आज आपण पर्यावरण, भारतीय संविधान या घटकांविषयी माहिती करून घेऊयात.
पर्यावरण
या घटकाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी खालील प्रकरणांचा सविस्तर अभ्यास करणे अपेक्षित आहे. वातावरणातील बदल, जैवविविधता, परिस्थितीकी, ग्लोबल वॉìमग, कार्बन क्रेडिट, बायोस्पेअर रिझव्‍‌र्ह, राष्ट्रीय उद्याने, ओझोन थराचा क्षय, जैवविविधता हॉट स्पॉट तसेच वातावरण बदलासंदर्भात घेण्यात आलेल्या विविध परिषदा- उदा. रियो परिषद, कॅन्कून
परिषद इत्यादी.
 या उपघटकावर २०१३ साली आणि २०१४ साली सहा प्रश्न विचारले गेले.  सरावासाठीचे प्रश्न पुढीलप्रमाणे आहेत-
१)    जून २०१२ मधील शाश्वत विकासासाठीची रियो + २० परिषद हिरव्या अर्थव्यवस्था प्रारूपाची समर्थक होती. खालीलपकी कोणत्या लेखकांच्या पुस्तकात हिरव्या अर्थव्यवस्थेची संज्ञा रचली गेली?
    अ)    अमर्त्य सेन, डी. फ्रीडमन, सॅम्युएलसन
    ब)    डी.पीअर्स, ए. मार्कण्डेय, इ. बारबीअर
    क)    आय. कादिर, डब्ल्यू. बेरी, एन. हाटेकर.
    ड)    डी. ग्रीनबर्ग, जे. टेलर, श्मीड्थ
२)    अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस .. म्हणतात.
    अ) जैवनिम्नीकरण    ब) जैवआवर्धन
    क) जैवसंचयन    ड)जैवउपचारीकरण
३)    कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो?
    अ) कार्बन डायऑक्साइड    ब) नायट्रोजन डायऑक्साइड
    क) मिथेन    ड) क्लोरो फ्ल्युरो कार्बन.
भारतीय व महाराष्ट्रातील राज्यपद्धती व प्रशासन
या घटकावर मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी या घटकाची तयारी चांगली करावी. तयारी करताना दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडत आहेत, ते संदर्भही लक्षात घ्यावेत. प्रथम भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घ्यावी. महत्त्वाची कलमे लिहून ती पुन:पुन्हा वाचावीत.
 या अभ्यासक्रमात पुढील प्रकरणांचा समावेश होतो- निरनिराळ्या घटना दुरुस्ती, भारतीय राज्य प्रणाली, पंचायत राज, ७३वी घटनादुरुस्ती, ७४वी घटनादुरुस्ती, पंचायत राज व नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यायिक प्रणाली, निरनिराळे आयोग त्यांचे कार्य उदा. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महिला आयोग, निवडणूक आयोग इत्यादी. केंद्रीय व राज्य स्तरावर नियुक्त केलेल्या निरनिराळय़ा समित्यांचे कार्यही अभ्यासावे. २०१३ साली या घटकावर १६ तर २०१४ साली या घटकावर ९ प्रश्न विचारले गेले होते.
या घटकांवर खालील प्रकारचे प्रश्न विचारले जातात-
१)    राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक खालीलपकी सदस्य असलेली समिती करते.
    १) लोकसभेचे अध्यक्ष २) राज्यसभेचे उपाध्यक्ष
    ३) लोकसभेतील विरोधी पक्षनेते ४) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते ५) पंतप्रधान ६) केंद्रीय गृहमंत्री
    अ) १, ३, ५ आणि ६    ब) १, ३ आणि ५
    क) १, ३, ४ आणि ५    ड) वरील सर्व
२) खालील विधाने पाहा.
    अ)    लोकसभेमध्ये पारित न झालेले, परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक, लोकसभा विसर्जति झाल्यास व्यपगत होते.
    इ)    सदने संस्थगित झाल्यास संसदेतील प्रलंबित विधेयके व्यपगत होतात. वरीलपकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत?
    १) फक्त अ २) फक्त इ ३) दोन्हीही ४) दोन्हीही नाहीत.
३)    महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे?
    अ)    जिल्हा परिषद अध्यक्षांच्या एकूण जागांपकी ५० टक्के जागा महिलांकरिता राखीव आहेत.
    इ)    जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापतींच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या निर्देशानुसार घेतात.
    उ)    जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व स्वच्छता या समितीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हेच पदसिद्ध अध्यक्ष असतात.
    ऊ)    जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कालावधी पाच वर्षांचा असतो.

loksatta analysis drug shortage hit on tb elimination plan
विश्लेषण: क्षयरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होणार का? 
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण
Transfer of a railway official for answering RTI queries Mumbai
माहिती अधिकाराचे उत्तर दिल्याने, रेल्वे अधिकाऱ्याची बदली