तयारी :  
या पेपरमध्ये साधारणपणे खालील विषयांचा समावेश होतो.
१) महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी
२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ
३) राज्य पद्धती व प्रशासन
४) आíथक आणि सामाजिक विकास
५) पर्यावरण
६) सामान्य विज्ञान
१) चालू घडामोडी :
कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा हा महत्त्वाचा गाभा आहे. स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होणाऱ्या परीक्षार्थीना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी होत आहे याचे ज्ञान आवश्यक आहे. चालू घडामोडींसाठी एक स्वतंत्र नोंदवही  तयार करून रोजच्या रोज टिपण काढल्यास फायदा होतो. त्या वहीचे खालीलप्रमाणे भाग करून नियमित वृत्तपत्रातून (उदा. लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस, योजना, कुरूक्षेत्र इ.) टिपणे काढावीत. चालू घडामोडीची तयारी रोज करावी.
२) इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भासह) व भारतीय स्वातंत्र्य चळवळ : या विषयाची व्याप्ती मोठी आहे. कारण इतिहास म्हटला तर त्याचे खालील भाग पडतात. १) प्राचीन भारताचा इतिहास २) मध्ययुगीन भारताचा इतिहास ३) आधुनिक भारताचा इतिहास ४) भारतीय स्वातंत्र्याची चळवळ. आधुनिक भारताचा इतिहास हा कोणत्याही परीक्षेला विचारला जाणारा महत्त्वाचा विभाग आहे. संदर्भग्रंथ : बिपीन चंद्रा, बी. एन. ग्रोव्हर व एन.सी. ई.आर.टी.ची पुस्तके.
याशिवाय प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी महाराष्ट्राचा संदर्भ घेऊन अभ्यास करावा. जर इतिहासासाठी स्वतंत्र वही तयार करून त्यात संक्षिप्त स्वरूपात माहिती, सनावळय़ा इत्यादी लिहून ही वही परत परत वाचल्यास निश्चितच फायदा होतो.
३) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल : एम.पी.एस.सी.च्या सुरुवातीच्या अभ्यासक्रमात फक्त महाराष्ट्राचा व भारताचा भूगोल होता. मात्र बदललेल्या अभ्यासक्रमात जगाचा भूगोल नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. भूगोलावर काही प्रश्न आता विशेषत: नकाशावर विचारले जातात. याचा अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम परीक्षार्थीनी महाराष्ट्राचा व भारत आणि जग यांचा नकाशा घेणे आवश्यक आहे व नकाशा समोर ठेवून अभ्यास करावा.
संदर्भग्रंथ : महाराष्ट्र व भारताचा भूगोल तसेच एन.सी.ई.आर.टी.ची ५वी ते १०वी पर्यंतची पुस्तके वाचावीत.
जगाचा भूगोलाचा अभ्यास करताना सर्वप्रथम जगातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, जगातील वाळवंटे यांची स्वतंत्र सूची तयार करावी व नंतर खंडाप्रमाणे अभ्यास सुरू करावा. जेणेकरून अभ्यास सेपा होईल. उदा. अमेरिका खंड- उत्तर अमेरिका-कॅनडा-दक्षिण अमेरिका इत्यादी. युरोप खंड, आफ्रिका खंड.
संदर्भग्रंथ : जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ यांचे पुस्तक आवश्य वाचावे.
४) पर्यावरण : हा अभ्यासासाठी सर्वात सोपा व मनोरंजक असा विभाग आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी खालील प्रकरणांचा आधार घ्यावा. वातावरणातील बदल, जैवविविधता, पारिस्थितीकी, ग्लोबल वॉìमग, कार्बन क्रेडिट, बायोस्पेअर रिझव्‍‌र्ह, नॅशनल पार्क, ओझोन थराचा क्षय, बायोडायव्हर्सटिी हॉट स्पॉट त्याचप्रमाणे वातावरण बदलासंदर्भात घेण्यात आलेल्या विविध परिषदा. उदा. रिओ परिषद, कानकून परिषद इत्यादी.
५) भारतीय व महाराष्ट्रात राज्यपद्धती व प्रशासन : या घटकावर मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी या घटकाची तयारी चांगली करावी. तयारी करताना दैनंदिन घडामोडींचा संदर्भ घ्यावा. प्रथम भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घ्यावी. निरनिराळय़ा घटना दुरुस्त्या, भारतीय राज्य प्रणाली, पंचायत राज, ७३ वी घटना दुरुस्ती, ७४ वी घटना दुरुस्ती, पंचायतराज व नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यायिक प्रणाली, निरनिराळे आयोग, त्यांचे कार्य, केंद्रीय व राज्यस्तरावर नियुक्त केलेल्या निरनिराळय़ा समित्या यांचा अभ्यास करावा.
संदर्भग्रंथ : के. लक्ष्मीकांत, सुभाष कश्यप, भा. ल. भोळे, घांगरेकर यांची पुस्तके.
६) आर्थिक व सामाजिक विकास : अभ्यासक्रमात भारतीय अर्थव्यवस्था याऐवजी आर्थिक व सामाजिक विकास हा शब्द वापरला आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू शकतो. हा विभाग परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. अभ्यास करताना अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याव्यात. त्याचप्रमाणे जुन्या अभ्यासक्रमात असलेल्या पंचवार्षकि योजना, बँक प्रणाली, आयात-निर्यात धोरण, कर प्रणाली, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, उदा. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, दारिद्रय़ निर्मूलन, रोजगार निर्मिती यांचादेखील अभ्यास करावा. शाश्वत विकास, लोकसंख्या, सामाजिक क्षेत्र, भारत व महाराष्ट्राची कृषी व्यवस्था व सहकार इ. संदर्भ ग्रंथ : इंडिया इअर बुक, दत्त आणि सुंदरम् किंवा प्रतियोगिता दर्पणचा भारतीय अर्थव्यवस्था (विशेषांक) .
७) सामान्य विज्ञान : यामध्ये १) जीवशास्त्र, २) भौतिकशास्त्र, ३) रसायनशास्त्र व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या विविध घटनांशी संबंधित असलेल्या सामान्य विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. शास्त्रीय घटकांचा जास्त अभ्यास करू नये. उदा. रसायनशास्त्रातील निरनिराळय़ा अभिक्रिया, जीवशास्त्रातील प्राणिविज्ञान इत्यादी. मात्र जीवशास्त्राचा एक भाग म्हणजे शरीरशास्त्राशी संबंधित निरनिराळे आजार, त्यासाठी वापरात असलेली औषधे आदींचा अभ्यास व्यवस्थित करावा. याशिवाय ऊर्जा, ऊर्जा समस्या, भारताची संरक्षण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करावा.

यूपीएससीची तयारी महाविद्यालयापासूनच..
महाविद्यालयाची भूमिका :
१२ वीची परीक्षा संपल्यानंतर जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये येतात, तेव्हा तिथल्या मुक्त वातावरणात विद्यार्थी बऱ्याचदा भरकटण्याची शक्यता असते. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर लेक्चर्स न बसणे हा अलिखित नियम झालेला असतो. जेव्हा महाविद्यालय संपत येते, तेव्हा लक्षात येते की आपण चांगल्या भविष्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावयास हवी, त्यात एखाद्या यशस्वी उमेदवाराची मुलाखत वाचून आपण जास्तच प्रभावित होतो. पुस्तकांच्या दुकानात जातो, पुस्तक घेऊन येतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो. मात्र अभ्यासाची सवय कधीच सुटलेली असते, अध्र्या तासात पाठ दुखावयास लागते, सर्व शक्ती एकवटून अभ्यासाला सुरुवात करतो, स्पर्धा परीक्षा समजून घ्यावयास पुढचे दोन वर्षे निघून जातात. अगदी गणिताच्या भाषेत बोलावयाचे झाल्यास पुढची पाच वर्षे निघून जातात. वाढलेले वय, आपण काही करावे यासाठी पालकांकडून वाढणारा दबाव, यामुळे विद्यार्थी आणखी भरकटत जातो. अशी अवस्था महाराष्ट्रातील खूपशा विद्यार्थ्यांची आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर इ. शहरांचा विचार बाजूला ठेवला तर उर्वरित महाराष्ट्रात विद्यार्थ्यांची वाट अधिकच बिकट आहे, नव्हे ती आपणच केली आहे.
स्पर्धा परीक्षेत विशेषत: संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी परीक्षेत पास होण्यासाठी म्हणजे आय.ए.एस., आय.पी.एस. होण्याची क्षमता महाराष्ट्रीयन तरुणांमध्ये ठासून भरलेली आहे. एम.पी.एस.सी. किंवा यू.पी.एस.सी. या परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच झाल्यानंतर तर परिस्थिती जास्तच अनुकूल झाली आहे. मात्र खेदाची गोष्ट ही आहे, की महाविद्यालयाच्या तीन किंवा चार वर्षांच्या दरम्यान जी तयारी व्हावयास हवी ती होत नाही. यू.पी.एस.सी. किंवा एम.पी.एस.सी. परीक्षेच्या तयारीसाठी ही तीन वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात आणि त्यांचा योग्य प्रकारे वापर व्हावा. या परीक्षेसाठी लागणारा अभ्यास म्हणजे इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, सायन्स, अर्थशास्त्र यांचा अभ्यास अत्यंत सविस्तरपणे महाविद्यालयामध्ये होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी माझ्याकडे यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षेच्या भूगोल या वैकल्पिक विषयाचे मार्गदर्शन घेण्यासाठी आला. त्याने आधी दोन वेळा मुख्य परीक्षा लिहिली होती. तो ज्या महाविद्यालयामधून आला होता, त्या महाविद्यालयामधील भूगोल विभागाच्या जवळजवळ सर्व प्राध्यापकांना मी चांगले ओळखत होतो. त्यातील काही प्राध्यापक खूपच तज्ज्ञ होते. सहज मी त्या विद्यार्थ्यांला प्रश्न विचारला, की त्याने महाविद्यालयामध्ये असताना किंवा महाविद्यालय संपल्यानंतर त्या प्राध्यापकांची का मदत घेतली नाही, तेव्हा उत्तर मिळाले की त्यांना यूपीएससीबद्दल विशेष माहिती नाही. मान्य आहे त्यांना यूपीएससी परीक्षेबद्दल विशेष माहिती नसेल, परंतु यूपीएससी परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी त्या विद्यार्थ्यांने जो वैकल्पिक विषय घेतला होता, त्याचे ज्ञान मात्र त्यांच्याकडे खूपच चांगले होते. फक्त मुख्य परीक्षेचा त्या विषयाचा अभ्यासक्रम त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांच्याकडून खूप चांगली मदत होऊ शकली असती आणि जर त्याने हाच अभ्यास महाविद्यालयामध्येच पूर्ण केला असता तर यश मिळण्याची शक्यता जास्त निर्माण झाली असती.
यूपीएससीच्या तयारीसाठी महाविद्यालयाची कशी मदत होऊ शकते ?
*  महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यापासून म्हणजे पदवीच्या प्रथम वर्षांपासूनच अभ्यासाला सुरुवात करावी, म्हणजे येणाऱ्या तीन किंवा चार वर्षांत यूपीएससीची तयारी खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते.
*  यूपीएससी व एमपीएससी परीक्षेच्या पूर्व व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व्यवस्थित समजला नाही तर संबंधित विषयांच्या प्राध्यापकांकडून समजून घ्यावा. अभ्यासक्रमासंबंधी पुस्तकं आपल्या ग्रंथालयात उपलब्ध असतील तर त्यांचे वाचन करावे, याशिवाय इतर पुस्तकांचेही वाचन करावे.
* या काळात इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण यूपीएससी परीक्षा जरी मराठीत देता येत असली तरी इंग्रजीचे महत्त्व कमी होत नाही. निवड झाल्यानंतर प्रशासकीय कामात बऱ्याच वेळा इंग्रजीचा संबंध येणारच असतो, याशिवाय यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत काही उतारे फक्त इंग्रजीमध्ये असतात व मुख्य परीक्षेत ३०० गुणांचा एक इंग्रजीचा पेपर लिहावाच लागतो. जरी त्या गुणांचा वापर अंतिम यादीसाठी केला जात नसला तरी हा पेपर पास होणे आवश्यक आहे. पास झालो नाही तर इतर पेपर तपासले जात नाहीत, म्हणजे आपण परीक्षेत अपयशी  ठरतो.
* संघ लोकसेवा आयोगाच्या तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी गणित  हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यूपीएससीच्या प्रारंभिक परीक्षेसाठी सी सॅटचा जो दुसरा पेपर आहे त्यात गणिताचा हा घटक येतो. जरी हा पेपर फक्त गणितावरच आधारित नसला, तरी ज्या विद्यार्थ्यांची गणितावर पकड घट्ट असते, त्यांना हा पेपर सोडविताना अडचण होत नाही व त्यांना या पेपरमध्ये जास्तीतजास्त गुण मिळवून, मुख्य परीक्षेसाठीचा मार्ग सोपा होतो.
* कोठून सुरुवात करावी या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एन.सी. ई.आर.टी.ची इ. ५ वी ते १० वी पर्यंतची सर्व विषयांची पुस्तके सर्वप्रथम वाचून टाकावीत. पदवी झाल्यानंतर या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा पदवीचे शिक्षण घेत असतानाच ही पुस्तके वाचली असतील, त्यातील मूलभूत संकल्पना समजून घेतल्या असतील तर पुढचा अभ्यास करणे जास्त सोपे होते.
महाविद्यालयामध्ये असतानाच इतिहास, भूगोल, भारतीय संविधान, अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास करून ठेवावा. जमल्यास त्यांच्या नोट्स तयार करून ठेवाव्यात.

Selection list of eligible students for NMMMS scholarship announced Pune
 ‘एनएमएमएमएस’ शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर… किती विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती?
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
Changes in Joint Entrance Examination Main Exam Dates by National Examination Authority Pune news
‘जेईई मुख्य’च्या तारखांमध्ये बदल
Release of candidates
वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांतून उमेदवारांची सुटका, आता एकाच परीक्षेतून प्रवेशाची संधी