एमपीएससी : १९२० ते १९४७ गांधी युग भाग – ३
पहिली गोलमेज परिषद- १२ नोव्हें. १९३० ते १९ जाने. १९३१ या कालखंडात लंडन येथे पहिली गोलमेज परिषद भरविण्यात आली. मात्र या गोलमेज परिषदेत काँग्रेसने भाग घेतला नाही. पहिली गोलमेज परिषद काही निष्पन्नाशिवायच पार पडली, कारण भारतीय घटनात्मक प्रश्नांवर कोणतीही चर्चा काँग्रेस प्रतिनिधींच्या गरहजेरीत निर्थक आहे याची जाणीव इंग्रजांना होती. त्यामुळे ही परिषद निष्फळ ठरली. रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी व्हाईसरॉय आयर्वनि यांना राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांबरोबर वाटाघाटी करण्याचा अधिकार दिला व या चच्रेतून गांधी-आयर्वनि करार घडून आला.
गांधी-आयर्वनि करार- पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांच्या सूचनेनुसार महात्मा गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहावे म्हणून व्हाईसरॉय आयर्वनिनी गांधीजींबरोबर बोलणी सुरू केली. गांधीजींबरोबर वाटाघाटी सुकर व्हाव्यात म्हणून गांधीजींव्यतिरिक्त इतर अनेक नेत्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले. ५ मार्च १९३१ रोजी गांधीजी व आयर्वनि यांच्यात करार झाला या करारानुसार गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली. इंग्लंड येथे होणाऱ्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर राहण्याचे गांधीजींनी मान्य केले. सविनय कायदेभंग आंदोलनात अटक करण्यात आलेल्या सत्याग्रहींना शासनाने मुक्त करण्यात यावे अशी अट घालण्यात आली.
दुसरी गोलमेज परिषद- ७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ या कालावधीत लंडन येथे दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला ब्रिटिश सरकारचे, भारतातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, भारतीय संस्थानांचे प्रतिनिधी असे मिळून एकंदर १०७ प्रतिनिधी उपस्थित होते. गांधी-आयर्वनि करारात ठरल्याप्रमाणे काँग्रेसने या परिषदेत भाग घेतला होता. काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी परिषदेत उपस्थित राहिले.
जातीय निवाडा- काँग्रेसने सुरू केलेल्या सविनय कायदेभंगाची चळवळ दुबळी करण्यासाठी तसेच जातीय निवाडय़ाच्या आधारे फूट पाडता यावी यासाठी इंग्रज सरकारने जातीय निवाडा जाहीर केला. १७ ऑगस्ट १९३२ रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड याने जातीय निवाडा जाहीर केला. या निवाडय़ाने कायदे मंडळातील प्रतिनिधित्वासाठी भारतीय समाजाचे जातीय तत्त्वांवर एकूण सतरा विभाग पाडण्यात आले होते. त्याअंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, युरोपियन, अस्पृश्य अशा प्रत्येक अल्पसंख्याक गटाला कायदे मंडळात राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. तसेच प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली होती.
पुणे करार ( २४ सप्टेंबर १९३२)- गांधीजींचा जातीय निवाडय़ास तीव्र विरोध होता म्हणून २० सप्टेंबर १९३२ रोजी त्यांनी प्राणांतिक उपोषणास सुरुवात केली. २४ सप्टेंबर १९३२ रोजी गांधी- आंबेडकर करार झाला. हा करार पुण्याच्या येरवडा तुरुंगात झाला म्हणून त्यास ‘पुणे करार’ म्हटले जाते. या करारान्वये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव १४८ जागांसाठी काँग्रेसची मान्यता मिळाली. २६ सप्टेंबर १९३२ला गांधीजींनी उपोषण सोडले.
    पुणे कराराची फलनिष्पत्ती म्हणजे यानंतरच्या काळात महात्मा गांधींनी अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याला विशेष प्राधान्य दिले.
तिसरी गोलमेज परिषद (१९३२)- भारताच्या घटनात्मक प्रश्नांवर विचार करण्यासाठी आयोजित केलेल्या पहिल्या व दुसऱ्या गोलमेज परिषदांत कोणताही निर्णय घेता आला नव्हता, त्यामुळे ब्रिटिश सरकारने १७ नोव्हेंबर १९३२ ते २४ डिसेंबर १९३२ या कालावधीत तिसरी गोलमेज परिषद भरविली. या परिषदेला काँग्रेसचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. तिसऱ्या गोलमेज परिषदेने भारतासाठी नवी घटना तयार करण्यासंबंधी एक योजना तयार केली. त्या आधारे ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा संमत केला. हाच इ.स. १९३५चा भारत सरकारविषयक कायदा होय.
१९३५चा भारतविषयक कायदा- ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या १९३५च्या भारत सरकारविषयक कायद्यात भारतीय संघराज्याच्या निर्मितीची व प्रांतिक स्वायत्ततेची तरतूद करण्यात आलेली होती, परंतु भारतीय संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिल्याने संघराज्याची योजना प्रत्यक्षात उतरू शकली नाही. त्यामुळे प्रांतिक स्वायत्तता हेच या कायद्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ बनून राहिले. या कायद्याची वैशिष्टय़े खालीलप्रमाणे-
१)    या कायद्याने िहदुस्थानात ब्रिटिश इंडियाचे प्रांत आणि संस्थाने यांचे एक संघराज्य स्थापन करण्याची व्यवस्था केली होती.
२)    राज्यकारभाराची केंद्रीय, प्रांतीय, संयुक्त किंवा समवर्ती अशी विभागणी करण्यात आली.
३)    १९१९च्या कायद्याने प्रांतीय शासनात सुरू केलेली द्विदल शासन पद्धती १९३५च्या कायद्याने नष्ट करून ती केंद्रासाठी लागू केली.
४)    १९३५च्या कायद्याने केंद्रासाठी द्विगृही विधिमंडळ स्थापन करण्याची व्यवस्था केली होती. उच्च गृहास संघीय राज्यसभा कनिष्ठ गृहाला संघीय विधानसभा असे म्हणतात.
५)    १९३५च्या कायद्याने प्रांतातील द्विदल शासन पद्धती समाप्त करण्यात येऊन प्रांतांना स्वायत्तता प्रदान करण्यात आली.
६)    १९३५च्या कायद्याने भारतासाठी संघराज्य न्यायालय व रिझव्‍‌र्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
७)    ब्रह्मदेश भारतापासून वेगळा करण्यात आला. सिंध व ओरिसा हे नवे प्रांत निर्माण करण्यात आले.
८)    हा कायदा िहदुस्थानच्या राजकीय व घटनात्मक चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
    १९३५च्या कायद्याचे वर्णन पंडित जवाहरलाल नेहरूंनी मजबूत ब्रेक असलेली, परंतु इंजिन नसलेली गाडी असे केलेले आहे.
यूपीएससी : यू.पी.एस.सी. सी सॅट (पेपर-२)
    यू.पी.एस.सी. ‘सी सॅट पेपर २’ मध्ये आकलनाबरोबरच काही प्रश्न मूलभूत संख्याज्ञानशी संबंधित असतात. या प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी सराव करावा. काही विद्यार्थ्यांच्या मनात असा समज असतो की, सी सॅट पेपर २ म्हणजे मूलभूत संख्याज्ञानाचा पेपर; मात्र तो योग्य नाही. गेल्या तीन परीक्षेंचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते की, आकलन या उपघटकांवर जास्त उपप्रश्न विचारले जातात. त्याखालोखाल, व्हर्बल- नॉन व्हर्बल रिजिनग (बुध्दिमत्ता) तसेच गणित या उपघटकांवर काही उपप्रश्न आधारित असतात. मूलभूत संख्याज्ञान या उपघटकांवर जरी प्रश्न कमी असले तरी विद्यार्थ्यांनी या घटकांवर नियमित सराव करावा, कारण या उपघटकांवर कमीत कमी वेळेत पूर्ण गुण मिळणे शक्य असते. साधारणत: मूलभूत संख्याज्ञान या उपघटकांतर्गत परीक्षार्थीनी काळ, काम, वेग यांवरील उदाहरणे शेकडेवारी, सरासरी, वयांवरील उदाहरणे, तसेच बोटींशीं संबंधित उदाहरणे, लसावि- मसावि व जर शक्य झालेच तर मांडणी व जुळवणी (तसेच संभाव्यता) याचा अभ्यास करावा. आज आपण वेग व आगगाडींशी संबंधित उदाहरणे पाहणार आहोत.
वेगावरील उदाहरणे सोडवितांना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत.
१)    किमी / तासाचे रूपांतर मीटर / सेकंद मध्ये करतांना ५/१८ ने गुणावे.
२)    मीटर / सेकंदाचे रुपांतर किमी./ तासामध्ये करताना १८/५ ने गुणावे.
३)    जर दोन रेल्वेंची दिशा एकमेंकांच्या विरूध्द बाजूने असेल त्यावेळी वेगांची बेरीज करावी. (सापेक्ष वेग)
४)    जर दोन रेल्वेची दिशा समान दिशेने असेल त्या वेळी वेगांची वजाबाकी करावी. (सापेक्ष वेग)
५)    वेगांशी संबंधित उदाहरणे सोडवितांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकक हे एकाच पध्दतीत असणे आवश्यक असते. (टङर  किंवा उॅर)
सूत्र : अंतर = वेग x वेळ
सरावासाठी उदाहरणे :-
१)    एक रेल्वे ७२ किमी पर तास या वेगाने एका खांबाला २० सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी सांगा.
१) ४०० मीटर   २) ५०० मीटर   ३) ६०० मीटर  ४) ७०० मीटर
उत्तर : ७२ किमी पर तास
    ७२ x  ५ १८ = २० मी./सेकंद
म्हणून अंतर = वेग x वेळ  म्हणेजच २० मी/सेकंद
x  २० सेकंद = ४०० मीटर
याठिकाणी अंतर म्हणजे रेल्वेची लांबी = ४०० मीटर होय.
२)    २०० मी. लांबीची रेल्वे ५०० मी. लांबीच्या पुलाला ९० किमी/ तास गेल्यास किती वेळात ओलांडेल?
    १) ३० सेकंद  २) ४० सेकंद  ३) ५० सेकंद   ४) २८ सेकंद
उत्तर : रेल्वेची लांबी , पुलाची लांबी ५०० मीटर  ज्यावेळी रेल्वेची लांबी व पुलाची लांबी किंवा रेल्वेची लांबी व प्लॅटफॉर्मची लांबी दिलेली असेल तेव्हा
रेल्वेने कापलेले अंतर = रेल्वेची लांबी + पुलाची लांबी   
म्हणून रेल्वेने कापलेले अंतर = २०० + ५०० = ७०० मी.        
वेग = दिलेला आहे (९० कि.मी.)
म्हणून मी. पर सेकंद काढण्यासाठी ९० x   ५ १८     
वेग    = २५ मीटर पर सेकंद
अंतर    = वेग x वेळ
७०० मीटर    = २५ मीटर पर सेकंद x वेग
म्हणून वेग    = ७०० मीटर / २५ मीटर पर सेकंद = २८ सेकंद
उत्तर : २८ सेकंद
३)    ४५० मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्यातून ९० किमी/तास वेगाने गेल्यास १ मिनिट १२ सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी सांगा?
    १) १४०० मी. २) १५०० मी. ३) १४५० मी. ४) १३५० मीटर
उत्तर : बोगद्याची लांबी = क्ष मानू
रेल्वेची लांबी = ४५० मीटर
वेग = ९० किमी/तास = ९० x  ५ १८ = २५ मीटर/सेकंद
वेळ = १ मिनिट १२ सेकंद = ७२ सेकंद
म्हणून अंतर    = रेल्वेची लांबी + बोगद्याची लांबी = ४५० + क्ष
अंतर    = वेग x वेळ
क्ष + ४५०    = २५ मी/सेकंद x ७२ सेकंद
क्ष + ४५०    = १८००
म्हणून १८०० – ४५०    = १३५० मीटर
बोगद्याची लांबी    = १३५० मीटर
४)    २०० मीटर आणि १०० मीटर लांबीच्या दोन ट्रेन समांतर रूळावरून ३५ किमी/ तास व २५ किमी/तास या वेगाने एकमेकांच्या विरूध्द दिशेने जात असतील तर त्या एकमेकांना केव्हा ओलांडतील?
    १) १८ सेकंद  २) १९ सेकंद  ३) २० सेकंद  ४) २२ सेकंद
उत्तर : एकूण अंतर = २०० + १०० = ३०० मीटर
सापेक्ष = ३५ + २५  = ६० किमी/तास
(रेल्वे एकमेकांच्या विरूध्द जात आहे म्हणून वेगांची बेरीज)
६० x  ५/१८ = ३००/१८
अंतर = वेग x वेळ
    ३००        १८
वेळ = अंतर/वेग =        = ३०० x        = १८ सेकंद
     ३००/१८        ३००
५) १५० मीटर आणि ५० मीटर लांबीच्या ट्रेन समांतर रूळावरून अनुक्रमे ३५ किमी/तास आणि ३० किमी/ तास या वेगाने जात आहे. जर त्या ट्रेन एकाच दिशेने धावत असतील तर त्या एकमेकांना केव्हा ओलांडतील ?

 १) १५० सेकंद २) १५५ सेकंद ३) १४४ सेकंद  ४) १३३ सेकंद
                                         ——–
उत्तर
अंतर = १५० + ५० = २०० मीटर
 रेल्वे एकाच दिशेने धावत आहे म्हणजे त्यांचा सापेक्ष वेग = ३५-५ किमी./ तास
५ ७ ५ / १८=२५ / १८ मी./ सेकंद
      अंतर    २००    18
 म्हणून वेळ =   वेग    सेकंद

Congress, Tribute, Ashok Chavan, wardha congress committee
अशोक चव्हाण यांना श्रद्धांजली? काँग्रेस कार्यालयात धक्कादायक…
prakash ambedkar
लोकसभा निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा; म्हणाले, “पक्ष फोडून…”
pm Modi Yavatmal
पंतप्रधानांची यवतमाळमध्ये सभा, पोलिसांनी कशासाठी बजावली नोटीस?
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?