विविध शासकीय संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या कौशल्यनिर्मितीच्या अल्पकालीन अभ्यासक्रमांची ओळख-
विविध शासकीय संस्थांमार्फत कौशल्यनिर्मितीचे अभ्यासक्रम सुरू असतात. हे अल्पमुदतीचे अभ्यासक्रम रोजगार आणि स्वयंरोजगारनिर्मितीच्या अनुषंगाने उपयुक्त ठरू शकतात. किमान दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. काल आपण अशा प्रकारच्या काही अभ्यासक्रमांची ओळख करून घेतली. अशाच आणखी काही अभ्यासक्रमांची ही ओळख –
० सर्टिफिकेट कोर्स इन एक्स्पोर्ट-इम्पोर्ट मॅनेजमेंट  
वर्ल्ड ट्रेड इन्स्टिटय़ूटने सर्टिफिकेट कोर्स इन एक्स्पोर्ट-इम्पोर्ट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरूकेला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस हा अभ्यासक्रम करता येतो. अभ्यासक्रमाचा कालावधी- ३ महिने. हा अभ्यासक्रम डिसेंबर आणि जून महिन्यांच्या मध्यावर सुरू होतो. आयात-निर्यात व्यवसायात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरूशकतो.
संपर्क- सेंटर वन बििल्डग, ३१वा मजला, डब्ल्यूटीसी कॉम्प्लेक्स, कफ परेड मुंबई- ४००००५
वेबसाइट- http://www.wtcmumbai.org
ईमेल- wtc@wtcmumbai.org
० पॉलिटेक्निकमधील वेगळे अभ्यासक्रम
पॉलिटेक्निक संस्थांमध्ये पारंपरिक विषयांसोबत पुढील काही वेगळ्या विषयांचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-
*    प्लॅस्टिक अ‍ॅण्ड पॉलिमर इंजिनीअरिंग :
    गव्हर्नमेन्ट पॉलिटेक्निक, गाडगे नगर, पोस्ट शिवाजी नगर, व्ही. एम. व्ही. रोड, अमरावती- ४४४६०३.
    ईमेल-  gpamaravati@rediffmail.com
    वेबसाइट- http://www.gpamravti.ac.in एकूण जागा ३०
* ड्रेस डिझायिनग अ‍ॅण्ड गार्मेट मॅन्युफॅक्चिरग:
    गव्हर्नमेन्ट रेसेडेंशिएल वूमेन्स पॉलिटेक्निक, धामणराव रोड यवतमाळ- ४४५००१.
    ईमेल- grwpy@yahoo.co.in
    वेबसाइट- http://www.grwpy.ac.in एकूण जागा ६०.
* इन्डस्ट्रिअल इलेक्ट्रॉनिक्स : श्री तिरुपती तंत्रनिकेतन अकोला- केशव नगर अकोला- ४४४००४
  वेबसाइट- http://www.ttnakola.org
 ईमेल- ttnakl83@gmail.com. एकूण जागा ६०.
* इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग : एल.ए.एम.आय.टी. धामणगाव रेल्वे. जिल्हा अमरावती- ४४४७०९. एकूण जागा ६०.
वेबसाइट- http://www.drpdgp.org
ईमेल- principal_lamit@rediffmail.com
* इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम- अमरावती पॉलिटेक्निक कॉलेज, सर्वे नंबर- ५, दस्तूर नगर, मालखेड रोड,
भानाखेडा-बुद्रुक, जिल्हा- अमरावती- ४४४९०४.
वेबसाइट- http://www.amravtipolybk.com
ईमेल- amtpoly_bhankheda@rediffmail.com
*  मायिनग अ‍ॅण्ड मायिनग सव्‍‌र्हे- सुशगंगा पॉलिटेक्निक, सर्वे नंबर- १७६-१९५, नायगाव पोस्ट कोना, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ- ४४५३०४.
वेबसाइट- http://www.sushgangapoly.org
ईमेल- sush_polytechinc@rediffmail.com
    संपर्क – ०७२३९ – २९३२८७. आणि साई पॉलिटेक्निक, सर्वे नंबर- ६४/१, मौजा किन्ही- जावडे, नागपूर- हैदराबाद नॅशनल हायवे नंबर ७, तालुका राळेगांव, जिल्हा- यवतमाळ -४४५३०८. वेबसाइट- http://www.saipolytechnic.com
    ईमेल -ahilyaspm@yahoo.com
० सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ टूल डिझाइन :
टूल डिझाइन आणि निमिर्ती या क्षेत्रातील उद्योगांना लागणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची सातत्याने निर्मिती करण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केंद्र सरकारने १९६८ साली केली. या संस्थेचे पुढील शैक्षणिक सत्र ऑगस्ट २०१४ पासून सुरू होत आहे. संस्थेचे अभ्यासक्रम –
* डिप्लोमा इन ऑटोमेशन अ‍ॅण्ड रोबोटिक्स इंजिनीअरिंग: कालावधी- ३ वष्रे. सहा सत्रे. अर्हता- दहावी उत्तीर्ण. एकूण जागा ६०.
* डिप्लोमा इन टूल, डाय अ‍ॅण्ड मोल्ड मेकिंग :     कालावधी- ४ वष्रे. आठ सत्रे.  अर्हता- खुल्या संवर्गासाठी ५० टक्के गुणांसह आणि अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील उमेदवारांसाठी ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण.  एकूण जागा ६०
*  डिप्लोमा इन प्रॉडक्शन इंजिनीअरिंग : कालावधी- ३ वष्रे. सहा सत्रे. अर्हता- दहावी उत्तीर्ण. एकूण जागा ६०
* डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग: कालावधी- ३ वष्रे. सहा सत्रे. अर्हता- दहावी उत्तीर्ण. एकूण जागा ६०.
सर्व अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांचे वय १९ वष्रे असावे.
प्रवेश प्रकिया- संस्थेला अर्ज भेटण्याची शेवटची तारीख- १३ मे २०१५. प्रवेश परीक्षा १ जून २०१४ रोजी घेतली जाईल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारितच प्रवेश दिला जातो.
अभ्यासक्रमाची फी प्रत्येक सत्राला १७ हजार रुपये. अर्ज माहितीपत्रकाची किंमत- खुल्या संवर्गासाठी ६०० रुपये, अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासाठी ३०० रुपये. या रकमेचा डिमांड ड्राफ्ट, प्रिन्सिपल डायरेक्टर, सीआयटीडी, हैदराबाद या नावे काढलेला असावा. पत्ता- एमएसएमई- टूल-रूम, हैदराबाद, सेन्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ टूल डिझाइन, बालानगर, हैदराबाद-५०००३७.
वेबसाइट- http://www.citdindia.org
ईमेल- citdadmissionss@citdindia.org
(उत्तरार्ध)