महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जे कृत्य केलं ते पाहून कुणालाही त्यांचा अभिमान वाटेल. आज कॅबिनेटच्या बैठकीत जाण्यासाठी जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी कार स्वतः चालवली आणि ते बैठकीत पोहचले. करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या चालकाला सुट्टी दिली. यासंदर्भातला एक व्हिडीओ समोर आला आहे. करोनाचे महाराष्ट्रातले रुग्ण वाढत आहेत. एकट्या मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ४९० च्या वर गेली आहे. तसंच मातोश्री परिसरातही एक रुग्ण करोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मातोश्रीच्या आसपासचा परिसरही सील करण्यात आला आहे. अशात आज उद्धव ठाकरे यांनी कार स्वतः चालवली आणि ते कॅबिनेटच्या बैठकीत पोहचले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशभरात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ४ हजार ४०० वर ही संख्या पोहचली आहे. अशात महाराष्ट्रातही करोनाचे रुग्ण वाढले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी करोनाचे हॉटस्पॉटही ठरवण्यात आले आहेत. ज्या परिसरात करोनाचा रुग्ण आढळतो तो सीलही करण्यात येतो. अशा सगळ्या उपाय योजना सुरु आहेतच. मात्र आता मातोश्री परिसरातही एका चहावाल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार चालकाला सुट्टी दिली आणि ते स्वतः कार चालवत कॅबिनेटच्या बैठकीला गेले. ही बाब निश्चितच कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray drive his car and went to cabinet meeting gave holiday to his driver due to corona virus scj
First published on: 07-04-2020 at 16:49 IST