=    उत्तर गोलार्धातील ईशान्य व्यापारी वारे : उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नर्ऋत्येकडे वाहत असल्याने त्यांना ‘ईशान्य व्यापारी वारे’ असे म्हणतात.
=    दक्षिण गोलार्धातील आग्नेय व्यापारी वारे : दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयकडून वायव्येकडे वाहत असल्याने त्यांना ‘आग्नेय व्यापारी वारे’ असे म्हणतात.
*   व्यापारी वाऱ्यांची वैशिष्टये :
    =    हे वारे वर्षभर नियमित वाहतात. सागरी प्रदेशातून हे वारे नियमित आणि वेगाने वाहतात.
    =    खंडातंर्गत प्रदेशात हे वारे त्यामानाने संथ गतीने वाहतात.
    =    व्यापारी वाऱ्यांचा वेग ताशी सुमारे १६ ते २४
कि.मी. असतो.
    =    व्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून वाहतात, म्हणून हे उष्ण असतात. त्यांच्यामध्ये बाष्पधारण शक्ती वाढल्याने पूर्वेकडे हे वारे जास्त पाऊस देतात. जसजसे हे वारे पश्चिमेकडे जातात, तसतसे त्यांच्यापासून पाऊस पडत नाही. म्हणूनच खंडाच्या पश्चिम भागात वाळवंटी प्रदेश आढळतो.
*     प्रतिव्यापारी वारे/ पश्चिमी वारे : उत्तर व दक्षिण गोलार्धात २५ ते ३५ अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा आहे. येथून ध्रुववृत्ताजवळ ६० ते ७० अंश उत्तर व दक्षिण दरम्यान असणाऱ्या ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘प्रतिव्यापारी वारे’ असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार   आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून त्यांना ‘पश्चिमी वारे’ असे म्हणतात.
*     प्रतिव्यापारी वाऱ्यांचे खालील दोन उपप्रकार पडतात :
    =    उत्तर गोलार्धातील नर्ऋत्य प्रतिव्यापारी वारे : उत्तर गोलार्धात हे वारे नर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहत असल्याने त्यांना ‘नर्ऋत्य प्रतिव्यापारी वारे’ म्हणतात.
    =    दक्षिण गोलार्धातील वायव्य प्रतिव्यापारी वारे : दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहत असल्याने त्यांना ‘वायव्य प्रतिव्यापारी वारे’ म्हणतात.
*     प्रतिव्यापारी वाऱ्यांची वैशिष्टय़े :
    =    प्रतिव्यापारी वाऱ्यांची दिशा व गती अनिश्चित असते. काही वेळेला हे वारे संथपणे वाहतात तर काही वेळेस त्यांना उग्र वादळी स्वरूप प्राप्त होते.
    =    प्रतिव्यापारी वारे कर्क व मकर वृत्तातील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुव वृत्तावरील कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात.
    =    प्रतिव्यापारी वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहत असतात. त्यामुळे या वाऱ्यांची बाष्पधारण शक्ती
कमी होते.
    =    उत्तर गोलार्धात प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या दिशेवर आवर्त व प्रत्यावर्ताचा परिणाम होतो. हिवाळ्यात प्रतिव्यापारी वारे वेगाने वाहतात.
    =    दक्षिण गोलार्धात सागरी प्रदेश जास्त असल्याने प्रतिव्यापारी वारे नियमितपणे वाहतात. दक्षिण गोलार्धामध्ये ४० अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे भूप्रदेशाचा अडथळा नसल्याने हे वारे वेगाने वाहतात. वाहताना ते विशिष्ट आवाज करत वाहतात, म्हणून यांना ‘गर्जणारे चाळीस वारे’ असे म्हणतात.
    =    ५० अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे संपूर्ण सागरी प्रदेश असल्याने या वाऱ्यांना कोणताच अडथळा असत नाही. या भागात वाऱ्याचा वेग जास्त असतो व ते उग्र स्वरूप धारण करतात, म्हणून त्यांना ‘खवळलेले पन्नास वारे’ (Furious fifties) किंवा ‘शूर पश्चिमी वारे’ असे म्हणतात.
ल्ल    ध्रुवीय वारे (Polar Easterlies) : ध्रुवाजवळील हवेच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून ध्रुवाजवळ ६० ते ७० अंश उत्तर व दक्षिणदरम्यान असणाऱ्या ध्रुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना ‘ध्रुवीय वारे’ असे म्हणतात. ध्रुवीय वारे साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून त्यांना ‘पूर्व ध्रुवीय वारे’ असे म्हणतात.
उत्तर गोलार्धात या वाऱ्यांना ‘नॉरईस्टर’ असे म्हणतात. ते अतिशय वेगाने वाहतात.