उत्तम मागणी असलेल्या अॅनिमेशन क्षेत्रातील विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांची ओळख-

डिजिटल एंटरटेन्मेन्टला दर्शकांची मिळणारी पसंती, विविध क्षेत्रांत अॅनिमेशन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक होणारा वापर, संगणकीय खेळांमध्ये झालेली वाढ या सर्व गोष्टींमुळे अॅनिमेशन क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे.
गेल्या काही वर्षांत आपल्या देशात या क्षेत्राची वाढ झपाटय़ाने होत आहे. अॅनिमेशन तंत्राच्या अभ्यासात केवळ अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या वापराचे कौशल्य शिकवले जात नाही तर यामध्ये कथानकाला आवश्यक अशा जिवंत, आकर्षक, मनोरंजक आणि अद्भुत अशा सृष्टीची निर्मिती करण्याचे तंत्र शिकवले जाते. कथेची संकल्पना आणि तिचे विविध प्रतिमांद्वारे प्रत्यक्ष सादरीकरण या तंत्रज्ञाला करावे लागते. या क्षेत्रात तांत्रिक कौशल्य आणि सृजनशीलता यांचा कस लागतो.
अॅनिमेशन तंत्रकौशल्य शिकवणाऱ्या अभ्यासक्रमात डिजिटल फिल्मनिर्मितीच्या सर्व बाबींचा समावेश करण्यात येतो. संकल्पना लेखन, कथा विस्तार, कला-दिग्दर्शन, प्रतिमानिर्मिती आणि डिझाइन या प्रतिमांची मॉडेल्सनिर्मिती, थ्री डी अॅनिमेशन, लायटिंग, मुद्राभिनय, मोशन ग्राफिक्स, व्हिज्युअल इफेक्ट्स, स्टायलायझेशन आदी विषयांचाही या अभ्यासक्रमात समावेश केलेला आहे. ‘स्क्रिप्ट टू स्क्रीन’ असा कथा-संकल्पनेचा प्रवास प्रभावीरीत्या करता येणे शक्य व्हावे अशा तऱ्हेने या अभ्यासक्रमांची रचना केलेली असते.
अशा काही अभ्यासक्रमांची माहिती देत आहोत-
*    माया अॅकॅडेमिक्स ऑफ अॅडव्हान्स्ड सिनेमॅटिक्स- या संस्थेने डिप्लोमा इन अॅनिमेशन अॅण्ड फिल्ममेकिंग कोर्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. या अभ्यासक्रमात अॅडॉब फोटोशॉप, साऊंडबूथ, आफ्टर इफेक्ट्स, ऑटोडेस्क थ्री डी मॅक्स आदी सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण दिले जाते. हा अभ्यासक्रम केल्यानंतर कॅरेक्टर अॅनिमेटर, डिजिटल डिझायनर, रििगग आर्टस्टि, व्हीएक्स आर्टस्टि, लायटिंग आर्टस्टि, डिझाइन आर्टस्टि अशा कामाच्या संधी मिळू शकतात.
पत्ता- १) २३, शाह इंडस्ट्रिएल इस्टेट, वीरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई. वेबसाइट- http://www.maacindia.com २) पहिला मजला, कुमार प्लाझा, वंडरलॅण्डच्या बाजुला, एम.जी. रोड, पुणे.
    ३) १६, शिरीष, दक्षिण अंबाझरी रस्ता, लक्ष्मीनगर, नागपूर.
*    रिलायन्स अॅनिमेशन आणि आएएमएस या अॅनिमेशन ट्रेिनग अकॅडेमी- या संस्थेने प्रोफेशनल डिप्लोमा कोर्स इन डिजिटल अॅनिमेशन फिल्ममेकिंग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी- ३ वष्रे. अर्हता-कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण किंवा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक. शिवाय डिझायिनग, चित्रकला याचे कौशल्य प्राप्त केले असल्यास प्रवेशासाठी अग्रक्रम मिळू शकतो. प्रवेशासाठी अॅप्टिटय़ूड चाळणी परीक्षा घेतली जाते.
पत्ते- १) ३०१, बी विंग, बिझनेस पॉइंट, बीएमसी ऑफिसजवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५९.
२) आठवा मजला, सिटी टॉवर, ढोले पाटील रोड, पुणे- ४११००१. ईमेल-enquire@relianceaims.com वेबसाइट- http://www.relianceaims.com
*    डी. क्यू स्कूल ऑफ व्हिज्युएल आर्ट्स-   
    १. बी.एस्सी. इन अॅनिमेशन अॅण्ड फिल्म मेकिंग. तीन वष्रे.
    २. डिप्लोमा इन अॅनिमेशन फिल्ममेकिंग. एक वर्ष.
    ३. स्पेशलायझेशन इन व्हीएफएक्स (व्हिज्युएल इफेक्ट्स)
    कालावधी- ७ महिने. या अभ्यासक्रमांमध्ये थ्री डी अॅनिमेशन तंत्र प्रशिक्षणावर भर दिला जातो. संस्थेने अॅनिमेशन प्रॉडक्ट डिझाइन, वेब डिझायिनग, एडिटिंग फायनलकट प्रो, थ्री डी मोशन ट्रॅकिंग, झेड ब्रश, फ्लुइड डायनामिक्स (माया फ्लुइड/रिअल फ्लो) हे अल्पावधीचे अभ्यासक्रम सुरू
केले आहेत.
पत्ता- डी. क्यू. स्कूल ऑफ व्हिज्युएल आर्ट्स, प्राइम हॉस्पिटलसमोर, हैदराबाद- ५०००४८.
    वेबसाइट-www.dqsva.com
    ईमेल- counsellor-hyd@dqentertainment.com
*  झी इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट- हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत- = अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन अॅनिमेशन अॅण्ड व्हिज्युएल इफेक्ट्स, कालावधी- एक वर्ष.
=अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन व्हिज्युएल इफेक्ट्स अॅण्ड फिल्ममेकिंग, कालावधी- एक वर्ष. =अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन व्हिज्युएल इफेक्ट्स, फ्लेम प्रीमियम- कालावधी- एक वर्ष. = प्रोग्रॅम इन ग्रॅफिक अॅण्ड वेब डिझाइन, कालावधी- एक वर्ष. = स्पेशलायझेशन प्रोग्रॅम इन मॉडेलिंग अॅण्ड टेक्स्च्युरिंग, कालावधी- सहा महिने. = स्पेशलायझेशन प्रोग्रॅम इन लायटिंग अॅण्ड शेडिंग, कालावधी- सहा महिने.
  = स्पेशलायझेशन प्रोग्रॅम इन अॅनिमेशन, कालावधी- सहा महिने. = स्पेशलायझेशन प्रोग्रॅम इन मॉडेिलग व्हिज्युएल इफेक्ट्स, कालावधी- सहा महिने.
पत्ते- १) झी इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिएटिव्ह आर्ट, फन रिपब्लिक, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई- ४०००५३,  वेबसाइट- http://www.zica.org २) १५८६, ऑफिस नं- ६८७, सदाशिव पेठ, टिळक रोड, महाराष्ट्र मंडळ शाळेच्या विरुद्ध दिशेला, पुणे-४११०३०. ईमेल- zicapune@gmail.com
*    स्कूल ऑफ अॅनिमेशन- या संस्थेने बी.ए. इन अॅनिमेशन हा तीन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाद्वारे टू डी प्रॉडक्शन डिझाइन, टू डी अॅनिमेशन, थ्री डी अॅनिमेशन, थ्री डी मॉडेिलग अॅण्ड रििगग, थ्री डी अॅनिमेशन, थ्री डी टेक्स्च्युिरग अॅण्ड लायटिंग, थ्री डी व्हिज्युएल इफेक्ट्स अॅण्ड कम्पोझिटिंग यापकी कोणत्याही एका क्षेत्रात स्पेशलायझेशन करता येते.
पत्ता- स्कूल ऑफ अॅनिमेशन, व्हिसिलग वूड इंटरनॅशनल, फिल्मसिटी कॉम्प्लेक्स, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०००६५. वेबसाइट-  http://www.whistlingwoods.net
    ईमेल- counselor@whistlingwoods.net
*    एएएफटी (एशियन अकॅडेमी ऑफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन) स्कूल अ अॅनिमेशन- या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. (अ) तीन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम- बी.एस्सी इन अॅनिमेशन (स्पेशलायझेशन इन थ्री डी अॅनिमेशन अॅण्ड व्हिज्युएल इफेक्ट्स), बी.एस्सी. इन अॅनिमेशन (स्पेशलायझेशन इन गेम डिझाइन), बी.एस्सी इन मल्टिमीडिया. (ब) दोन वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम-  एम.एस्सी. इन अॅनिमेशन (स्पेशलायझेशन इन थ्री डी अॅनिमेशन अॅण्ड व्हिज्युएल इफेक्ट्स),  एम.एस्सी. इन अॅनिमेशन (स्पेशलायझेशन इन गेम डिझाइन),  एम.एस्सी. इन मल्टिमीडिया, (क)  एक वर्षे कालावधीचे अभ्यासक्रम- डिप्लोमा इन थ्री डी अॅनिमेशन, डिप्लोमा इन व्हिज्युएल इफेक्ट्स, डिप्लोमा इन गेम डिझाइन, डिप्लोमा इन मल्टिमीडिया.
पत्ता- मारवा स्टुडिओ कॉम्प्लेक्स, एफसी-१४/१५, फिल्म सिटी, सेक्टर- १६ ए, नॉयडा, उत्तरप्रदेश.
    वेबसाइट- http://www.aaft.com  ईमेल- help@ aaft.com
*    इन्स्टिटय़ूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझिरग इन्स्ट्रमेन्ट्स- या संस्थेने डिप्लोमा इन थ्रीडी अॅनिमेशन अॅण्ड ग्राफिक्स हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- विज्ञान आणि गणित हे विषय घेऊन ५५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण (अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुण)
पत्ता- इन्स्टिटय़ूट फॉर डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझिरग इन्स्ट्रमेन्ट्स, स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, चुनाभट्टी, सायन, मुंबई- ४०००२२. वेबसाइट- www. idemi.org
सुरेश वांदिले -ekank@hotmail.com