31 May 2020

News Flash

माझी रांगोळी!

घरासमोर काढलेल्या सुंदर रांगोळीचे छायाचित्र आमच्याबरोबर शेअर करा.

दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, खमंग फराळ आणि रंगांनी नटलेली रांगोळी म्हटलं की डोळ्यासमोर येते ते दिवाळीतील प्रसन्न आणि आनंदी वातावरण. दिवाळीच्या दिवसांमध्ये दारासमोर काढलेली सुंदर रांगोळी सर्वांच्या आकर्षणाचा विषय. दारासमोर काढलेली ही रांगोळी घराची शोभा वाढविण्याबरोबरच मनाला आनंददेखील देते. तुमचा हा आनंद द्विगुणीत करण्याची संधी ‘लोकसत्ता डॉट कॉम’ देत आहे.

यासाठी ‘लोकसत्ता’च्या ‘माझी रांगोळी’ उपक्रमात सहभागी होऊन तुम्ही काढलेल्या रांगोळीचे सुंदर आणि स्पष्ट छायाचित्र आम्हाला loksatta.express@gmail.com या ई-मेलवर पाठवा. सबजेक्टमध्ये माझी रांगोळी लिहिण्यास विलरू नका. त्याचबरोबर आपले नाव आणि ठिकाणदेखील अवश्य लिहा.  निवडक छायाचित्र ‘लोकसत्ता डॉट कॉम’वर प्रसिद्ध केली जातील. तसेच या अल्बमची लिंक ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. सर्वोत्कृष्ट छायाचित्राला ‘लोकसत्ता’च्या फेसबुक पेजवर ‘कव्हर फोटो’ होण्याची संधी मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2016 1:05 am

Web Title: mazi rangoli send your diwali rangoli photo
Next Stories
1 परदेशातील शिक्षण, पूर्वपरीक्षा
2 परदेशातील शिक्षण आणि नियम
3 नवे अभ्यासक्रम, नव्या संधी
Just Now!
X