19 February 2020

News Flash

एमपीएससी : भारतीय किनारपट्टी मैदान

मागच्या लेखात आपण उत्तर भारतीय मदानी प्रदेशाचा अभ्यास केला. आज आपण भारतीय किनारपट्टी मदान पाहणार आहोत.

| March 22, 2014 08:23 am

मागच्या लेखात आपण उत्तर भारतीय मदानी प्रदेशाचा अभ्यास केला. आज आपण भारतीय किनारपट्टी मदान पाहणार आहोत.
भारतीय किनारपट्टी मदान- पश्चिम किनारपट्टी मदान अरबी समुद्र आणि सह्याद्री दरम्यान पश्चिम किनारपट्टी मदान आहे. याची लांबी साधारणत: १४०० कि.मी. इतकी आहे. या किनारपट्टीच्या मदानी प्रदेशात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तसेच केरळ राज्याच्या किनारपट्टीचा भाग व तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी राज्याचा समावेश होतो. पश्चिम किनारपट्टी मदानाचे खालील भागात विभाजन केले जाऊ शकते.
१) कच्छ द्वीपकल्प, २) कच्छचे रण, ३) काठेवाड द्वीपकल्प,
४) गुजरात मदान, ५) कोकण किनारपट्टी, ६) कर्नाटक किनारपट्टी, ७) केरळ किनारपट्टी.
१)    कच्छचे रण- कच्छच्या उत्तरेकडच्या सपाट मदानी प्रदेशास कच्छचे रण असे म्हणतात. याचे दोन भाग पडतात १) मोठे कच्छचे रण (The Great Runn) २) छोटे कच्छचे रण (The Little Runn). मोठय़ा कच्छच्या रणात अनेक ठिकाणी क्षारयुक्त पट्टे आढळतात. मोठय़ा कच्छच्या रणात काही ठिकाणी उंचवटय़ाचा प्रदेश बेटांसारखा आढळतो. उदा., पच्चम, खदीर आणि बेला. पच्चम बेटांच्या दक्षिणेला बन्नी येथे मोठा गवताळ प्रदेश आढळतो. मोठय़ा कच्छच्या रणाच्या दक्षिणेला छोटे कच्छचे रण आहे.
२) काठेवाड द्वीपकल्प- कच्छच्या दक्षिण भागात काठेवाड द्वीपकल्प आहे. काठेवाड द्वीपकल्पामध्ये गिरनार पर्वताचा समावेश होतो. याची निर्मिती ज्वालामुखीपासून झाली असावी. गिरनार पर्वताच्या दक्षिणेला घनदाट गिरचे जंगल आहे.
३)  कोकण किनारपट्टी- कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेला दमणगंगेपासून दक्षिणेला तेरेखोल नदीपर्यंत आहे. कोकण किनारपट्टीची लांबी ५३० कि.मी. इतकी आहे. उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकणाचा भाग खडकाळ आणि ओबडधोबड प्रकारचा आहे.
४) कर्नाटक किनारपट्टी- कर्नाटक किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी २२५ कि.मी. इतकी आहे. कर्नाटक किनारपट्टीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी शरावती नदी ही उंचीवरून खाली येते व तेथे गिरसप्पा धबधबा निर्माण होतो.
५)  केरळ किंवा मलबार किनारपट्टी- केरळ किनारपट्टी उत्तरेस कन्नोरपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत ५५० कि.मी.पर्यंत असून या किनारपट्टीमध्ये वाळूच्या टेकडय़ा सर्व ठिकाणी आढळतात. वाळूच्या या टेकडय़ांना थेरीर्स असे म्हणतात. वाळूच्या टेकडय़ांमुळे अनेक उथळ खाजण (Lagoons) आणि भरतीच्या पाण्याचा प्रदेश Backwater)  तयार झालेला आहे. किनारपट्टीलगत अनेक तळी निर्माण झालेली आहेत.
 पूर्व किनारपट्टीचे मदान- पूर्व किनारपट्टीच्या मदानाचे विभाजन
१) ओरिसा २) आंध्र मदान ३) तमिळनाडू मदान अशा पद्धतीने केले जाते.
१) ओरिसा किनारपट्टी- याला उत्कल मदान असेदेखील म्हणतात. उत्कल मदानाची लांबी ४०० कि.मी. इतकी आहे. या किनारपट्टीतच महानदीच्या त्रिभुज प्रदेशाचा समावेश होतो, तसेच ओरिसा किनारपट्टीमध्ये चिल्का सरोवरदेखील आहे. चिल्का सरोवराचा विस्तार ईशान्य नर्ऋत्य असून त्याची लांबी ६५ कि.मी. इतकी आहे. याचे क्षेत्रफळ ७८० चौ.कि.मी. असून, चिल्का सरोवराच्या ईशान्य भागात दया व भार्गवी या नद्या येऊन मिळतात.
२) आंध्र मदान- आंध्र मदानाचा विस्तार उत्तरेकडे उत्कल मदानापासून दक्षिणेकडे पुलिकत सरोवरापर्यंत आहे. आंध्र मदानातून गोदावरी आणि कृष्णा या नद्या वाहतात. कृष्णा आणि गोदावरी नदीच्या त्रिभुज नद्यांच्या दरम्यान कोलेरू सरोवर आहे. कोलेरू सरोवर हे एकमुखाने सागरास जोडलेले आहे.
गोदावरी त्रिभुज प्रदेश- गोदावरी नदी कोलावरम घळईमधून मदानी प्रदेशात प्रवेश करते.
३) पुलिकत सरोवर- आंध्र मदान व तमिळनाडू मदानाच्या सरहद्दीवर पुलिकत सरोवर आहे. तमिळनाडू मदान पूर्व किनारपट्टीस शेवटचा भाग हा तमिळनाडू मदानाचा. या मदानाची लांबी ६७५ कि.मी. असून त्यांची सरासरी रुंदी ही १०० कि.मी. आहे. तमिळनाडू मदानात किनारपट्टीलगत वाळूच्या टेकडय़ा आढळतात. या मदानी प्रदेशातच कावेरी नदीचा त्रिभुज प्रदेश आढळतो. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या दक्षिण टोकाजवळ दलदलीचा प्रदेश निर्माण झाला आहे.
भारतीय बेटे- भारतीय बेट समूहांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते. १) बंगाल उपसागरातील बेटे-अंदमान व निकोबार बेटे
२) अरबी समुद्रातील बेटे ३) अपतट बेटे (Offshore Islands)
१)    अंदमान व निकोबार बेटे- अंदमान व निकोबार बेट समूहाची उत्तर दक्षिण लांबी सुमारे ५९० कि.मी., तर पश्चिम पूर्व रुंदी सुमारे ५८ कि.मी. इतकी आहे. या बेटांचे क्षेत्रफळ ८२४९ चौ. कि.मी. इतके आहे. अंदमान व निकोबार बेट समूह एकमेकांपासून १० अंश खाडीपासून अलग झालेल्या या बेट समूहातील दक्षिण टोक इंदिरा पॉइंट हे आहे. अंदमानपासून पूर्वेकडे असलेली बॅरन आणि नारकोंडम ही दोन ज्वालामुखीय बेटे आहेत. उत्तर अंदमानात असलेले सॅडल शिखर (७३७ मी.) हे येथील सर्वात उंच शिखर आहे.
२)    लक्षद्वीप बेटे- ही प्रवाळजन्य बेटे आहेत. लक्षद्वीप समूहात २७ बेटे असून या बेटांचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ फक्त ३२ चौ.कि.मी. इतके आहे. लक्षद्वीप बेटे ८ अंश अक्षांश खाडीमुळे मालदीव बेटांपासून अलग झालेले आहेत. ही बेटांची उंची कमी असून येथील मिनीकॉय बेट हे सर्वात मोठे बेट आहे.

यूपीएससी : आकलन (Comprehesion) भाग-२
आकलनविषयक प्रश्नांना प्राधान्य द्यावे की सामान्य मानसिक क्षमतेवरील प्रश्न आधी सोडवावेत याबाबतीतदेखील विद्यार्थी संभ्रमात असतात. त्यामुळे ज्यांना मानसिक क्षमता तसेच गणितीप्रक्रियेवरील प्रश्न यांवर गती नसेल त्यांनी आकलनविषयक घटक सर्वप्रथम व अचूक सोडविण्याचा प्रयत्न करावा.
सरावासाठी काही उतारे ( Passage-2)
        The world dismisses curiosity by calling it idle or mere idle curiosity even though curious persons are seldom idle. Parents do their best to extinguish curiosity in their children because it makes life difficult to be faced everyday with a string of unanswerable questions about what makes fire hot or why grass grows. Children whose curiosity survives parental discipline are invited to join our university. With the university, they go on asking their questions and trying to find the answers. In the eyes of a scholar, that is what a university for. some of the questions which the scholars ask seem to the world to be scarcely worth asking, let alone answering. they asked questions too minute and specialised for you and me to understand without years of explanation. If the world inquires of one of them why he wants to know the answer to a particular question he may say especially if he is a scientist, that the answer will in some obscure way make possible a new machine or weapon or gadget. He talks that way because he knows that the world understands and respects utility.
    But to you who are now part of the university, he will say that he wants to know the answer simply because he does not know it, the way the mountain climber wants to climb a mountain, simply because it is there. Similarly a historian asked by an outsider why he studies history may come out with the argument that he has learnt to respect to report on such occasions, something about knowledge of the past making it possible to understand the present and mould the future. But if you really want to know why a historian studies the past, the answer is much simpler, something happened and he would like to know what. All this does not mean that the answers which scholars to find to their enormous consequences but these seldom form the reason for asking the question or pursuing the answers. It is true that scholars can be put to work answering questions for sake of the consequences as thousands are working now, for example, in search of a cure for cancer. But this is not the primary scholars. For the consequences are usually subordinate to the satisfacation of curiosity.
Answers are in bold.
1.    Children whose curiosity survives parental discipline means
    1.    children retaining their curiosity in spite of being discouraged by their parents
    2.    children pursuing their mental curiosity
    3.    children’s curiosity subdued due to parents intervention
    4.    children being disciplined by their parents
2.    According to their passage, the children make life difficult for their parents
    1.    by their ceaseless curiosity
    2.    by unceasing bombardment of questions
    3.    by asking irrelevant questions
    4.    by posing profound questions
3.    The common people consider some of the questions that the scholars ask unimportant
    1.    as they are too lazy and idle
    2.    as they are too modest
    3.    as it’s beyond their comprehension
    4.    as it is considered a waste of time
4.    A historian really studies the past
    1.    to comprehend the present and to reconstruct the future
    2.    to explain the present and plan the future
    3.    to understand the present and make fortune
    4.    to understand the present and mould the future
5.    According to their passage, parents do their best to discourage curiosity in their children
    1.    because they have no time
    2.    because they have no patience to answer them
    3.    because they feel that their children ask stupid questions continuously
    4.    because they are unable to answer all the questions

First Published on March 22, 2014 8:23 am

Web Title: loksatta guidance for upsc mpsc exam article 19
टॅग Mpsc 2,Upsc
Next Stories
1 एमपीएससी : उत्तर भारतीय मैदानी प्रदेश
2 एमपीएससी : उत्तर भारतीय मैदानी प्रदेश
3 एमपीएससी : भारतीय द्वीपकल्पीय पठार
Just Now!
X