ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि उल्हासनगर शहरातील ७५ पेक्षाही जास्त दुकानांमध्ये ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची धूम सुरू असून ‘खरेदी करा आणि जिंका’ या संकल्पनेमुळे ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी उसळू लागली आहे. दर दिवशी बक्षिसांची लयलूट करण्याची संधी ग्राहकांना मिळत असून २८ आणि २९ जानेवारीच्या भाग्यवान विजेत्यांना शनिवारी  सन्मानित करण्यात येणार आहे. वीणा वर्ल्डच्या ठाणे कार्यालयात सायंकाळी हा कार्यक्रम होणार आहे.  
खरेदी करा आणि जिंका..
ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी झालेल्या दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी करणारे भाग्यवान ग्राहक बक्षिसांचे विजेते ठरत आहेत. खरेदीचे बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे एक कुपन दिले जाईल. ते भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. अर्धवट माहिती भरलेल्या कुपन्स ग्राह्य़ धरल्या जाणार नाहीत. दररोज ड्रॉप बॉक्समधून कुपन्स संकलित करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येत आहेत. त्यातून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल. प्रत्येक भाग्यवान विजेत्याची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील. ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरांतील दुकानदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.
लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचे विजेते..
स्मिता जोशी (कल्याण), श्रेया सामंत (ठाणे), माधव नगनुर (ठाणे), सुभाष साळुंखे (ठाणे), प्रशांत निसोल (नाशिक), माधवी पाटील (ठाणे)
सरोज करमरकर (ठाणे), प्रीती मोडक (मुलुंड), सरिता आराध्ये (कल्याण), वीणा सावले (ठाणे), सतीश पाटील (भिवंडी), राजेश सगम (ठाणे), स्वप्नाली जोशी (ठाणे), एम.पी.किस्मतराव (अंबरनाथ).