देशभरातील विविध ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ अर्थात आयआयटीच्या निरनिराळ्या शाखांमधील उपलब्ध अभ्यासक्रमांची माहिती-
आयआयटीच्या विविध कॅम्पसमध्ये प्रवेश मिळण्यासाठी दोन टप्प्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागते. पहिला टप्पा हा जेईई- मेन आणि दुसरा टप्पा ‘जेईई- अ‍ॅडव्हान्स्ड’चा. आयआयटीच्या विविध कॅम्पसमध्ये पांरपरिक अभियांत्रिकी शाखा म्हणजेच इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स याशिवाय असंख्य नावीन्यपूर्ण विषयांमध्ये ‘जेईई- अ‍ॅडव्हान्स्ड’च्या गुणांवर आधारित प्रवेश मिळू शकतो.
बीई/ बीटेक आणि बीआर्क सोबत, बीफार्म, इंटिग्रेटेड एमएस्सी, इंटिग्रेटेड एम.टेक, डय़ुएल डिग्री बीटेक-एमटेक, डय़ुएल डिग्री बी.एस.-एम.एस. आणि बी.एस. असे हे अभ्यासक्रम आहेत.
‘जेईई- अ‍ॅडव्हान्स्ड’ या परीक्षेद्वारे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीच्या पुढील शाखांमध्ये प्रवेश मिळू शकतो-
चार वष्रे कालावधीचे अभ्यासक्रम
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी-
* एरोस्पेस इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास)
* टेक्स्टाइल इंजिनीअरिंग (आयआयटी- दिल्ली)
* अ‍ॅग्रिकल्चरल अ‍ॅण्ड फूड इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* पल्प अ‍ॅण्ड पेपर इंजिनीअरिंग (आयआयटी- रुरकी)
* बायोलॉजिकल सायन्सेस अ‍ॅण्ड बायो-इंजिनीअरिंग (आयआयटी- कानपूर)
* प्रॉडक्शन अ‍ॅण्ड इंडस्ट्रिअल इंजिनीअिरग (आयआयटी- दिल्ली/ रुरकी)
* बायोटेक्नॉलॉजी (आयआयटी- गौहाटी)
* पेट्रोलियम इंजिनीअिरग (इंडियन स्कूल ऑफ माइन्स)
* बायोटेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड बायोकेमिकल इंजिनीअिरग (आयआयटी- खरगपूर)
* ओशन इंजिनीअिरग अ‍ॅण्ड नेव्हल आíकटेक्चर (आयआयटी- खरगपूर)
* सेरॅमिक इंजिनीअिरग (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* केमिकल इंजिनीअिरग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास/ रुरकी/ गांधीनगर/ हैदराबाद/ आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* केमिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (आयआयटी- गौहाटी)
* सिव्हिल इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास/ रुरकी/ भुवनेश्वर/ हैदराबाद/ आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास/ रुरकी/ हैदराबाद/ इंदौर/ मंडी/ पाटणा/ रोपर/ जोधपूर/ आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद)
* इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ कानपूर/ खरगपूर /मद्रास/ रुरकी/ भुवनेश्वर/ गांधीनगर/ हैदराबाद/ इंदौर/ मंडी/ पाटणा/ आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – पॉवर (आयआयटी- दिल्ली)
* इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (आयआयटी- गौहाटी/ रुरकी/ धनबाद)
* इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* इलेक्ट्रानिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (आयआयटी-गौहाटी)
* इंजिनीअिरग फिजिक्स (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ मद्रास)
* इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* मॅन्युफॅक्चिरग सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर)
* मटेरिअल्स सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग (आयआयटी- कानपूर)
* मेटॅलर्जकिल अ‍ॅण्ड मटेरिअल्स इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर/ मद्रास/ रुरकी)
* मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटिंग (आयआयटी- गौहाटी)
* मेकॅनिकल इंजिनीअरिंग (आयआयटी- मुंबई/ दिल्ली/ गौहाटी/ कानपूर/ खरगपूर/ मद्रास/ रुरकी/ भूवनेश्वर/ गांधीनगर/ हैदराबाद/ इंदौर/ मंडी/ पाटणा/ रोपार/ जोधपूर / आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* मेटॅलर्जकिल इंजिनीअरिंग (आयआयटी- बीएचयू वाराणसी )
* मेटॅलर्जकिल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड मटेरिअल्स सायन्स (आयआयटी- मुंबई)
* मिनरल इंजिनीअरिंग (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* मायिनग इंजिनीअरिंग (आयआयटी- खरगपूर/ आयआयटी- बीएचयू वाराणसी/ इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* मायिनग मशिनरी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* एनव्हिरॉन्मेन्टल इंजिनीअरिंग (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* इंजिनीअिरग सायन्स (आयआयटी- हैदराबाद/ इंदौर/ मंडी)
* सिस्टिम्स सायन्स (आयआयटी- जोधपूर)
० बॅचलर ऑफ सायन्स (बी.एस.)- हा अभ्यासक्रम रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, गणित विषयांमध्ये करता येतो. (आयआयटी- कानपूर)
० औषधनिर्माणशास्त्र- बनारस हिंदू विद्यापीठात बी.फार्म. कालावधी- चार वष्रे. आणि मास्टर ऑफ फार्मसी डय़ुएल डिग्री कालावधी- पाच वष्रे. या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.
० बॅचलर ऑफ डिझाइन- आयआयटी  दिल्ली (कालावधी- पाच वष्रे)
० मास्टर ऑफ सायन्स- इंटिग्रेटेड – कालावधी- पाच वष्रे.  हे अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये करता येतात-
* अ‍ॅप्लाइड जिऑलॉजी (आयआयटी- खरगपूर)
* अ‍ॅप्लाइड मॅथेमॅटिक्स (आयआयटी- रुरकी)
* अ‍ॅप्लाइड फिजिक्स (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
* केमिस्ट्री (आयआयटी- मुंबई)
* इकॉनॉमिक्स (आयआयटी- खरगपूर)
* एक्स्प्लोरेशन जिओफिजिक्स (आयआयटी- खरगपूर)
* मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटिंग (आयआयटी- खरगपूर)
* फिजिक्स (आयआयटी- खरगपूर/ रुरकी)
० बी एस अ‍ॅण्ड एम एस डय़ुअल डिग्री अभ्यासक्रम – कालावधी पाच वष्रे.
* बायोलॉजिकल सायन्सेस आणि फिजिक्स (आयआयटी- मद्रास)
० मास्टर ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम कालावधी पाच वष्रे. अ‍ॅप्लाइड जिऑलॉजी आणि अ‍ॅप्लाइड जिओफिजिक्स (इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद)
० मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड अभ्यासक्रम – कालावधी- पाच वष्रे.
* जिऑलॉजिकल टेक्नॉलॉजी (आयआयटी- रुरकी)
* जिऑफिजिकल टेक्नॉलॉजी (आयआयटी- रुरकी)
* इंजिनीअरिंग फिजिक्स (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* इंडस्ट्रिअल केमिस्ट्री (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* मॅथेमॅटिक्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटिंग (आयआयटी- बीएचयू वाराणसी)
* पॉलिमर सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (आयआयटी- रुरकी)
(पूर्वार्ध)

Wardha, dr babasaheb ambedkar jayanti, 15 days Campaign Launched , Caste Validity Certificate, Backward Class Students, caste validity for admission, caste validity for student,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्व, घ्या विशेष मोहिमेत जात पडताळणी प्रमाणपत्र
National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
Printing of NCERT textbooks by private publishers without permission
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांना ‘पायरसी’ची वाळवी… झाले काय?
Career After 12th Medical courses after twelfth in Marathi
Career After 12th : बारावीनंतर तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात करियर करायचेय? मग ‘या’ अभ्यासक्रमांमध्ये घेऊ शकता प्रवेश