Xiaomi आपली नवीन स्मार्टफोन लाइनअप Redmi K60 सीरीज लवकरच सादर करणार आहे. एका चायनीज टिपस्टरने आगामी Redmi K60 मालिकेच्या स्मार्टफोनची काही वैशिष्ट्ये सुचवली आहेत. जी या मालिकेच्या प्रोसेसर आणि चार्जिंग गतीबद्दल माहिती देते. Snapdragon 8 सीरीज चिपसेट Redmi K60 सीरीजमध्ये उपलब्ध असेल. लाइनअपमध्ये दोन उपकरणे असतील, ज्याचा चार्जिंग वेग वेगळा असेल. पहिल्या मॉडेलला ६७W वायर्ड चार्जिंगसह ३०W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल आणि दुसऱ्या मॉडेलला १२०W वायर्ड चार्जिंगसह ३०W वायरलेस चार्जिंगसाठी सपोर्ट मिळेल.

Redmi K60 मालिकेची वैशिष्ट्ये

चीनी मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने Xiaomi च्या पुढील स्मार्टफोन लाइनअप Redmi K६० मालिकेची वैशिष्ट्ये लीक केली आहेत. ही लाइनअप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ सीरीज चिपसेटसह सुसज्ज असेल. Redmi K60 सीरीजमध्ये दोन डिवाइस असतील. या उपकरणाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये १४४Hz स्क्रीन समाविष्ट आहे, जी डॉल्बी व्हिजन आणि HDR१० सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.

आणखी वाचा : अर्रर…POCO F5 बाजारात येण्यापूर्वीच लीक; स्मार्टफोनच्या डिस्प्ले आणि प्रोसेसरबद्दल माहिती झाली उघड

कॅमेरा

Redmi K60 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स आधीच लीक झाले आहेत. Redmi K60 मॉडेल्समध्ये २K स्क्रीन आढळू शकते, ज्याच्या टॉप-सेंटरमध्ये पंच-होल असेल. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आढळू शकतो. अहवालानुसार, हा स्मार्टफोन लाइनअप ५०MP प्राथमिक कॅमेराला सपोर्ट करेल, जो Sony IMX766 सेन्सर असू शकतो.

किंमत

नवीन Redmi K60 मालिका कंपनीच्या Redmi K50 लाइनअपची उत्तराधिकारी असेल. भारतात, कंपनीने Redmi K50i स्मार्टफोन सादर केला आहे, जो MediaTek Dimensity ८१०० प्रोसेसरने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन २४,९९९ रुपयांपासून सुरू होतो.