दुसऱ्या चंद्रगुप्तनंतरचे गुप्त सम्राट : दुसऱ्या चंद्रगुप्तनंतर त्याचा पुत्र कुमारगुप्त हा गुप्त सम्राट झाला. (इ.स. ४१५- ४५५) हा काíतकेयाचा भक्त होता. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटी पुष्यमित्र नावाच्या लोकांनी गुप्त साम्राज्यावर हल्ला केला. हा हल्ला राजपुत्र स्कंदगुप्त याने परतावत गुप्त साम्राज्य सुरक्षित राखले. पुढे स्कंदगुप्त (इ.स. ४५५-४६७) गुप्त सम्राट झाल्यावर त्याला आणखी एका मोठय़ा आक्रमणाला तोंड द्यावे लागले. हे आक्रमण हुण नावाच्या रानटी लोकांचे होते. हुणांच्या रानटी टोळ्या या काळात युरोप आणि इराण- भारत या प्रदेशांत घुसल्या होत्या. युरोपातील रोमन साम्राज्य या हुणांनीच नष्ट केले. अशा या विध्वंसक व अतिशय क्रूर हुणांचा स्कंदगुप्तने पराभव करून त्यांना परतवून लावले. या विजयामुळे स्कंदगुप्तने केवळ गुप्त साम्राज्याचेच नव्हे तर वैभवशाली भारतीय संस्कृतीचे रक्षण केले. म्हणून त्याला ‘भारतीय संस्कृतीचा त्राता’ असे म्हटले गेले. पुढे ५० वष्रे तरी हुण भारताकडे फिरकले नाहीत. पण स्कंदगुप्तानंतर गुप्त राजवंशात कर्तबगार राजे झाले नाहीत. हळुहळू गुप्त साम्राज्यास उतरती कळा लागली.
गुप्तकालीन साहित्य :
=    शिल्पकला, चित्रकला व वास्तुकलाप्रमाणे गुप्त काळात साहित्याला उत्तम दिवस आले. हा काळ साहित्यनिर्मितीबाबत ‘अभिजात युग’ म्हणून ओळखला जातो.
=    मृच्छकटिक : हे शूद्रकाने लिहिलेले नाटक आहे. यात गरीब ब्राह्मण व वेश्येची रूपवती कन्या यांची प्रेमकहाणी आहे. चारुदत्त (गरीब ब्राह्मण) व वसंतसेना ( गणिका)
=    मुद्राराक्षस : हे विशाखादत्ताने लिहिलेले नाटक आहे. यात चाणक्य (चंद्रगुप्त मौर्याचा प्रधानमंत्री व सल्लागार) याच्या धूर्त राजकीय डावपेचाची कथा आहे. विशाखादत्ताने देवीचंद्रगुप्त नावाचे आणखी एक नाटक लिहिले होते.
=    भास : या महान नाटककाराने या कालावधीत १३
नाटके  लिहिली.
=    कालिदास : हा सर्वश्रेष्ठ कवी गुप्त काळात होता. याला ‘भारताचा शेक्सपिअर’ असे म्हटले जाते. मेघदूत, अभिज्ञानशाकुंतलम, ऋतुसंहार (महाकाव्य), रघुवंश (महाकाव्य), मालविकाग्निमित्र इत्यादी कालिदासाची साहित्यनिर्मिती आहे. कालिदास हा चंद्रगुप्त दुसरा (विक्रमादित्य) याच्या दरबारात राजकवी होता.
=    अभिज्ञानशाकुंतलम : हे कालिदासचे जगप्रसिद्ध नाटक आहे. दुष्यंत राजा व वनकन्या शकुंतला यांच्या मीलनाची कथा यात दिलेली आहे. हे नाटक प्राचीन साहित्य व रंगभूमीचा सर्वोत्कृष्ट मानिबदू समजले जाते. सर्वप्रथम युरोपियन भाषेत अनुवादित झालेली प्राचीन भारतीय ही साहित्यकृती आहे. जगातल्या १०० उत्कृष्ट साहित्यात याचा उल्लेख केला जातो.
=    रघुवंश : या महाकाव्यात रामाच्या चतुरस्र विजयाचे
वर्णन आहे.
गुप्तकालीन शिल्प, स्थापत्य आणि चित्रकला : गुप्तकाळाला ‘अभिजात भारतीय कलेचा काळ’ असे म्हटले जाते. या काळात भारतवर्षांला राजकीय स्थर्य आणि आíथक समृद्धी लाभल्यामुळे भारतीयांनी मूíतशिल्प, स्थापत्य, चित्रकला इत्यादी क्षेत्रांत वैभवशाली प्रगती केली.
=    गुप्तकाळात शिल्पकला अधिकाधिक संपन्न झाली. पूर्णाकृती मानवी प्रतिमा हे या कलेचे वैशिष्टय होते. ही कला ग्रीक अथवा इराणी कला यांच्या प्रभावापासून मुक्त होती; म्हणजे ती संपूर्णत: भारतीय होती. सारनाथ येथील धम्मचक्र प्रवर्तन करणारी बुद्धमूर्ती, सुलतानगंज येथील बुद्धाची ताम्रप्रतिमा, मथुरेतील पद्मासनस्थ महावीराची प्रतिमा, ग्वाल्हेरजवळची सूर्यप्रतिमा, भरतपूर येथील लक्ष्मीनारायणाची प्रतिमा, काशीमधील गोवर्धनधारी कृष्णप्रतिमा अशी या काळातील मूíतशिल्पकलेची काही प्रसिद्ध उदाहरणे सांगता येतील. मानवी भावभावनेची आणि शरीरसौष्ठवाची उत्तम अभिव्यक्ती या शिल्पांतून व्यक्त होते.
=    स्थापत्य कलेचा पाया याच काळात रचला गेला. लाकडाऐवजी भाजलेल्या विटा व घडीव दगड यांचा वापर अधिकाधिक होऊ लागला. उदा. या काळातील झाशीजवळच्या देवगढ येथील दशावतार मंदिराचे शिखर
४० फूट उंचीचे आढळते.
=    अजिंठा, वेरूळ व बाघ या ठिकाणांची अनेक लेणी (चत्य आणि विहार) गुप्त कालखंडात निर्माण झाली. अंजिठा येथील लेणे क्र. १ विहारशिल्पाचा तर लेणे क्र. १६ चत्यशिल्पाचा उत्तम नमुना आहे.
(भाग २)