विविध शासकीय संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या कौशल्यनिर्मितीच्या अल्पकालीन अभ्यासक्रमांची ओळख-
विविध शासकीय संस्थांमध्ये कौशल्यनिर्मितीचे अभ्यासक्रम सुरू असतात. हे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगारनिर्मितीसाठी उपयुक्त ठरू शकतात. किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो.
० सर्टिफिकेट कोर्स इन इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी :
मुंबई स्थित शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेत सर्टििफकेट कोर्स इन इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम सुरक्षा व्यवस्थेमधील करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. हा अभ्यासक्रम झिकॉम इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टम्स लिमिटेड या संस्थेच्या सहकार्याने सुरू
करण्यात आला आहे.
हा अभ्यासक्रम दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला करता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी- ८ महिने. फी- १४ हजार रुपये. ४० विद्यार्थ्यांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्त्वावर प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रम शिकवण्याची भाषा- इंग्रजी. पत्ता- प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, ४९ खेरवाडी, अली यावर जंग मार्ग, बांद्रा पूर्व- मुंबई-४०००५१. वेबसाइट- http://www.gpm.ac.in
ईमेल- communitycollege@gpmumbai.ac.in.
० कॉम्पुटर चिपलेव्हल रिपेअरिंग कोर्स :
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या सी. बी. कोरा या संस्थेने कॉम्प्युटर रिपेअरिंग कोर्स (लॅपटॉप असेंब्लिंग) हा अभ्यासक्रम सुरूकेला आहे. या अभ्यासक्रमांतर्गत मदरबोर्ड, लॅपटॉप, डाटा रिकव्हरी, हार्डडिस्क, सीडी रोम, रॅम, बेसिक इलेक्ट्रॉनिक चिपलेव्हल, ट्रबल शूटिंग आणि देखभाल, बेसिक नेटवìकग, वेब सिक्युरिटी कॅमेरा इन्स्टॉलेशन आदी विषयांचा समावेश करण्यात येतो. हा अभ्यासक्रम शनिवार-रविवार असे दोन दिवस शिकवला जातो.
० प्लास्टिक मोल्डिंग प्रशिक्षण :
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या सी. बी. कोरा या संस्थेने प्लास्टिक मोल्डिंग प्रशिक्षण हाही अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात व्यावसायिक प्रात्यक्षिकांसह मोल्डिंग मशीनवर प्रशिक्षण, मशीन देखभाल, मटेरिअल टेस्टिंग, क्वालिटी कंट्रोल, प्लास्टिक मोल्ड व डाइज आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्लास्टिक प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य दिले जाते.
० बिल्डिंग मेन्टेनन्स कोर्स :
या अभ्यासक्रमात इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीच्या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. या शिवाय बाजारपेठेतील अद्ययावत बाबींचे ज्ञानसुद्धा उपलब्ध करून दिले जाते. या अभ्यासक्रमात टाकीची स्वच्छता, बांधकाम तत्त्वे, जलशुद्धीकरण, किडे आणि कीटक नियंत्रण, वीजनिरोधक, सौरऊर्जा, जलतरण तलाव, स्ट्रक्चरल सिस्टीम, वॉटर प्रूफिंग, क्रॅक फिलिंग, प्लिम्बग, पेंटिंग, रंगसंगती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्प्रिंकलर, सिस्टम. या अभ्यासक्रमाला ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. महिला विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.
० मोबाइल रिपेअरिंग प्रशिक्षण :
या अभ्यासक्रमात सर्व प्रकारच्या मोबाइल दुरुस्ती आणि देखभालीचे प्रशिक्षण दिले जाते. एकूण ११ प्रकारच्या बिघाडांसंदर्भातील दुरुस्तीचे प्रशिक्षित केले जाते. वॉटर डॅमेज आणि डेड मोबाइल्सच्या दुरुस्तीवर भर दिला जातो. अत्याधुनिक टूल्स, संगणकीय फ्लिशग या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. एकूण २० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
० ब्युटिशियन कोर्स :
या अभ्यासक्रमाचा कालावधी एक महिन्याचा आहे. ३० महिलांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो.
० फायबर ग्लास मोल्डिंग प्रशिक्षण :
या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. यामध्ये फायबर, रबर व प्लास्टर मोल्ड बनवणे, मूर्ती, वॉटरफॉल, दरवाजा, बोट, केमिकल टँक, उद्यानातील खेळणी, औद्योगिक वापरातील वस्तू, वाहनांचे विविध सुटे भाग, फिनिशिंग आणि पेन्टिंगसह बसवणे. नमूद केलेल्या दुसऱ्या ते सातव्या अभ्यासक्रमांना मुंबईबाहेरील उमेदवारांना प्रवेश घेता येतो. त्यांच्या निवासासाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेंतर्गत
२५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जाते. पत्ता- सी.बी. कोरा ग्रामोद्योग संस्थान, शिंपोली गाव, बोरिवली- पश्चिम, मुंबई- १२.
० गोल्ड ज्वेलरी व्हॅल्युएशन :
हा अभ्यासक्रम मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइज या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या तंत्र विकास केंद्राने सुरूकेला आहे. अर्हता- किमान आठवी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाची फी- आठ हजार. हा कौशल्यनिर्मितीचा अभ्यासक्रम तीन दिवस कालावधीचा आहे. पत्ता- चाटवाणी बाग, रामकृष्ण रेस्टॉरंटजवळ, गोखले रोड, विलेपाल्रे पूर्व- मुंबई-४०००५७.
वेबसाईट- http://www.ppdcagra.in  ईमेल- info@ppdcagra.in
० मशीन शॉप प्रॅक्टिस आणि ब्ल्यू पिंट्र रीडिंग :
या अभ्यासक्रमातील मशीन शॉप प्रॅक्टिस या अभ्यासांतर्गत सीएनसी मशीनिंग सेंटर, स्पार्क इरोजन, ग्राइंडिंग, मिलिंग मशीन या विषयांचा समावेश आहे. ब्ल्यू    
प्रिंट रीडिंग या अभ्यासांतर्गत अभियांत्रिकी आरेखने वाचणे व चित्रांकन यांचा समावेश आहे. आठवी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांस हा अभ्यासक्रम करता येतो. एकूण २१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. संपर्क- एमएसएमई विकास संस्था, एमएसएमई मंत्रालय, केंद्र सरकार, कुर्ला -अंधेरी  रोड, साकीनाका मुंबई-४०००७२.
वेबसाईट- http://www.msmedimumbai.gov.in
ईमेल-  dcdi-mumbai@dcmsme.gov.in
० इलेक्ट्रिक गॅजेट रिपेअर :
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत हा अभ्यासक्रम सुरूकेला आहे. या अभ्यासक्रमात घरगुती वायिरग आणि औद्योगिक वायिरग या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. अर्हता- आठवी उत्तीर्ण. फी- एक हजार रुपये.
वेबसाइट- http://www.idemi.org ईमेल- trainig@idemi.org
० कॉम्प्युटर अकौंटिंग वुईथ टॅली :
अर्हता- दहावी उत्तीर्ण. फी- एक हजार रुपये.
पत्ता- आयडीईएमआय- स्वातंत्र्यवीर तात्या टोपे मार्ग, चुनाभट्टी, मुंबई-४०००२२. वेबसाइट- http://www.idemi.org
ईमेल- trainig@idemi.org
० ड्रायिव्हग ट्रेनिंग व्हेइकल :
अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांसाठी कौशल्य विकास निर्मिती योजनेंतर्गत ड्रायिव्हग ट्रेनिंग व्हेइकल हे प्रशिक्षण राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ आणि राज्य शासनाच्या मौलाना आजाद अल्पसंख्याक वित्त विकास महामंडळाच्या वतीने सुरूकरण्यात आले आहे. अल्पसंख्याक समुदायांमध्ये बौद्ध, ख्रिश्चन, शीख, मुस्लीम, जैन या समुदायांचा समावेश होतो. हे प्रशिक्षण मारुती सुझुकी या वाहनावर देण्यात येते. या प्रशिक्षणाची केंद्रे अमरावती, औरंगाबाद, बारामती, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, आम्बेगाव, नाशिक, नवी मुंबई, पनवेल, पुणे, सोलापूर, ठाणे आणि रत्नागिरी येथे आहेत. या प्रशिक्षणासाठी उमेदवारांना हजार रुपये विद्यावेतनही दिले जाते. या प्रशिक्षणाचा कालावधी एक महिन्याचा आहे. संपर्क- डी. डी. इमारत, दुसरा माळा, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग मार्ग मुंबई-४०००२३. वेबसाइट- http://www.mamdfc.com
ईमेल- maulana_azad@rediffmail.com
अर्हता- दहावी उत्तीर्ण आणि वाहन चालवण्याचा परवाना हवा. कुटुंबाच्या उत्पन्नाची ग्रामीण भागासाठी मर्यादा- ८१ हजार रुपये आणि शहरी भागांसाठी १ लाख ३ हजार रुपये. (पूर्वार्ध)