात आलेली वाट मोकळी केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय हरित लवादाला कळवले होते.  पाणथळ क्षेत्राला जोडण्यात आलेले ७० कालवे वर उचलण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात पाच ठिकाणी भरतीच्या पाण्याला करण्यात आलेला अटकाव मार्ग मोकळा करण्यात आलेला नाही. तसेच  सुरक्षारक्षकांचे दालनही हटविले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी  खोटी माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल केली आहे, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे बी.एन कुमार यांनी सांगितले.

सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी पाच ठिकाणी भरतीच्या पाण्याला कलेला अटकाव मोकळा केला असून पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल अशी माहिती दिली होती. परंतु बुधवारी आमच्या विभागाने प्रत्यक्ष पाहणी केली असता पाचही ठिकाणाचे अडथळे हटविले नाहीत. त्यामुळे याबाबत आता मुख्यमंत्री यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बी एन कुमार, संचालक, नॅट कनेक्ट

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tidal water continues blocked ysh

Next Story
मलेरिया, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज
ताज्या बातम्या