scorecardresearch

पुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल

मेट्रोच्या कामासाठी येरवड्यातील पर्णकुटी चौकात ६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान रात्री ११ ते पहाटे सहा या वेळेत वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

पुणे : मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल
( संग्रहित छायचित्र )

मेट्रोच्या कामासाठी येरवड्यातील पर्णकुटी चौकात ६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान रात्री ११ ते पहाटे सहा या वेळेत वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
येरवड्यातील पर्णकुटी चौकात मेट्रो मार्गिकेवर गर्डर (ढाचा) टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. येरवड्यातील सादलबाबा चौकाकडून पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार एनसीसीचे प्रशिक्षण

६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान रात्री १ ते पहाटे सहा या वेळेत पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्क जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.वाहनचालकांनी सादलबाबा चौक, तारकेश्वर चौक, पर्णकुटी चौकातून गुंजन चौकातून उजवीकडे वळून पर्णकुटी चौकात जावे. तेथून डावीकडे वळून वाहनचालकांनी कोरेगाव पार्ककडे जावे.

मराठीतील सर्व Uncategorized ( Uncategorized ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-10-2022 at 22:23 IST

संबंधित बातम्या