26 May 2020

News Flash

यूपीएससी (पूर्वपरीक्षा)- तयारी यूपीएससीची

संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून आयएएस,आयपीएस,आयएफएस यांसारख्या किमान १६ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते.

| March 4, 2015 04:17 am

संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून आयएएस,आयपीएस,आयएफएस यांसारख्या किमान १६ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. गेल्या काही वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा व संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम सारखा आहे. फरक एवढाच की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन परीक्षांसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागत नाही. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिला तर हा अभ्यासक्रम आाि संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम अगदीच भिन्न आहे, असे नाही. मात्र, यूपीएससीचे मुख्य परीक्षेतील पेपर वर्णनात्मक असतात. या दोन्ही परीक्षांची तयारी बरोबरच सुरू केली तर या परीक्षांमध्ये यश मिळवणे सुकर होते. दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे. मात्र, यूपीएससी मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप हे वर्णनात्मक असते.

यूपीएससी परीक्षेची तयारी करताना इंग्रजीचा न्यूनगंड : यूपीएससीची मुख्य परीक्षा आपण मराठीत लिहू शकतो. (इंग्रजी वगळता सर्व प्रश्नपत्रिका) त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा न्यूनगंड बाळगण्याचे कारण नाही. मुलाखतदेखील मराठीत देता येते. मात्र इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यूपीएससीची मुख्य परीक्षा मराठीतून देता येत असली तरी ३०० गुणांची एक इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका अनिवार्य असते. एमपीएससी परीक्षेत १०० गुणांची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका असते. यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत जर अनिवार्य इंग्रजीच्या पेपरात अनुत्तीर्ण झालात, तर इतर पेपर तपासले जात नाहीत.
एमपीएससीच्या १०० गुणांच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये कमी गुण मिळाले तर अंतिम गुणवत्ता यादीत आपले स्थान प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करावा. यूपीएससीचे अनेक संदर्भग्रंथ इंग्रजीत असतात. त्यांचे सखोल वाचन होण्यासाठी उत्तम इंग्रजी येणे महत्त्वाचे ठरते. जे विद्यार्थी मराठीत प्रश्नपत्रिका लिहिणार असतील त्यांनीही मराठी दैनिकांबरोबर एक-दोन इंग्रजी दैनिकांचे नियमित वाचन करावे. टी.व्ही.वरील आंतरराष्ट्रीय घडामोडींसंदर्भात जे महत्त्वाचे टॉक शॉ होतात, ते जरूर पाहावेत.
एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी?
काही तज्ज्ञांच्या मते, यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त यूपीएससीची तयारी करावी. त्यांनी एमपीएससीची तयारी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. मात्र, व्यावहारिक पातळीवर बोलायचे झाले तर या दोन्ही परीक्षा परस्परांना पूरक आहेत. एमपीएससीची तयारी जर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून केली तर दोन्ही पदांच्या परीक्षांची तयारी होते. दर वर्षी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. जागांची संख्या कमी आहे, म्हणून कधी कधी खूप चांगला अभ्यास करूनही काही विद्यार्थ्यांना यश प्राप्त होत नाही. अशा वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर मनावरचा ताण हा कमी असतो. दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त यूपीएससीसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2015 4:17 am

Web Title: mpsc and upsc exam study4
Next Stories
1 एमपीएससी (पूर्व परीक्षा) : सामान्य अध्ययन पेपर १ ची तयारी
2 कस आणि कसब: दोन्हींची कसोटी!
3 भाऊबीज!
Just Now!
X