26 February 2020

News Flash

एमपीएससी : रिझव्‍‌र्ह बॅंक ऑफ इंडिया-२

RBI कायदा १९३४ च्या सेक्शन १७ (८) नुसार RBIला खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी-विक्री करता येतो. या कलमानुसार RBI केंद्र तसेच राज्य सरकारांच्या

| March 7, 2014 10:56 am

४) खुल्या बाजारातील रोख्यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार (ओ एम.ओ) : RBI कायदा १९३४ च्या  सेक्शन १७ (८) नुसार RBIला खुल्या बाजारातील रोख्यांची खरेदी-विक्री करता येतो. या कलमानुसार RBI केंद्र तसेच राज्य सरकारांच्या कोणत्याही मुदतीच्या सरकारी रोख्यांची तसेच संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रोख्यांची खरेदी-विक्री खुल्या बाजारात करू शकते. सध्या RBIफक्त केंद्र सरकारच्या रोख्यांची खरेदी-विक्री करते.
व्यापक अर्थाने खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे मध्यवर्ती बँकेने, सरकारी रोखे ,व्यापारी हुंडय़ा, परकीय चलन, सोने इ.ची केलेली खरेदी-विक्री. पण संकोचित अर्थाने मध्यवर्ती बँकेने सरकारी कर्जरोख्यांची खरेदी-विक्री म्हणजेच खुल्या बाजारातील व्यवहार होय.
खुल्या बाजारातील खरेदी-विक्रीच्या आधारे RBI रोख पशांचे अल्पकालीन नियमन करते.
* जेव्हा RBI रोखे विक्रीसाठी काढते, तेव्हा बँक, बँकेतर संस्था ते रोखे विकत घेतात. अशा रीतीने बँकेकडील पसा RBI कडे जमा होतो, त्यामुळे एकंदर बँकेजवळील रोख रक्कम कमी होते. त्यामुळे त्यांची पतनिर्मितीची क्षमता कमी होऊन पतसंकोच घडून येतो. तेजीच्या काळात RBI रोख्यांची विक्री करते.
* जेव्हा RBIखुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी करते, तेव्हा ग्राहक, बँका हे रोखे RBI ला विकतात. त्यामुळे बँकेजवळील रक्कम वाढून पतनिर्मिती क्षमता वाढते व पतविस्तार घडून येतो. मंदीच्या काळात RBIअशा रोख्यांची खरेदी करते.
५)  रेपो व्यवहार : RBIकडून रेपो रेट या साधनाचा १९९२ पासून उपयोग केला जात आहे. रेपो याचा अर्थ ( Repurchase Obligation) किंवा पुनर्खरेदी बंधन असा होतो. रेपो रेट म्हणजे व्यापारी बँका त्यांच्याकडील रोख रकमेतील राखीव निधी अल्पकाळासाठी ज्या व्याजदराने RBIकडे ठेवतात, तो व्याज दर होय. रेपो व्यवहारांतर्गत RBIव्यापारी बँकांकडून सरकारी रोखे खरेदी करून त्यांना कर्ज देतात, ही कर्जे सध्या एक दिवसाची कर्जे असतात, म्हणजेच दुसऱ्या दिवशी बँका रोख्यांची पुनर्खरेदी करून RBI ला कर्ज परत करतात.
रेपो व्यवहारांमुळे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढून बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढते. चलनवाढीच्या परिस्थितीत RBI रेपो दर वाढवतात. त्यामुळे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता होऊन बँकांची ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता घटते. याउलट चलन घटीच्या परिस्थितीत रिझव्‍‌र्ह बँक रेपो दर कमी करून कर्ज स्वस्त बनवतात. त्यामुळे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढते व बँकांची ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता वाढते.
६) रिव्हर्स रेपो व्यवहार : व्यापारी बँकांची पतनिर्मिती तसेच अर्थव्यवस्थेतील रोखता नियंत्रित करण्यासाठी RBI रिव्हर्स रेपो रेटचा वापर करते. या अंतर्गत व्यापारी बँका RBIकडून सरकारी रोखे खरेदी करून तिला कर्ज देतात. ही कर्जेसुद्धा एका दिवसाची कर्जे असतात. म्हणजेच दुसऱ्या दिवशी RBI पुनर्खरेदी करून व्यापारी बँकांची कर्जे परत करते. या व्यवहाराला रिव्हर्स रेपो व्यवहार तसेच कर्जदाराला रिव्हर्स रेपो दर असे म्हणतात.
रिव्हर्स रेपो व्यवहारांमुळे बँकांच्या हातातील अल्पकालीन रोखता कमी होते, त्यामुळे कर्ज देण्याची क्षमता कमी होते. चलनवाढीच्या परिस्थितीत RBI रिव्हर्स रेपो दर वाढवते. बँकांनी RBIला जास्त कर्जे द्यावीत व परिणामी बँकांच्या हातातील रोखता कमी व्हावी, हा त्यामागील उद्देश असतो. त्यामुळे बँकांची आपल्या ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता कमी होते. चलन घटीच्या परिस्थितीत RBI बँक रिव्हर्स रेपो दर कमी करते, त्यामुळे बंॅका RBI ला कमी कजेर्ं देतात, परिणामत: बंॅकेच्या हातातील अल्पकालीन रोखता वाढते, त्यामुळे बँकांची आपल्या ग्राहकांना कर्ज देण्याची क्षमता वाढते. मे २०११ पर्यंत रिव्हर्स रेपो दर हा स्वतंत्र दर होता. मात्र ३ मे २०११ रोजी RBIच्या मौद्रिक धोरणात RBI ने असा निर्णय घेतला की यापुढे रिव्हर्स रेपो दर हा स्वतंत्रपणे घोषित केला जाणार नाही, तर तो रेपो दराशी जोडला असेल.
पतनियंत्रणाची गुणात्मक साधने :
या साधनांचा हेतू हा पतचलनाचे आकारमान निश्चित करणे असा नसतो, तर देशातील अर्थव्यवस्थेस हानिकारक ठरतील अशा क्षेत्राकडे उदा. सट्टेबाजी, अनावश्यक वस्तूंचे उत्पादन यांकडून पतचलनाचा पुरवठा रोखणे व त्याचा उपयोग अर्थव्यवस्थेतील विविध उत्पादक क्षेत्रांकडे उदा. शेती उदय़ोग, दळणवळण इ. करून घेणे. यात उपभोग कर्जाचे नियंत्रण, कर्जाचे रेशिनग, प्रत्यक्ष कारवाई, आदेशाद्वारे नियंत्रण, कर्ज रक्कम व तारण मूल्य यातील गाळा ठरविणे यांचा समावेश होतो. बॅकिंग नियमन कायदा १९४९ च्या सेक्शन २१ व ३५ ए नुसार RBI गुणात्मक साधनांचा वापर करते.
गुणात्मक साधनांची मर्यादा – केवळ गुणात्मक साधनांद्वारे चलनवाढ थांबता येत नाही. २)  विविध वस्तूंची टंचाई ही चलनवाढीचे कारण असल्याने गुणात्मक पतनियंत्रण साधने परिणामकारक ठरत नाहीत. ३) भारतात स्वत:च्या भांडवलावर साठेबाजी व सट्टेबाजी चालते. त्यामुळे गुणात्मक नियंत्रण प्रभावी ठरत नाही.
४) या साधनांचा वापर जर संख्यात्मक साधनांबरोबर झाला तरच ते उपयुक्त ठरते.
RBI चे व्यवस्थापन
मुख्य कार्यकारी अधिकारी – गव्हर्नर, हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो, त्याची नेमणूक केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांसाठी केली जाते. RBI चे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ हे होते ( १ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७ ) तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते.
RBIच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मध्यवर्ती संचालक मंडळाकडे असते. या मंडळात २० सदस्य असतात. यांपकी एक गव्हर्नर व चार डेप्युटी असतात. डेप्युटी गव्हर्नर यांची नेमणूकदेखील केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांसाठी केली जाते. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नर यांचे निवृत्तीचे वय ६२ वष्रे आहे व इतर सर्व कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वष्रे आहे.

यूपीएससी : आवर्त आणि प्रत्यावर्त
आवर्त आणि प्रत्यावर्त-
आवर्त : एखाद्या प्रदेशात केंद्रस्थानी अत्यंत कमी भार निर्माण झाल्यास व त्याभोवती सर्व दिशांनी वायुभार वाढल्यास सभोवतालच्या भागातून वारे हे कमी दाबाच्या मध्यवर्ती केंद्राकडे चक्राकार गतीने वाहू लागतात, त्यांना आवर्त वारे म्हणतात. उत्तर गोलार्धात आवर्त वारे घडय़ाळाच्या काटय़ाच्या विरुद्ध दिशेने तर दक्षिण गोलार्धात घडय़ाळाच्या काटय़ांच्या दिशेने वाहतात. आवर्तच्या केंद्रस्थानी असलेल्या कमी भाराच्या पट्टय़ाला च्रकीवादळाचा डोळा म्हणतात.
 आवर्त ज्या ठिकाणी निर्माण होतात. त्यावरून त्यांचे दोन प्रकार पडतात.
अ) समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त, ब) उष्णकटिबंधीय आवर्त
अ) समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त (Temprarate Cyclons): या पट्टय़ात या आर्वतांची निर्मिती होते म्हणजे ३५अंश ते ६५अंश या दरम्यान दोन्ही गोलार्धात या आर्वतांची निर्मिती होते.
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताचे वैशिष्टय़ :
* समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होणारी ही आवर्त जमिनीचा एखादा भाग अत्यंत तप्त झाल्यास तेथील हवेचा भार कमी होतो व या कमी भाराच्या केंद्राकडे वारे आकर्षले  जाऊन समशीतोष्ण आवर्ताची निर्मिती होते. समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त ही हिवाळ्यात जास्त प्रमाणात निर्माण होतात.
*  हे आवर्त विशाल असतात. या आवर्ताचा विस्तार २००० किमी इतका असू शकतो.* समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तात केंद्रभागाजवळील हवेचा दाब व कडेच्या भागातील हवेचा दाब यांच्यात फारसा फरक नसतो.*  या आवर्तातील केंद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग कमी असल्याने विध्वंसक चक्रीवादळे निर्माण होत नाही. हवा एकसारखी वर ढकलली जात असल्याने आवर्तपर्जन्यांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होते.* हे आवर्त पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतात. मात्र त्यांचा वेगवेगळ्या ऋतूंमध्ये बदलेला असतो.
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताचा प्रदेश :
* उत्तर अटलांटिक क्षेत्र : हा या आवर्ताचा मुख्य प्रदेश आहे. ग्रीनलँडकडून येणाऱ्या शीत वायुराशी व दक्षिणेकडून येणाऱ्या उबदार वायुराशी एकमेकांशी भिडतात. ही आर्वत उत्तर अटलांटिकमधून पश्चिम युरोपकडे वाहतात.* उत्तर पॅसिफिक क्षेत्र : अटलांटिकप्रमाणेच येथे ही अ‍ॅल्युशियनकडून पूर्वेकडे वाहणारे व कॅनडा व संयुक्त संस्थानात शिरणारे आवर्त आढळतात.* भूमध्य सागरी क्षेत्र : आल्प्सवरील शीत हवा आणि भूमध्य समुद्रामधील उबदार हवा यांमुळे या भागात समशीतोष्ण आवर्ताची निर्मिती होते.* चीन समुद्र : हिवाळ्यात या भागात आवर्ताची निर्मिती होते. यांमुळे चीनचा मध्य भाग व उत्तर भागात या आवर्ताचा प्रभाव जाणवतो.
ब) उष्णकटिबंधीय आवर्त : (Tropical Cycolns) :  विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे ६अंश ते ३०अंश अक्षवृत्ताच्या प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्त आढळतात. समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तपेक्षा उष्णकटिबंधीय आवर्ताचे स्वरूप भिन्न असते.पश्चिम पॅसिफिकमध्ये टायफून (Typhoon), अटलांटिकमध्ये हरीकेन (Hurricane),  पूर्व पॅसिफिकमध्ये बिग विंड (Bigwind), फिलिपिन्समध्ये बागुइओ (Baguio), ऑस्ट्रेलियात विली विलीस (Willy – Willies), तर भारतात चक्रीवादळे असे म्हणतात.
उष्णकटिबंधीय आवर्ताची वैशिष्टय़े :
* उष्णकटिबंधीय आवर्त ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात निर्माण होतात.ा उष्णकटिबंधात निर्माण होणाऱ्या आवर्ताचा विस्तार तुलनेने कमी असतो. यांचा व्यास साधारणत: ८अंश ते ३२अंश किमी इतका असतो.* केंद्रभागावरील हवेचा दाब व कडेच्या भागातील हवेचा दाब यांमध्ये खूप फरक असतो.
*चक्रीवादळांचा वेग समुद्रावर जमिनीच्या मानाने जास्त असतो.* ही आवर्त वर्तुळाकार असतात. या आवर्तामध्ये पाऊस पडतो.
* या आवर्तापाठोपाठ प्रत्यार्वत येत नाहीत.* ही आवर्त प्रामुख्याने व्यापारी वाऱ्यांच्या क्षेत्रात म्हणजे ही आवर्त पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतात.
उष्ण कटिबंधीय आवर्ताचे क्षेत्र :
१) अटलांटिक समुद्रात (वेस्ट इंडिज) व संयुक्त संस्थानात फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर निर्माण होतात, ती हरीकेन या नावाने ओळखली जातात. जपान, चीन व फिलिपिन्स बेटांच्या समूहांत पॅसिफिकमध्ये ही आवत्रे निर्माण होतात, त्यांना टायफून म्हणतात. हिंदी महासागरात, ऑस्ट्रेलियाचा उत्तर किनारा, आफ्रिकेचा पूर्व किनारा आणि भारताच्या पूर्व-पश्चिम किनाऱ्यावरही अशी आवर्ती वादळे निर्माण होतात.
 प्रत्यावर्त :  एखाद्या ठिकाणी जास्त भाराचा प्रदेश असेल, तर त्याच्या केंद्र भागाकडून त्याच्या सर्व दिशेला वारे वाहू लागतात. या प्रकारच्या वायुभार वितरणास प्रत्यार्वत असे म्हणतात. प्रत्यावर्त हे प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधीय पट्टय़ात म्हणजे ३५अंश ते ६५अंश दरम्यान निर्माण होतात. समशीतोष्ण कटिबंधीय पट्टय़ात हिवाळ्यात भूभाग अत्यंत थंड होत असल्याने तेथे जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो व तेथील वारे बाहेर वाहू  लागतात.
खारे वारे आणि मतलई वारे : १) खारे वारे (Sea Breeze) : दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन लवकर तापते, त्यामानाने पाणी उशिरा तापते. त्यामुळे समुद्रालगतच्या जमिनीवर हवेचा दाब कमी असतो तर समुद्रावर हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा समुद्रावरून जमिनीकडून वारे वाहतात. त्यांना खारे वारे म्हणतात. २) मतलई वारे (Land Breeze) : रात्री समुद्राच्या मानाने जमीन लवकर थंड होते आणि समुद्रातील पाणी मात्र उबदार असते. त्यामुळे सागरावर कमी वायुभार व जमिनीवर जास्त वायुभार असतो, परिणामी जमिनीकडून पाण्याकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. हे वारे थंड आणि कोरडे असतात व त्यांचा वेगदेखील मंद असतो.

First Published on March 7, 2014 10:56 am

Web Title: loksatta guidance for upsc mpsc exam article 5
टॅग Mpsc 2,Upsc
Next Stories
1 एमपीएससी – रिझव्‍‌र्ह बॅंक ऑफ इंडिया- ५
2 एमपीएससी अर्थशास्र
3 एमपीएससी सामान्य अध्ययन पेपर १
Just Now!
X