भूगोल हा उपघटक पेपर राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर- १ तसेच मुख्य परीक्षा पेपर- १ आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा उपघटक आहे.
भूगोल या घटकाचा अभ्यासक्रम साधारणत: खालील प्रकारे विभाजित करता येऊ शकतो.
*प्राकृतिक भूगोल- बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार हा उपघटक पूर्वपरीक्षेसाठी व मुख्य परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यात पृथ्वीची अंतरंगाची रचना, खडक, खडकांचे प्रकार, ज्वालामुखी भूकंप, ज्वालामुखी व भूकंपाचे जागतिक वितरण भूरूपिकी चक्रांची संकल्पना, नदीने, हिमनदीने, वाऱ्यांनी तसेच समुद्रतटावर तयार झालेल्या भूरूपांचा अभ्यास याशिवाय भारताचा प्राकृतिक भूगोल व महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यांचा अभ्यास करावा.
*हवामानशास्त्र- प्रत्येक परीक्षेला या उपघटकावर प्रश्न विचारलेच जातात. यात वातावरणीय घटक आणि त्याची संरचना उदा. तपांबर, स्थितांबर, आयनांबर यांचा अभ्यास, हवेचे तापमान, हवेचा दाब, तापमानाचे वितरण, तापमानाचे आडव्या दिशेतील व क्षितिज समांतर वितरण, भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे, ग्रहीय वारे, आवर्त, प्रत्यावर्त या उपघटकाबरोबरच महाराष्ट्रातील हवामानाची वैशिष्टय़े, भारतीय हवामानाची वैशिष्टय़े यांचा अभ्यास करावा. हा घटक समजण्यासाठी सोपा आहे. मात्र, या उपघटकावरील प्रत्येक संकल्पना पाठ करण्यापेक्षा समजून घ्याव्यात.
*मृदा- मृदा निर्मितीची प्रक्रिया आणि घटक, मृदेमधील खनिजे व सेंद्रीय घटक, वनस्पतींची आवश्यक पोषणमूल्ये, मृदेच्या समस्या आणि त्या सुधारण्याच्या पद्धती, महाराष्ट्रातील व भारतातील मृदेचे वितरण, उदा. काळी मृदा, जांभी मृदा इत्यादी. जमिनीची धूप होते, त्याचे प्रकार अभ्यासावेत.
*लोकसंख्या भूगोल – महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण, भारतातील लोकसंख्येचे वितरण, स्थलांतर, स्थलांतराची कारणे, पूर्वपरीक्षेला साधारणत: दोन ते तीन प्रश्न या उपघटकावर विचारले जातात. मात्र, मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा आहे. मुख्य परीक्षेला साधारणत: आठ ते दहा प्रश्न यावर विचारले जातात. म्हणून हा उपघटक व्यवस्थित अभ्यासावा. लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमवारीतील पहिली आणि शेवटची दहा राज्ये, घनतेच्या दृष्टीने पहिली  आणि शेवटची दहा राज्ये, लोकसंख्येतील स्त्री-पुरुष प्रमाण, त्याचे वितरण यानुसार पहिली पाच आणि शेवटची पाच राज्ये, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या वितरणाच्या दृष्टीने पहिली पाच आणि शेवटची पाच राज्ये जरूर अभ्यासावीत.
*भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल- वरील घटक अभ्यासल्यानंतर महाराष्ट्राचा व भारताचा घटक स्वतंत्रपणे अभ्यासावा. हा घटक राज्य सेवेच्याच नाही तर संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठीही उपयुक्त आहे. अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल तसेच भारताचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल असा शब्दप्रयोग वापरलेला आहे.
=    भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या प्राकृतिक भूगोलात भारताचे व महाराष्ट्राचे स्थान विस्तार, नदीप्रणाली हवामान, मृदा, नसíगक वनस्पती यांचा अभ्यास करावा. अभ्यासासाठी नकाशाचा वापर करावा. बरेच प्रश्न नकाशाशी संबंधित विचारले जातात.
=    भारताच्या व महाराष्ट्राच्या सामाजिक भूगोलात महाराष्ट्राची व भारताची लोकसंख्या आणि लोकसंख्येचे वितरण, २००१ ते २०११ जनगणना त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा.
*महाराष्ट्राचा व भारताचा आíथक भूगोल- परीक्षेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यात महाराष्ट्रातील व भारतातील खनिज साधनसंपत्ती, उद्योगधंदे, कृषी जलसिंचन पशुधन व मासेमारी, इत्यादी उपघटकांचा अभ्यास करावा.
*जगाचा भूगोल- जगाचा भूगोल हा घटक फक्त पूर्वपरीक्षेलाच विचारला जातो. अनेक विद्यार्थ्यांना हा घटक थोडा अवघड जातो. यासाठी कोणते अभ्याससाहित्य वापरावे याबाबतही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो. खरेतर या घटकावर जास्त प्रश्न विचारले जात नाहीत.
    हा घटक फक्त पूर्वपरीक्षेला असल्याने सर्वप्रथम खंडानुरूप देश समजून घ्यावेत. त्यानंतर त्यातील डोंगररांगा, नदीप्रणाली, जागतिक हवामान, खनिजसंपत्ती, कारखाने यांचा अभ्यास करावा. जगभरातील समुद्र, त्या समुद्रांजवळचे देश यांचा अभ्यास करावा.

यूपीएससी : ठोकळा (Cube and Cuboid)
मित्रांनो, सी सॅट पेपर २ मध्ये अनेकदा ठोकळ्यासंबंधित प्रश्न विचारले जातात. ठोकळ्यांशी संबंधित प्रश्न सोडवताना खालील मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. परीक्षेला जाताना खोडरबराचा वापर केल्यास ठोकळ्यासंबंधी प्रश्न सोडवणे सोपे जाते.
ठोकळा (Cube and Cuboid)
त्रिमितीय ठोकळ्याला ६ बाजू ८ पृष्ठभाग आणि १२ कडा असतात. (8 corners, 6 surfaces & 12 edges) असतात. g04
खालील ठोकळ्यात
समोरील बाजू ABCD, मागची बाजू EFGH,
वरची बाजू ADEH, तळाकडील बाजू BCFG,
उजवी बाजू DCGH, डावी बाजू ABEF
प्रश्न : ४ सेंमी. बाजू असलेला ठोकळा काळा रंग, लाल रंग व हिरव्या रंग यामध्ये समोरासमोरील बाजूने रंगवला व प्रत्येकी १ सेंमी. १ सेंमी बाजू असलेले ठोकळे तयार केले तर किती ठोकळे तयार होतील?g02
या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी वर दाखवलेला ठोकळा अभ्यासावा व प्रश्नांची उत्तरे द्यावी.
१) एकूण लहान ठोकळे = (बाजू)३ = (४)३ = ६४
२) किती लहान असे ठोकळे तयार होतील की त्यांच्या तीन बाजू रंगवलेल्या असतील?
आकृतीवरून हे स्पष्ट होते की, तीन बाजू रंगीत असलेले लहान ठोकळे हे मोठय़ा ठोकळ्याच्या कडांवर असतील (at corners) म्हणजे तीन बाजू रंगीत असणाऱ्या लहान ठोकळ्यांची संख्या ४ + ४ = ८ इतकी असेल.
३)    ज्यांच्या दोन बाजू रंगीत असतील असे किती लहान असे ठोकळे तयार होतील?
    आकृतीवरून हे स्g01पष्ट होते की,  प्रत्येक किनाऱ्यावरील दोन ठोकळे (to each edge of the big cube) यांच्या दोन बाजू या दोन रंगांनी रंगवल्या जातील, प्रत्येक किनाऱ्यावरील दोनच ठोकळे हे दोन रंगांचे असतील. थोडक्यात, ठोकळ्याला एकूण किनारा १२ म्हणून १२ गुणिले २ = २४ एवढे लहान ठोकळे तयार होतील, ज्यांच्या दोन बाजू रंगीत असतील. (खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे)
४) ज्यांची एकच बाजू  रंगवलेली असेल असे किती ठोकळे तयार होतील?
    खालील आकृतीत दर्शवल्यानुसार, मोठय़ा ठोकळ्याच्या प्रत्येक बाजूवरील ४ ठोकळ्यांची फक्त १ बाजू ही g01रंगीत असेल म्हणजे ठोकळ्याला एकूण बाजू ६ असतात. म्हणून ६ x ४ = २४ एवढे लहान ठोकळे तयार होतील की ज्यांची १ बाजू ही रंगीत असेल.
    सूत्र – (x – 2)2 x 6.
(उर्वरित प्रश्न उद्याच्या अंकात..)
डॉ. जी. आर. पाटील – grpatil2020@gmail.com

10th exam maharashtra
राज्यात दहावीची परीक्षा सुरू, पहिल्या दिवशी कॉपी प्रकरणे किती?
Maharashtra, ST Staff Congress, Practice Camp, Employee Promotion Exam, msrtc, ST Corporation,
एसटी महामंडळात सर्वात मोठी कर्मचारी बढती परीक्षा….
The state board will also test the open book examination system
ओपन बुक परीक्षा पद्धतीची राज्य मंडळही करणार चाचपणी
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित