12 December 2019

News Flash

एमपीएससी : हिमालय पर्वताच्या रांगा

प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे करतात. १) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश २) उत्तर भारतीय मदानी प्रदेश ३) भारतीय व्दिपकल्पीय पठारी प्रदेश ४) भारतीय किनारी मदानी

| March 19, 2014 01:27 am

प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे करतात. १) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश २) उत्तर भारतीय मदानी प्रदेश ३) भारतीय व्दिपकल्पीय पठारी प्रदेश ४) भारतीय किनारी मदानी प्रदेश ५) भारतीय बेटे.
उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश : हिमालय, भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. सिंधू नदी व ब्रह्मपुत्रा नदीच्या घळ्यांदरम्यान हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा असून त्यांना बहिरवर्क आकार प्राप्त झाला आहे.
हिमालय पर्वताच्या रांगा : १) ट्रान्स हिमालय : ब्रहद् हिमालयाच्या उत्तरेस ट्रान्स हिमालयाच्या रांगा आहेत. ट्रान्स हिमालयाचा विस्तार
पश्चिम – पूर्व दिशेने असून त्याची सरासरी लांबी १००० किमी इतकी आहे. ट्रान्स हिमालयात खालील रांगांचा समावेश होतो. अ) काराकोरम रांगा, ब) लडाख रांगा, क) कैलास रांगा.
अ) काराकोरम रांगा : भारतातील सर्वात उत्तरेला असलेल्या या रांगांमुळे भारताची अफगाणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण होते.
काराकोरमचा विस्तार पामीरपासून पूर्वेकडे गीलगिट नदीच्या पूर्वेला ८०० किमी. पर्यंत आहे. जगातील सर्वात उंचीचे २ नंबरचे आणि भारतीय सरहद्दीमधील सर्वात उंच शिखर के – २ ( गॉडविन ऑस्टीन) याच रांगेमध्ये आहे. जगातील काही मोठय़ा हिमनदीची निवासस्थाने या रांगेत आहेत. उदा. सियाचीन, बाल्टेरो, बायाफो, हिस्पर. काराकोरम रांगेत अतिशय उंच अशी शिखरे आहेत. काही शिखरांची उंची ८००० मी. पेक्षा जास्त आहे.
लडाख रांग : सिंधू नदी आणि तिची उपनदी श्योक यांच्यादरम्यान लडाख रांग आहे. लडाख रांगेची लांबी ३०० किमी आणि सरासरी उंची ५८०० मी. आहे.
कैलास रांग : लडाख रांगेची शाखा पश्चिम तिबेटमध्ये कैलास रांग या नावाने परिचित आहे. सर्वात उंच शिखर कैलास आहे.
बृहद् हिमालय (Greater Himalaya) : वैशिष्टय़े : १) लेसर हिमालयाच्या उत्तरेकडे भिंतीसारखे पसरलेले बृहद् हिमालयाची रांग आहे. बृहद् हिमालय हा मुख्य मध्यवर्ती प्रणोदामुळे (MCT-Maincentral Thrus) लेसर हिमालयापासून वेगळा झाला आहे. बृहद् हिमालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या रांगेत जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. यातील बरीचशी शिखरे ही ८००० मी. पेक्षा जास्त आहे. या रांगेमध्ये जगातील सर्वात उंच शिखर मांऊट एव्हरेस्ट आहे. या रांगेतील अन्य शिखरे उतरत्या क्रमाने १) एव्हरेस्ट, २) कांचनगंगा, ३) मकालू, ४) धवलगिरी, ५) अन्नपूर्णा, ६) नंदा देवी, ७) कामेत, ८) नामच्या बरवा, ९) गुरला मंधता, १०) बद्रीनाथ
लेसर हिमालय/मध्य हिमालय ((Lesser or Middle Himalaya) : मध्य हिमालयालाच हिमाचल, हिमालया असे देखील संबोधले जाते. दक्षिणेकडील शिवालीक रांगा व उत्तरेकडील बृहद् हिमालय या दोघांना समांतर असा, लेसर हिमालय पसरलेला आहे. लेसर हिमालयाची रचना ही गुंतागुंतीची असून, या पर्वताची सरासरी उंची ३५०० ते ५००० मी. यांदरम्यान आहे. लेसर हिमालयात पुढील रांगांचा समावेश होतो.
१) पीरपंजाल, २) धौलाधर, ३) मसुरी व नागतिब्बा, ४) महाभारत
१) पीरपंजाल : काश्मीरमधील ही सर्वात लांब रांग असून हिचा विस्तार
झेलमपासून उध्र्व बियास नदीपर्यंत सुमारे ४०० किमीपर्यंतचा आहे. रावी नदीच्या आग्नेयकडे ही रांग पुढे धौलाधर म्हणून ओळखली जाते.
२) धौलाधर रांग : पीरपंजाल रांग पूर्वेकडे धौलाधर या नावाने प्रसिध्द आहे. ही रांग पुढे धर्मशाळा व सिमलामधून जाते.
३) मसुरी, नागतिब्बा रांग : लेसर हिमालयाच्या पूर्वेकडे जाताना फक्त काही रांगाच स्पष्टपणे ओळखल्या जातात. यांपकी मसुरी आणि नाग तिब्बा या रांगा आहेत.
४) महाभारत रांग : मसुरी रांग पुढे नेपाळमध्ये महाभारत रांग म्हणून ओळखली जाते.
महत्त्वाच्या खिंडी : पीरपंजाल, बिदिल खिंड, गोलाबघर खिंड, बनीहल खिंड
महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे : लेसर हिमालयात सिमला (हिमाचल प्रदेश), मसुरी, राणीखेत, ननिताल, अल्मोडा ( उत्तराखंड), दार्जिलिंग
( पं.बंगाल).
महत्त्वाच्या दऱ्या :
१) काश्मीर दरी : पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिध्द काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रूंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.
२) कांग्रा दरी : हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचलेली आहे.
३) कुलू दरी : रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.
४) काठमांडू दरी : नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.
शिवालीक रांगा / बाहय़ हिमालय (Outer Himalaya) : हिमालय  पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग ही शिवालीक रांग आहे. या रांगेलाच बाहय़ हिमालय असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालीक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली. यालाच डून ((Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उदमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर).

यूपीएससी : सार्वजनिक सेवा भाग-१
यू.पी.एस.सी आणि एम.पी.एस.सी या स्पर्धापरीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांना सार्वजनिक सेवांबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. हा घटक यू.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. यांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या पेपर २ मध्ये हा उपघटक स्वतंत्रपणे नमूद केलेला आहे.
१) अखिल भारतीय सेवा : सध्या भारतात तीन सेवा या प्रकारात मोडतात. अ) भारतीय प्रशासकीय सेवा २) भारतीय पोलीस सेवा ३) भारतीय वनसेवा. सरदार वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवांचे पितामह असे म्हणतात. या सेवेतील सदस्य केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाचे पद भूषवितात. या सेवेतील सदस्यांची भर्ती प्रक्रिया आणि प्रशिक्षणाची आखणी केंद्र सरकारमार्फत केली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोग : घटनेच्या कलम ३१५ अन्वये केंद्रीय लोकसेवा आयोगाची निर्मिती करण्यात आली. ही घटनात्मक यंत्रणा आहे. कलम ३१६ अन्वये राष्ट्रपतींव्दारे केंद्रीय लोकसेवा आयोगातील सदस्यांची नेमणूक केली जाते.
सदस्यांचा कार्यकाल : ६ वर्ष अथवा ६५ वर्ष यांपकी जो आधी संपुष्टात येईल एवढा काळ सदस्य राहता येते. सदस्यांना हानिकारक ठरतील अशाप्रकारे सेवाशर्ती या काळात बदलता येत नाही.
आयोगाची काय्रे : आयोगाच्या कार्याचे दोनप्रकारे विभाजन करता येईल अ) प्रशासकीय काय्रे ब) सल्लाविषयक काय्रे अ) प्रशासकीय काय्रे : १) नागरी सेवांसाठी स्पर्धापरीक्षांचे आयोजन व व्यवस्थापन करणे. बढतीव्दारे नागरी पदांची भर्ती करणे. २) एका सेवेतून दुसऱ्या सेवेत बदली करण्याविषयी केंद्र सरकारला सल्ला देणे ३) आपल्या कार्याविषयी राष्ट्रपतींना वार्षकि अहवाल सादर करणे. ब) सल्लाविषयक काय्रे : १) केंद्र सरकारच्या अधिकार क्षेत्रात नागरी पदभार स्वीकारणाऱ्या अधिकार पदाच्या शिस्तीविषयी बाबी निश्चित करणे. २) नागरी सेवांसाठी भर्तीची पध्दत ठरवणे तसेच नागरी सेवेतील बदली, त्यांच्या नियुक्त्या या संबंधी तत्त्वे निर्धारित करणे.
बडतर्फी : कलम ३१७ नुसार केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा इतर कोणताही सदस्य यांना राष्ट्रपती खालील परिस्थितीत बडतर्फ करू
शकतो. १) ती व्यक्ती दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आल्यास. २) राष्ट्रपतींच्या मते मानसिक व शारीरिक समतोलामुळे ती व्यक्ती
पदावर राहण्यास अयोग्य ठरत असल्यास ३) ती व्यक्ती आपल्या पदाच्या कर्तव्याबाहेर जाऊन कोणत्याही प्रकारचे आर्थिक लाभ
असणारी (Paid) नियुक्ती करत असल्यास ४) वरील कारणांव्यतिरिक्त राष्ट्रपती गरवर्तणूक या कारणांवरून अध्यक्ष व सदस्यांना पदावरून बडतर्फ करू शकतात.
मात्र अध्यक्ष व सदस्यांना पदावरून बडतर्फ करताना हे प्रकरण पुढील चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावे लागते आणि जर न्यायालयाने संबंधित कारणांस पुष्टी दिली तरच राष्ट्रपती त्यांना पदमुक्त करू शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. भारतीय राज्यघटनेत वरील विषयांसंदर्भात गरवर्तन या शब्दाची व्याख्या केलेली आहे, यानुसार केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही केलेल्या करारामुळे वा तहामध्ये अध्यक्ष व सदस्य यांचे हितसंबंध असतील किंवा इतर सदस्यांसोबत या करारातील फायद्यांमध्ये कोणत्याही मार्गाने सदस्य सहभागी असतील तर त्यास गरवर्तन मानले जाते.
लोकसेवा आयोगाचे स्वातंत्र्य : केंद्रीय लोकसेवा आयोगातील सदस्यांना नि:पक्षपातीपणे काम करण्यासाठी घटनेत पुढील तरतुदी सांगितल्या आहेत. १) आयोगाच्या अध्यक्ष वा सदस्यांच्या नोकरीसंबंधी सेवाशर्ती राष्ट्रपतींनी निर्धारित केलेल्या असतील. एकदा नेमणूक केल्यानंतर त्यामध्ये फेरफार करता येणार नाही. २) केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्यावर होणारा खर्च म्हणजे त्यांचे वेतन, त्यांचे विविध भत्ते, निवृत्तिवेतन हा भारतीय संचित निधीतून दिला जाईल, थोडक्यात या खर्चावर संसदेत मतदान होऊ शकत नाही. ३) आयोगाच्या अध्यक्षांना किंवा सदस्यांना पदावरून दूर करावयाचे असेल तर राज्यघटनेत दिलेल्या तरतुदींनुसारच त्याला दूर करता येते. थोडक्यात आयोगाच्या अध्यक्षांना व सदस्यांना, आपल्या कार्यकाळाची पूर्ण हमी भारतीय संविधानाने दिली आहे. ४) आपल्या पदावरून निवृत्त झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये पुन्हा नोकरी करू शकत नाही. ५) राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष हा केंद्रीय लोकसेवा आयोगाचा सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून किंवा अन्य राज्यातील लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त होण्यास पात्र असतो, पण केंद्राच्या किंवा राज्याच्या दुसऱ्या कोणत्याही नियुक्तीसाठी पात्र होत नाही. ६) केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष व सदस्य यांचा एकदा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा त्या पदावर नियुक्त केले जात नाही.
लालबहादूर शास्त्री प्रशासकीय प्रशिक्षण अकादमी : अखिल भारतीय प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात लालबहादूर शास्त्री प्रशासकीय प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षण घेण्याचे स्वप्न असते. ही संस्था उत्तराखंड राज्यात हिमालयाच्या पायथ्याशी मसुरी येथे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आय.सी.एस. ही सेवा होती. १९४७ मध्ये आय.सी.एस.चे रूपांतर आय.ए.एस. मध्ये झाले व आय.ए.एस.यासाठी प्रशिक्षण मेटकॉफ हाऊस येथे सुरू झाले. १९५७ मध्ये शिमला येथे आय.ए.एस. स्टाफ कॉलेज स्थापन झाले ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिफ्रेशर प्रशिक्षण देण्यासाठी होते. पुढे १९५९ मध्ये दिल्ली आणि शिमला येथील संस्थांचे एकत्रीकरण करून मसुरीतील राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था उदयास आली.

First Published on March 19, 2014 1:27 am

Web Title: loksatta guidance for upsc mpsc exam article 16
टॅग Mpsc 2,Upsc
Just Now!
X