पुणे : करोनाची दुसरी लाट ओसरल्याने राज्य शासनाने बहुतांश निर्बंध शिथिल के ले आहेत. त्यामुळे आगामी हिवाळी पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र पर्यटन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागाने पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर के ल्या आहेत. दरम्यान, निर्बंध शिथिल के ले असले, तरी अद्याप पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. त्यामुळे के वळ निसर्गाच्या सान्निध्यात निवास करण्यासाठी महामंडळाची सर्व निवासस्थाने खुली आहेत.

गेल्या दीड वर्षांपासून करोनामुळे टाळेबंदी, विविध निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या पर्यटकांना मनमोकळे पर्यटन करण्याला मर्यादा आहेत. मात्र, घरी बसून कं टाळलेल्या पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात निवास करण्यास परवानगी आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळाने विविध सवलती जाहीर के ल्या आहेत. महामंडळाची पुणे विभागातील सर्व निवासस्थाने सुरू असून  http://www.mtdc.co  या संकेतस्थळावर ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आले आहे.

याबाबत बोलताना महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, ‘करोना नियंत्रणात राहिल्यास ऑक्टोबरपासून पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू होणार आहे. दरवर्षी गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या सुट्यांसाठी नोकरदार वर्ग आणि पर्यटन व्यावसायिक पर्यटनाचे नियोजन करतात. करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देताना निवासस्थानांची संपूर्ण स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. निवासस्थानी येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून गरज भासल्यास पर्यटकांच्या मागणीनुसार पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच शरीर तापमान मोजणारी यंत्रणा, जंतुनाशकाची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे. महामंडळाच्या बहुतांश कर्मचाऱ्यांचे लसीकरणही पूर्ण करण्यात आले आहे.’

जाहीर के लेल्या सवलती…ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी, आजी-माजी सैनिक आणि शारीरिक विकलांग नागरिकांसाठी आगाऊ आरक्षण करताना विशेष सवलत देण्यात येत आहे. खोल्यांचे समूह आरक्षण (२० खोल्यांपेक्षा जास्त) के ल्यासही सवलत दिली जात आहे. तसेच निवासस्थानी मोफत न्याहारीची सुविधा जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून लग्नापूर्वीचे छायाचित्रण आणि विवाह सोहळ्यांची सोयही पर्यटक निवासस्थानी करण्यात येत आहे. पर्यटकांसाठी ‘वर्क फ्रॉम नेचर’ आणि ‘वर्क विथ नेचर’ या संकल्पनेंतर्गत काही निवासस्थानी वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे, असेही हरणे यांनी सांगितले.