सांख्यिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल.
देशातील अत्यंत महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट या संस्थेचा समावेश होतो. १९३१ च्या सुमारास स्थापन झालेली ही संस्था सांख्यिकीशास्त्रातील शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधनाला वाहिलेली जगातील एक दर्जेदार संस्था म्हणून प्रतिष्ठित झाली आहे. सांख्यिकीशास्त्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे.  
शिष्यवृत्तीसह पदवी : ६ बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स (ऑनर्स): अर्हता- बारावी (गणित, इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र), कालावधी- तीन वर्षे. शिष्यवृत्ती- दरमहा तीन हजार रु. हा अभ्यासक्रम कोलकाता येथील कॅम्पसमध्ये करता येतो.
* बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स): अर्हता- बारावी (गणित, इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र), कालावधी- तीन वर्षे. शिष्यवृत्ती- दरमहा तीन हजार रु. हा अभ्यासक्रम बेंगळुरु येथील कॅम्पसमध्ये करता येतो.
प्रवेश परीक्षा : या अभ्यासक्रमांच्या निवडीसाठी साधारणत: मे महिन्यात प्रवेश परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते. राज्यातील परीक्षा केंद्रे- पुणे, नागपूर आणि मुंबई. इंडियन नॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाडमध्ये विजेत्यांना दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही. त्यांना फक्त मुलाखतच द्यावी लागेल. मात्र त्यांना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. या परीक्षेत बारावीच्या गणितावर आधारित वस्तुनिष्ठ पद्धतीचे आणि लघुत्तरी प्रश्न विचारले जातील.
पदव्युत्तर अभ्यासक्रम- संस्थेच्या पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स : अर्हता- इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूटमधून घेतलेली बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स (ऑनर्स) किंवा बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स), कालावधी- दोन वर्षे, शिष्यवृत्ती- दरमहा पाच हजार रुपये. हा अभ्यासक्रम संस्थेच्या दिल्ली आणि चेन्नई कॅम्पसमध्ये करता येतो.
मास्टर ऑफ मॅथेमॅटिक्स : अर्हता- या संस्थेतून घेतलेली बी.स्टॅट (ऑनर्स) किंवा बी.मॅथ्स (ऑनर्स) किंवा गणित या विषयासह गणित किंवा बीई. कालावधी- दोन वर्षे, शिष्यवृत्ती- दरमहा पाच हजार रु. हा अभ्यासक्रम कोलकातामध्ये करता येतो.
 एम.एस्सी इन क्वॉन्टिटेटिव्ह इकॉनॉमिक्स : अर्हता- बी.स्टॅट (ऑनर्स)/ बी.मॅथ्स (ऑनर्स)/ अर्थशास्त्र/ भौतिकशास्त्र/ अभियांत्रिकी पदवी. कालावधी- दोन वर्षे, शिष्यवृत्ती- दरमहा पाच हजार रु. हा अभ्यासक्रम कोलकाता आणि दिल्ली येथे करता येतो.
 एम. टेक् इन क्वॉलिटी मॅनेजमेंट सायन्स : अर्हता- बी.स्टॅट (ऑनर्स)/ बी.मॅथ्स. (ऑनर्स)/ अर्थशास्त्र / भौतिकशास्त्र या विषयातील पदवी. कालावधी- दोन वर्षे. शिष्यवृत्ती- दरमहा पाच हजार रु. हा अभ्यासक्रम बेंगळुरू, हैदराबाद येथे करता येतो.
 एम.टेक्. इन कॉम्प्युटर सायन्स : अर्हता- मास्टर ऑफ मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक्स किंवा फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन/ बॅचलर डिग्री इन इंजिनीअरिंग/ टेक्नालॉजी, कालावधी- दोन वर्षे, शिष्यवृत्ती- दरमहा आठ हजार रु. हा अभ्यासक्रम कोलकाता येथे करता येतो.
 एम.एस्सी इन लायब्ररी सायन्स अ‍ॅण्ड इन्फर्मेशन सायन्स : अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वर्षे, शिष्यवृत्ती- दरमहा पाच हजार रु. हा अभ्यासक्रम बेंगळुरू येथे
करता येतो.
 एम.टेक्. इन क्वालिटी, रिलॅअबिलिटी अँड ऑपरेशन रिसर्च  अर्हता- मास्टर ऑफ मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/ अर्थशास्त्र/ भौतिकशास्त्र. कालावधी- दोन वर्षे. शिष्यवृत्ती- दरमहा आठ  हजार रु. हा अभ्यासक्रम कोलकाता येथे करता येतो.
ज्युनिअर रिसर्च फेलोशिप
या संस्थेमार्फत पुढील संशोधनात्मक अभ्यासक्रम चालवले जातात. या अभ्याक्रमांसाठी दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते. ही फेलोशिप पुढील विषयांमध्ये दिली जाते-
* स्टॅटिस्टिक्स : अर्हता- मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स/ मास्टर ऑफ आर्टस्/ सायन्स इन स्टॅटिस्टिक्स. अत्युकृष्ट गणिती क्षमता असलेल्या बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स/ मॅथेमॅटिक्स यापैकी कोणतीही पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना ही फेलोशिप मिळू शकते. हे अभ्यासक्रम कोलकाता, दिल्ली आणि बेंगळुरू कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.
* मॅथेमॅटिक्स : अर्हता- मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स/ मास्टर ऑफ आर्टस् सायन्स इन स्टॅटिस्टिक्स. अत्युकृष्ट गणितीय क्षमता असलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथेमॅटिक्स यापैकी कोणतीही पदवी प्राप्त केली असल्यास त्यांनाही ही फेलोशिप मिळू शकते. फेलोशिपचा अभ्यासक्रम कोलकाता, दिल्ली आणि बेंगळुरू या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.
* क्वॉलिटी, रिलॅअबिलिटी अँड ऑपरेशन रिसर्च : अर्हता- क्वॉलिटी, रिअ‍ॅॅबिलिटी, ऑपरेशन रिसर्च या विषयांमध्ये एम.ई./ एमटेक्./ भौतिकशास्त्र/ गणित/ स्टॅटिस्टिक्स या विषयांमध्ये एम. स्टॅट./ एम.एस्सी./ एम.ए. उमेदवारांनी उच्च गुणवत्ता प्राप्त बी.ई. किंवा बी.टेक. पदवीधरांनासुद्धा ही फेलोशिप मिळू शकते. फेलोशिपचा अभ्यासक्रम कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली आणि हैदराबाद येथे उपलब्ध आहे.
* कॉम्प्युटर सायन्स : अर्हता- इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ रेडिओ फिजिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग/ मायक्रावेव्ह कॉम्युनिकेशन/ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ बायोइन्फर्मेटिक्स/ बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये एमई/ एमटेक्. पदवी स्तरापर्यंत विद्यार्थ्यांनी गणिताचा अभ्यासक्रम केलेला असावा. किंवा भौतिकशास्त्र/ गणित/ अ‍ॅप्लाइड मॅथेमॅटिक्स/ स्टॅटिस्टिक्स/ इलेक्ट्रॉनिक सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स/ अ‍ॅटमोस्फेरिक सायन्स/ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ बायोइन्फर्मेटिक्स/ बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये एमएस्सी/ एमसीए/ एमए उमेदवारांनी गणित/ कॉम्प्युटर सायन्स या विषयांचा अभ्यास पदवी स्तरावर केलेला असावा. उच्च गुणवत्ताप्राप्त बीई किंवा बीटेक्. पदवीधरांनासुद्धा ही फेलोशिप मिळू शकते. फेलोशिपचा अभ्यासक्रम कोलकाता, चेन्नई आणि बेंगळुरु येथे उपलब्ध आहे.
* फिजिक्स आणि अ‍ॅप्लाइड मॅथेमॅटिक्स : अर्हता- भौतिकशास्त्र/ गणित/ स्टॅटिस्टिक्स या विषयांमध्ये एम.एस्सी फेलोशिपचा अभ्यासक्रम कोलकाता कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.
* अ‍ॅग्रिकल्चर आणि इकॉलॉजी : अर्हता- अ‍ॅग्रोनॉमीच्या स्पेशलायझेशनसह एम.एस्सी इन अ‍ॅग्रिकल्चर किंवा स्टॅटिस्टिक्स या विषयामध्ये एम.एस्सी किंवा बायोकेमिस्ट्री/ प्लान्ट फिजिऑलॉजी या विषयांच्या स्पेशलायझेशनसह एम.एस्सी/ एन्व्हायरॉन्मेन्टल सायन्स या विषयात एम.एस्सी. फेलोशिपचा अभ्यासक्रम कोलकाता येथे चालवला जातो.
* ह्य़ुमन जेनेटिक्स : अर्हता- बायोकेमिस्ट्री/ बायोफिजिक्स/ मॉलिक्युलर बायोलॉजी/ जेनेटिक्स/ झुऑलॉजी या विषयांसह एम.एस्सी. फेलोशिपचा अभ्यासक्रम कोलकाता येथे उपलब्ध आहे.
* जिओलॉजी : अर्हता- जिऑलॉजी/ अ‍ॅप्लॉइड जिऑलॉजी या विषयांसह एम.एस्सी/ एम.ए. फेलोशिपचा अभ्यासक्रम कोलकाता येथे उपलब्ध आहे.
* लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फर्मेशन सायन्स : अर्हता- मास्टर ऑफ लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फर्मेशन सायन्स. फेलोशिपचा अभ्यासक्रम कोलकाता कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे.
* लिंग्विस्टिक्स : अर्हता- बॅचलर्स डिग्री इन लिंग्विस्टिक्स/ इंग्रजी (ऑनर्स) फेलोशिपचा अभ्यासक्रम कोलकाता कॅम्पसमध्ये चालवला जातो. ज्या विद्यार्थ्यांनी एम.टेक किंवा एम.ई. या पदवी प्राप्त केलीअसतील त्यांना दरमहा १८ हजार रुपये फेलोशिप आणि इतर अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांना दरमहा १६ हजार रुपये फेलोशिप दिली जाईल. स्टॅटिस्टिक्स, मॅथेमॅटिक्स, कॉम्प्युटर सायन्स, क्वॉन्टिटेटिव्ह इकॉनॉमिक्स आणि क्वॉलिटी रिअ‍ॅलिबिलिटी आणि ऑपरेशन रिसर्च या विषयांमध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना अतिरिक्त २ हजार रुपयांची फेलोशिप प्रदान केली जाते.
निवड प्रक्रिया- फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची निवड परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाते. उच्च गुणवत्तासुद्धा निवड करताना लक्षात घेतली जाते. पत्ता- डीन ऑफ स्टडीज, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिटय़ूट, २०३, बॅरकपोर ट्रंक रोड, कोलकाता ७००१०८. वेबसाइट- http://www.isical.ac.in/-deanweb
ईमेल- isiadmission@iscal.ac.in

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी