१९९५ ते २००१ या कालावधीत एका कंपनीने केलेली आयात आणि निर्यात यांचे प्रमाण
खालील रेषाकृतीत दर्शवले आहे-  
=    खालीलपकी कोणत्या वर्षी, आयात ही निर्यातीच्या कमी प्रमाणात आहे?
    अ) १९९५    ब) १९९६
    क) १९९७    ड) २०००
स्पष्टीकरण : आयात ही निर्यातीच्या कमी प्रमाणात म्हणजे रेषाकृतीत आयात/निर्यात हे प्रमाण जेव्हा कमी असेल ती किंमत म्हणजेच ०.३५ हे प्रमाण सर्वात कमी १९९७ मध्ये आहे. म्हणूनच त्या वर्षी आयात ही निर्यातीपेक्षा कमी होती.
=    १९९७ ते १९९८ या काळात आयातीत किती टक्क्य़ांनी
वाढ झाली?
    अ) ७२    ब) ५६
    क) २८    ड) माहिती अपूर्ण
स्पष्टीकरण : या रेषाकृतीत वेगवेगळ्या वर्षांसाठी आयात, निर्यातीचे प्रमाण दर्शवले आहे. १९९७ ते १९९८ या काळात आयातीत वाढ काढण्यासाठी इतर माहिती- उदा. या वर्षांतील आयात किंमत, निर्यात किंमत माहीत असणे आवश्यक आहे.
=    जर १९९६ मध्ये आयात २७२ कोटी रूपये असेल, तर १९९६ मध्ये निर्यात किती असेल?
अ) ३७० कोटी        ब) ३२० कोटी
क) २८० कोटी        ड) २७५ कोटी
स्पष्टीकरण : १९९६ मध्ये आयात/निर्यात= ०.८५
    १९९६ मध्ये निर्यात क्ष कोटी मानू.
         २७२                २७२
        ——    = ०.८५ म् x ———- = ३२०
          x                ०.८५
    १९९६ मध्ये निर्यात ३२० कोटी.
=    खालीलपकी किती वर्षे निर्यात ही आयातीपेक्षा जास्त होती?
    अ) २    ब) १    क) ३        ड) ४
स्पष्टीकरण : निर्यात ही आयातीपेक्षा जास्त म्हणजेच आयात/ निर्यातीचे प्रमाण एकपेक्षा कमी असेल. दिलेल्या आकृतीत हे प्रमाण १९९५, १९९६, १९९७ आणि २००० म्हणजे चार वर्षे असे आहेत.