ब्यूटी क्वीन आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही इस्रायल दौऱ्यावर आहे. दरम्यान तिने इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. त्यावेळी तिने त्यांना भगवत गीता भेट म्हणून दिली आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर माजी पंतप्रधान बेंजामिन यांच्या सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने, ‘इस्रायलच्या माजी पंतप्रधानांने मनापासून आभार. मला आणि माझ्या कुटुंबीयांना बोलावल्याबद्दल तुमचे आभार’ असे तिने म्हटले आहे. पुढे तिने भगवत गीतेचा उल्लेख करत म्हटले, ‘माझी भगवत गीत: योग्य व्यक्तीला योग्य वेळी चांगल्या मनाने एखादी भेट दिली आणि त्या बदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही तर ती भेट नेहमी लक्षात राहते.’
आणखी वाचा : चेंजिंग रुमध्ये ठेवला गुपचूप कॅमेरा; मैत्रीणीचा न्यूड व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्रीला अटक

उर्वशी मिस यूनिवर्स २०२१ या स्पर्धेनिमित्त इस्रायलला गेली होती. तिला या स्पर्धेची परिक्षक म्हणून बोलावण्यात आले होते. तिने २०१५मध्ये मिस यूनिवर्स स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले होते. आता याच स्पर्धेत ती परिक्षक म्हणून दिसली आहे.

काही दिवसांपूर्वी उर्वशीचा वर्जिन भानुप्रिया हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यापूर्वी तिने भाग जॉनी, सनम रे, ग्रेट ग्रँड मस्ती, काबिल, हेट स्टोरी 4, पागलपंती या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले.