उत्तम वेतन आणि मान मिळतो अशा करिअरमध्ये वैमानिकांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नामांकित संस्थांतर्फे चालविण्यात येणाऱ्या वैमानिक प्रशिक्षणक्रमांची माहिती-
* सीएई ऑक्सफर्ड एविएशन अकॅडेमी :
सीएई ऑक्सफर्ड एविएशन अकॅडेमीने गोंदिया येथे १९ महिने कालावधीचा वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. व्यावसायिक विमाने चालवण्यासाठी आवश्यक असलेले वैमानिक प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाते. हा अभ्यासक्रम डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एविएशनने निश्चित केलेल्या मानकानुसार आहे. हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवाराला कमíशअल पायलट लायसन्स प्रदान केले जाते. यामध्ये इन्स्ट्रमेंट रेटिंग आणि मल्टिइंजिन रेटिंगचाही समावेश आहे. ही संस्था एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे.
अर्हता- उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असावे. बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि इंग्रजी या विषयांमध्ये किमान ५५ टक्केगुण प्राप्त असावेत. उमेदवाराला इंग्रजीमध्ये सराईतपणे लिहिता-बोलता आले पाहिजे. उमेदवार वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त असावा.
 निवड प्रक्रिया- या अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात लेखी चाचणी, दुसऱ्या टप्प्यात दोन ऑनलाइन चाचण्या, मुलाखत, मानसशास्त्रीय चाचणी व उमेदवाराचा कल आणि शारीरिक क्षमतेची चाचणी केली जाते. तिसऱ्या टप्प्यात समूह चर्चा आणि व्यक्तिगत मुलाखती घेतल्या जातात. प्रशिक्षण मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये सुरू होते.
पत्ता- सीएई ऑक्सफर्ड एविएशन अकॅडेमी, नॅशनल फ्लाइंग ट्रेिनग इन्स्टिटय़ूट, एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया, बिर्सी एअरपोर्ट, पोस्ट ऑफिस- पारसवाडा, गोंदिया- ४४१६१४.
ई-मेल- gondiaacademy@cae.com
वेबसाइट- http://www.caeoaa.com/gondia
* इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अकॅडेमी :
केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडेमीमध्ये खालील अभ्यासक्रम उपलब्ध आहे-
=    कमर्शिअल पायलट लायसन्स कोर्स :
या अभ्यासक्रमाचा कालावधी दीड वर्षांचा आहे. यात प्रामुख्याने जमिनीवरील आणि हवेतील प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना कमíशअल पायलट लायसन्स प्रदान केले जाते.  
 अर्हता- हा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांला बारावीच्या विज्ञान परीक्षेत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांमध्ये सरासरी ५५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना
५० टक्के गुण मिळायला हवे. सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात स्वतंत्रपणे उत्तीर्ण व्हावे लागेल. वयाची किमान १७ वर्षे पूर्ण केली असावीत.
प्रवेश परीक्षेचे टप्पे- निवडीसाठी दरवर्षी जून महिन्यात दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, रायबरेली आणि मुंबई या केंद्रांवर प्रवेशपरीक्षा घेतली जाते. याची माहिती जाहिरातीद्वारे दरवर्षी एप्रिल/ मे महिन्यात दिली जाते. सुरुवातीच्या टप्प्यात लेखी परीक्षा होते. लेखी परीक्षेच्या गुणांवर आधारित तयार केलेल्या गुणवत्ता यादीतील निवडक विद्यार्थ्यांना पायलट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट आणि सायकोमेट्रिक चाचणीसाठी बोलावले जाते. या चाचण्या जुल महिन्यात रायबरेली येथे घेतल्या जातात. या चाचणीमध्ये राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना गुणांमध्ये कोणतीही सवलत दिली जात नाही. मुलाखती संस्थेच्या रायबरेली कॅम्पसमध्ये घेतल्या जातात. यानंतर मुलाखती घेतल्या जातात.
या अभ्यासक्रमाला एकूण १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. केंद्र सरकारच्या नियमानुसार अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी जागा राखीव ठेवण्यात येतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग संवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गापेक्षा
५ टक्केगुणांची सवलत दिली जाते. मात्र ही सवलत दिल्यानंतरही या संवर्गातील विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत तर त्या जागा खुल्या संवर्गाला खुल्या केल्या जातात.
शुल्क : या अभ्यासक्रमाचे शुल्क ३२ लाख ५० हजार रुपये आहे. याशिवाय गणवेश, अभ्यासाचे साहित्य, नेविगेशन कॉम्प्युटर, हेड फोन, परीक्षा आणि पायलट परवाना शुल्क यासारख्या बाबींसाठी आणखी एक लाख रुपये भरावे लागतात. हे शुल्क चार टप्प्यांमध्ये भरण्याची सवलत दिली जाते. पत्ता- द डायरेक्टर, इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडमी, फुरसतगंज एअर फिल्ड, रायबरेली- २२९३०२.
वेबसाइट- http://www.igrua.gov.in
ई-मेल- admissions@igrua.in
* छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ, कानपूर :
बॅचलर ऑफ सायन्स इन एविएशन या अभ्यासक्रमाचा पर्यायसुद्धा विद्यार्थी स्वीकारू शकतात. तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम कानपूरच्या छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठामार्फत चालवला जातो. कमर्शिएल पायलट कोर्सच्या समांतर असा हा अभ्यासक्रम आहे.
* द बॉम्बे फ्लाइंग क्लब :
द बॉम्बे फ्लाइंग क्लबने वैमानिक प्रशिक्षण आणि एअरक्राफ्ट दुरुस्ती देखभालीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या संस्थेला केंद्र सरकारची मान्यता आहे.
संस्थेचे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
=    कमर्शिअल पायलट लायसन्स – कालावधी साधारणत: ८ ते १० महिन्यांचा भरतो. भौतिकशास्त्र आणि गणित विषयात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येईल. या दोन्ही विषयांत किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक. इंग्रजीवर प्रभुत्व असल्यास उत्तम.
=    बॅचरल ऑफ सायन्स इन एविएशन अ‍ॅण्ड कमíशअल पायलट- अभ्यासक्रमाचा कलावधी- ३ वष्रे. अर्हता- भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमात जमिनीवरील प्रशिक्षण, हवाई प्रशिक्षण आणि हवामानशास्त्राचा समावेश आहे. कमíशअल लायसन्स पायलटचा परवाना मिळण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता या अभ्यासक्रमामुळे प्राप्त होते. हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. हवाई प्रशिक्षण जुहू (मुंबई) आणि धुळे इथे दिले जाते. या अभ्यासक्रमाचे शुल्क सुमारे २० लाख रु. आहे.
पत्ता- द बॉम्बे फ्लाइंग क्लब, जुहू एरोड्रम, जुहू, विलेपाल्रे, मुंबई- ५६.
वेबसाइट- http://www.bfcaviation.com/
http://www.thebombayflyingclub.com
ई-मेल- bfc24@mtnl.net.in

नया है यह!
डॉक्टोरल वर्क इन क्रिमिनॉलॉजी अ‍ॅण्ड पोलीस सायन्स-  हा संशोधनात्मक अभ्यासक्रम केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या अंतर्गत कार्यरत ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने सुरू केला आहे. अर्हता- ५५ टक्के गुणांसह समाजशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, मानसशास्त्र, सामाजिक कार्य, लोक प्रशासन, राज्यशास्त्र यापकी कोणत्याही एका विषयातील पदव्युत्तर पदवी. कालावधी- ३ वष्रे. पत्ता- द डायरेक्टर जनरल, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, ब्लॉक नंबर- ११, चौथा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, न्यू दिल्ली- ११०००३. वेबसाइट- http://www.bprd.nic.in
 सुरेश वांदिले – ekank@hotmail.com