टीप-टॉप प्लाझामध्ये बुधवारी संध्याकाळी पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात ‘लोकसत्ता’ ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमधील गेल्या तीन दिवसांच्या विजेत्यांना समारंभपूर्वक पारितोषिके प्रदान करण्यात आली. टीप-टॉप प्लाझाचे रोहित शहा आणि ‘लोकसत्ता’ जाहिरात विभागाचे महाव्यवस्थापक तरुणकुमार तिवाडी यांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या शहरांमधील ७५ दुकानांमध्ये खरेदी केलेल्या ग्राहकांपैकी भाग्यवान विजेत्यांना वामन हरी पेठे सन्स (ठाणे) यांच्याकडून सोन्याची राजमुद्रा, चांदीची नाणी, कलानिधी-ठाणे तर्फे  पैठणी साडी, पॅपिलॉन-ठाणेकडून मोबाइल संच, कलानिधी-ठाणे, वर्ल्ड ऑफ टायटन (कल्याण-डोंबिवली), रेमंड (डोंबिवली-कल्याण-उल्हासनगर), ऑरबिट-द मेन्स प्लॅनेट (कल्याण) यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर्स आणि वीणा वल्र्ड (ठाणे-डोंबिवली)कडून गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहेत.
सहभागी व्हा
आणि जिंका…
ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या पारितोषिकांचा लाभ मिळू शकेल. बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे एक कूपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कूपन्स ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कूपन्स संकलित करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येत आहेत. त्यातून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्याची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरांतील दुकानदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

विजेत्यांच्या प्रतिक्रिया..

‘लोकसत्ता’ने दिलेली अनपेक्षित भेट...
‘लोकसत्ता’चे आम्ही खूप जुने वाचक आहोत. त्यामुळे आपल्या वर्तमानपत्राकडून मिळालेले हे पारितोषिक जितके अनपेक्षित तितकेच आनंददायी होते. या खरेदी उत्सवामुळे ‘लोकसत्ता’शी असणारे ऋणानुबंध अधिक दृढ झाले आहेत.
मानसी धारप, ठाणे. पैठणी विजेत्या

खूपच आनंद वाटतोय…
प्रजासत्ताक दिन आमच्यासाठी भाग्याचा ठरला असून त्या दिवशी केलेल्या खरेदीमुळे हे पारितोषिक मिळाले. पारितोषिकाचा अनुभव छान आणि आनंददायक आहे.
अश्विनी सोनसळे, राजमुद्रा विजेत्या

सुखद धक्का
दुकानांमध्ये या, खरेदी करा आणि जिंका ही ‘लोकसत्ता’ची संकल्पना खूपच आकर्षक आहे. खरेदीपूर्वी या फेस्टिव्हलची माहिती नव्हती. बिल दिल्यानंतर मिळालेले कूपन भरले आणि हे पारितोषिक मिळाले, हा सुखद धक्काच आहे.
 मंजिरी केळकर, ठाणे गिफ्ट व्हाऊचर विजेत्या