चार महानगरपालिकेतील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबरला मतदान

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ पर्यंत असेल.

voting new
(प्रातिनिधिक छायचित्र)

मुंबई : धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान तर, २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारले जातील. ५ डिसेंबर २०२१ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ डिसेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल.

नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना १० डिसेंबर २०२१ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २२ डिसेंबर २०२१ रोजी होईल.

पोटनिवडणूक होत असलेली महानगरपालिकानिहाय रिक्तपदे – धुळे- ५ब,  अहमदनगर-९क, नांदेड वाघाळा- १३अ आणि सांगली मिरज कुपवाड- १६अ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Voting for the by elections of vacant posts in four municipal corporations on 21st december srk

Next Story
रुपगर्वितेचे ‘इंग्लिश व्हिंग्लीश’