पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल क्षेत्राशी संबधित  विविध अभ्यासक्रमांची माहिती-
पेट्रोलियम पदार्थाचे जागतिक अर्थकारण आणि जागतिक राजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता या क्षेत्रात नव्या साठय़ांचा शोध, जुन्या साठय़ांची देखभाल, दुरुस्ती या क्षेत्रांसाठी संशोधन आदी विविध बाबींसाठी सातत्याने तज्ज्ञ मनुष्यबळाची गरज भासते.
या क्षेत्रातील तज्ज्ञांना तेल वायू उत्खनन, निर्मिती, प्रक्रिया आणि वितरण अशा विविध कामांमध्ये सहभागी व्हावे लागते. कोणत्या कार्याची निवड करायची हे उमेदवाराच्या हाती असते. तांत्रिक निर्णय तात्काळ घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी आवश्यक ठरते.
या क्षेत्रात प्रारंभीचा प्रवेश हा एमएस्सी भूगर्भशास्त्र किंवा भूभौतिकीशास्त्र किंवा केमिकल/ मेकॅनिकल/ बायोकेमिकल या विषयांतील बीई केलेल्या उमेदवारांना शक्य होतो. पेट्रोलियम पदार्थाचे शोध, उत्खनन, निर्मिती याला पेट्रोलिमय क्षेत्रात अपस्ट्रीम या नावाने संबोधले जाते.
भूपृष्ठावरील पेट्रोलियम पदार्थावर केल्या जाणाऱ्या क्रिया-प्रक्रियांना डाऊनस्ट्रीम असे संबोधले जाते. या डाऊनस्ट्रीम क्षेत्रासाठी पेट्रोकेमिकल्स अभियंते आणि तज्ज्ञांची अधिक गरज भासते. अपस्ट्रीम क्षेत्रामध्ये जगातील विविध भूप्रदेशांत पेट्रोलियम पदार्थाच्या शोध प्रक्रियेचा समावेश होतो. या क्षेत्रातील तज्ज्ञांना हे साठे कुठे आढळतील, याचे अचूक निदान करावे लागते. या साठय़ांच्या शोधप्रक्रियांच्या आधुनिकीकरणाचे तंत्र विकसित करावे लागते. त्यात सतत सुधारणा करावी लागते. नव्या उपकरणांचा शोध लावावा लागतो. या सततच्या शोध-संशोधन प्रक्रियेमुळे कच्च्या तेलातून दीडशेहून अधिक वेगवेगळ्या पेट्रोलियम पदार्थाची निर्मिती शक्य झाली आहे.
पेट्रोकेमिकल्स अभियंते आणि तज्ज्ञांना अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम या दोन्ही क्षेत्रांत कार्य करण्याचे कौशल्य प्राप्त व्हावे, या अनुषंगाने अभ्यासक्रमाची संरचना केलेली असते. यामुळे प्रत्यक्ष कार्यरत असताना कोणत्याही प्रकारचे आव्हान स्वीकारणे शक्य होऊ शकते. या क्षेत्रातील तज्ज्ञांना सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भारतीय आणि परदेशातील तेल कंपन्या, तांत्रिक सेवा पुरवठादार, पेंट आणि डाय उत्पादन करणाऱ्या पेट्रोकेमिकल्स कंपन्या, मध्य-पूर्व, दक्षिण-पूर्व आशिया, रशिया, चीन यांसारख्या देशांतील तेल कंपन्यांमध्ये करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात.
या तांत्रिक क्षेत्रासोबतच या क्षेत्रातील स्पेशलाइज्ड विधी तज्ज्ञांचीही गरज मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. नव्या तेल क्षेत्रांच्या निविदा प्रक्रियांमध्ये सहभागाची तयारी करणे, कायदेशीर बाजू सांभाळणे आवश्यक असते. देशातील पेट्रोलियम उद्योग क्षेत्राचा झपाटय़ाने विस्तारत आहे. या क्षेत्रात देश-परदेशातील मोठी गुंतवणूक होत आहे. त्यातून विविध प्रकारच्या व्यामिश्र स्वरूपांचे मालकी हक्क निर्माण होत आहेत. वितरण क्षेत्राबाबत नवे प्रश्न निर्माण होत आहेत. आपल्या देशात यांत सार्वजनिक क्षेत्राचे प्राबल्य आहे. त्यामुळे या व्यवसायाच्या कायदेशीर बाजू संपूर्ण समजून घेणे, ग्राहकांचे हक्क आणि अधिकार याविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक ठरते. केंद्र सरकारने ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी ही संस्था स्थापन केली आहे. ही संस्था या क्षेत्राचे संनियंत्रण आणि कायदेशीर देखभाल करते. त्यामुळे आता या क्षेत्रातील तांत्रिक आणि कायदेविषयक ज्ञान असणाऱ्या तज्ज्ञांची गरज वाढणार आहे.
अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था : या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारा युवावर्ग पदवी स्तरावर पेट्रोलियम अभियांत्रिकी शाखेशी संबंधित विविध विषयांचा अभ्यास करू शकतात.
०    दिब्रुगढ युनिव्हर्सिटि : अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
* एम टेक. इन पेट्रोलियम एक्स्प्लोरेशन अ‍ॅण्ड प्रॉडक्शन. कालावधी- चार सत्रांमध्ये विभाजित दोन वष्रे. अर्हता- बीई इन मेकॅनिकल किंवा केमिकल किंवा पेट्रोलियम इंजिनीअिरग किंवा एम.एस्सी. इन जिओफिजिक्स किंवा जिऑलॉजी.
* पीएचडी इन पेट्रोलियम इंजिनीअरिंग. पत्ता- रजिस्ट्रार दिब्रुगढ युनिव्हर्सिटि, नॅशनल हायवे, बेहिया चेटिया गाव,
    दिब्रुगढ- ७८६००४. वेबसाइट – http://www.dibru.ac.in
०    इंडियन स्कूल ऑफ माइन्स युनिव्हर्सिटि धनबाद :
* बीटेक इन पेट्रोलियम इंजिनीअरिंग- कालावधी चार वष्रे.
* बीटेक इन पेट्रोलियम इंजिनीअरिंग + एमटेक इन पेट्रोलियम इंजिनीअरिंग- या डय़ुअल डिग्री अभ्यासक्रमाचा कालावधी पाच वष्रे.
* एमटेक इन पेट्रोलियम इंजिनीअरिंग- कालावधी- दोन वर्षे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आयआयटी प्रवेशासाठी घेतली जाणारी JEE-MAIN आणि JEE-ADVANCED या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. वेबसाइट- http://www.ismu.ac.in
ई-मेल : query@ismu.ac.in  learnig@icicisecurities.com
०    युनिव्हर्सिटि ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज :
या संस्थेच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये ऑइल आणि गॅस सेक्टर या क्षेत्राशी निगडित पुढील अभ्यासक्रम सुरू
करण्यात आले आहेत-
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन अप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन अपस्ट्रीम.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन अप्लाइड पेट्रोलियम इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन गॅस स्ट्रीम.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन केमिकल इंजिनीअरिंग वुइथ स्पेशलायझेशन इन रिफायिनग अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन जिओइन्फम्रेटिक्स इंजिनीअरिंग.
* बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन जिओसायन्स इंजिनीअरिंग.
प्रवेश प्रक्रिया पद्धती :
* यूपीईएस इंजिनीअरिंग अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टद्वारे एकूण जागांच्या ८० टक्के जागा भरल्या जातात. यंदा ही अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट २४ मे २०१४ रोजी होईल. परीक्षेचा कालावधी- तीन तास. या परीक्षेची केंद्रे- मुंबई, पुणे, भोपाळ, हैदराबाद, अहमदाबाद. एकूण प्रश्न- २०० गुण. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची राहील. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांवर प्रत्येकी ५० गुणांचे प्रश्न, इंग्रजी आकलन- ३० आणि चालू घडामोडी यावर २० गुणांचे प्रश्न विचारले जातील.
थेट प्रवेश पद्धती- याद्वारे २० टक्के जागा भरल्या जातात.
* दहावी-बारावी परीक्षेत किमान ८० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमांच्या थेट प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने किमान ८० टक्के गुण मिळाणे गरजेचे असते. अशा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यांची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय कौन्सेलिंगद्वारे पार पाडली जाते.
* जेईई मेन मेरिट मेरिट- JEE-MAIN २०१४ मध्ये उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांना स्वतंत्रपणे अर्ज करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना दहावी-बारावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. बारावी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने किमान ६० टक्के गुण मिळणे गरजेचे. JEE-MAIN 2014  2014 चा निकाल लागल्यावर कट-ऑफ स्कोअर घोषित केला जातो. साधारणत: JEE-MAIN मध्ये किमान एक लाखापर्यंत रँकिंग मिळायला हवे. अर्हता- विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्के आणि बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ८० टक्के गुण मिळाल्यास यूपीईएसईटी देण्याची आवश्यकता नाही. १ ऑक्टोबर १९९२ रोजी व त्यानंतर जन्म झालेले विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
० संस्थेच्या कॉलेज ऑफ लीगल स्टडीजचे अभ्यासक्रम-
* बॅचलर ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड एलएलबी वुइथ स्पेशलायझेशन इन एनर्जी लॉज. अर्हता- दहावीमध्ये ५० टक्के गुण आणि बारावीतील कोणत्याही शाखेत ५० टक्के गुण. निवड- यूपीईएस लॉ स्टॅडीज अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, मुलाखत आणि ग्रुप डिस्कशन. या परीक्षेचे महाराष्ट्रातील केंद्र मुंबई. यंदा यूपीईएस लॉ स्टडीज अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट २४ मे २०१४ रोजी घेण्यात येणार आहे. पत्ता- यूपीईएस कॅम्पस, पोस्ट ऑफिस -बिधोली व्हाया, प्रेमनगर, डेहरादून-२४८००७. वेबसाइट-www.upes.ac.in
ई-मेल- enrollments@upes.ac.in

easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Investment Opportunities in the Capital Goods Sector Top Companies
गुंतवणूक संधीचे क्षेत्र आणि न दिसणारे व्यवसाय: भांडवली वस्तू
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र
fund Analysis Nippon India Growth Fund Fund assets
Money Mantra: फंड विश्लेषण: निपॉन इंडिया ग्रोथ फंड