कृषी-उद्योगांच्या विकासामध्ये आणि वाढीमध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मनुष्यबळाचा मोठा हातभार लागतो. या अभ्यासक्रमामध्ये सर्वसाधारणत: व्यवस्थापनाची मूलतत्त्वे, व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, व्यवस्थापकीय संवादकौशल्य, कृषी व्यापार आणि ग्रामीण विपणन, पुरवठा-साखळी व्यवस्थापन, कृषीमालाचा भाव, जोखीम व्यवस्थापन, कृषी-वित्तपुरवठा व्यवस्थापन, बी-बियाणे तंत्रज्ञान आणि औद्योगिक वापर, कीटकनाशके आणि कीड नियंत्रण व्यवस्थापन, आयात-निर्यात कार्यपद्धती, कापणीपश्चात निर्मिती व्यवस्थापन, बाजार परिस्थितीचे संशोधन, धोरण आणि व्यूहात्मक व्यवस्थापन, वित्तीय व्यवस्थापन, ग्रामीण वित्तपुरवठा, उद्योजकता विकास, कृषी सहकारी संस्थांचे व्यवस्थापन, विक्री आणि वितरण व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय विपणन, सेवा व्यवस्थापन, एकात्मिक विपणन, संवाद प्रक्रिया, मनुष्यबळ विकास, कामगार कायदे, अंमलबजावणीचे व्यवस्थापन,
ई-कॉमर्स, व्यवस्थापनातील आधुनिक प्रवाह, कृषीजन्य उत्पादनातील आंतराष्ट्रीय व्यापार संधी, ब्रँड व्यवस्थापन, ग्रामीण बँका, विमा व्यवस्थापन, औद्योगिक संबंध आणि कामगार कल्याण आदी विषयांचा समावेश असतो.
करिअर संधी
कृषी प्रक्रिया उद्योग, पुरवठा साखळी व्यवस्थापन, कृषी उपकरण निर्मिती, कृषी- सहकारी संस्था, कृषी वित्तपुरवठा करणाऱ्या बँका, दुग्धनिर्मिती आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, गोडे तेल निर्मिती उद्योग, बियाणे- खते, कीटकनाशके निर्मिती उद्योगात करिअर संधी मिळू शकते.
शैक्षणिक संस्था
*इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट- अहमदाबाद : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅग्रिबिझनेस मॅनेजमेंट- कालावधी- दोन वष्रे. अर्हता- ५० टक्के गुणांसह कृषी किंवा संबंधित विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील पदवी/ पदव्युत्तर पदवी. ऑनलाइन भरून द्यावा लागणारा अर्ज संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निवड- CAT- कॉमन एन्ट्रन्स टेस्ट/ मुलाखत/ समूह चच्रेद्वारे.
    ईमेल- pgpabm@iimahd.ernet.in
    वेबसाइट- www. iimahd.ernet.in
*नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट, तेलंगणा : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅग्रिबिझनेस मॅनेजमेंट- कालावधी- दोन वष्रे आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅग्रिकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट. कालावधी- एक वर्ष. अर्हता- कृषी आणि तत्सम विषयातील पदवीधर आणि कृषीउद्योजक.
    ईमेल- dgmanage@manage.gov.in
    वेबसाइट-  http://www.manage.gove.in
*इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ प्लॅन्टेशन मॅनेजमेंट, बेंगळुरू :
    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट- अ‍ॅग्रिबिझनेस अ‍ॅण्ड प्लान्टेशन मॅनेजमेंट. कालावधी- दोन वर्षे. हा निवासी पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. अर्हता- कृषी किंवा फलोद्यान किंवा पशुवैद्यक किंवा फॉरेस्ट्री किंवा सेरिकल्चरसह कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण आवश्यक. प्रवेशासाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्टमार्फत घेण्यात येणारी कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट किंवा मॅनेजमेन्ट अ‍ॅप्टिटय़ुड टेस्ट किंवा कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट या परीक्षा देऊन योग्य गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.  
    ईमेल- admissions_iipmb@vsnl.net
    किंवा admissions@iipmb.edu.in
    वेबसाइट- http://www.iipmb.edu.in
*महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे : राज्यातील कृषी विद्यापीठांमधील महाविद्यालयांमध्ये बीबीए इन अ‍ॅग्रिकल्चर हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कालावधी- चार वष्रे. अर्हता- भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ इंग्रजी या विषयांसह बारावी उत्तीर्ण जीवशास्त्र किंवा गणित विषय न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या विषयाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येतो. मात्र, अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने ठरवलेला जीवशास्त्र किंवा गणिताचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
*काही महाविद्यालये :
    =    डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी, पुणे- ४११०४४.   
    =    राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, वििलग्डन कॉलेज परिसर, सांगली.
    =    कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, चंदनापुरी घाट, गुंजाळवाडी, ता- संगमनेर, जिल्हा- अहमदनगर.
    =    कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लोणी,
ता- राहता, जि- अहदनगर.
    =    कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सरस्वतीनगर, मुंबई-आग्रा रोड, पंचवटी, नाशिक- ४२२००३.
    =    कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, शारदानगर, बारामती- ४११०१५.
    =    कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, प्लॉट क्रमांक पी-७, अतिरिक्त एमआयडीसी, हरंगूळ, बार्शी रोड, लातूर. वेबसाइट-  maha-agriadmission.in/
         http://www.macer.org
*एमबीए (कृषी) : अर्हता- बीएस्सी-कृषी/ बीबीए-कृषी/ बीएस्सी- कृषी व्यवसाय व्यवस्थापन/ बीएस्सी- कृषी जैवतंत्रज्ञान/ बीएस्सी-उद्यान विद्या/ बीएस्सी- वनशास्त्र/ बी.एफएस्सी- फिशरीज/ बी.टेक- अन्नतंत्रज्ञान.
*गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅग्रिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट. कालावधी- दोन वष्रे. पत्ता- मुंबई विद्यापीठ, सांताक्रुझ (पूर्व).
    वेबसाइट- http://www.giced.edu.in
    ईमेल- garware@giced.mu.ac.in
*मिटकॉन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅग्रिकल्चरल बिझनेस. अर्हता- कृषी/ कृषी अभियांत्रिकी/ कृषी रसायने/ दुग्धशास्त्र- तंत्रज्ञान/ फिशरीज/ खाद्यान्न शास्त्र/ वनशास्त्र/ गृहविज्ञान/ पशुवैद्यकीय/ फलोद्यान यांपकी कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वष्रे. पत्ता- बालेवाडी, पुणे.
    ईमेल- info@mitcon.edu.in
    वेबसाइट- www. mitcon.edu.in
*आणंद अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हर्सटिी : एमबीए इन इंटरनॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल बिझनेस. कालावधी- दोन वष्रे.   
    ईमेल- iabmi@aau.in वेबसाइट- http://www.aau.in
*वुई स्कूल : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मॅनेजमेंट इन
    अ‍ॅग्रि- बिझनेस मॅनेजमेंट.
    कालावधी- ११ महिने/ अर्धवेळ. वेलिंगकर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेन्ट, माटुंगा, मुंबई.  
    ईमेल- pgdmdlp@welingkarmail.org
वेबसाइट- http://www.welingkaronline.org
नया है यह!
शॉर्ट टर्म कोर्स इन सायबर क्राइम अ‍ॅण्ड सायबर फोरेन्सिक : हा अभ्यासक्रम नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत सुरू करण्यात आला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. कालावधी- चार महिने. अर्हता- इलेक्ट्रॉनिक्स विषयात आयटीआय/ पदविका/ बीई किंवा एम.एस्सी. पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
वेबसाइट- aurangabad@nielit.gove.in,
ईमेल- dir- aurangabad @nielit.gove.in

Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
idea of ​​educational institutes
बीबीए, बीसीएबाबत शिक्षण संस्थांची नवी शक्कल… होणार काय?
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती