‘बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ विषयक पदवी अभ्यासक्रमांत उपलब्ध असलेल्या आणखी काही  वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांची माहिती-
बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे बीबीए या ज्ञानशाखेत विविध स्पेशलाइज्ड विषयांचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी ज्या पर्यायांचाही विचार करू शकतात, त्यापैकी काही वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रमांची ओळख आपण काल करून घेतली. आज बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमातील आणखी काही स्पेशलाइज्ड अभ्यासक्रमांविषयी जाणून घेऊयात..
* बॅचलर ऑफ हॉस्पिटल मॅनेजमेंट
हा अभ्यासक्रम कोलकातास्थित गुरुनानक इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने सुरू केला आहे. ही संस्था वेस्ट बेंगाल युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीशी संलग्न आहे.
अर्हता- बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण.
कालावधी- तीन वर्षे.
पत्ता- १५७/एफ, निलगुंज रोड, पाणीहट्टी,
कोलकाता- ७००११४.
वेबसाइट- http://www.gnit.ac.in
ईमेल- info@gnit.ac.in
*  बीएस्सी इन स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एक्झरसाइज सायन्स
आपल्या देशात पुढील दहा वर्षांत सव्वा चार लाखांहून अधिक क्रीडा शास्त्र या ज्ञानशाखेतील मनुष्यबळाची गरज भासेल, असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्सने व्यक्त केला आहे. ही बाब लक्षात घेऊन श्री रामचंद्र युनिव्हर्सिटीने स्पोर्ट्स सायन्स या विषयाशी निगडित शिक्षण-प्रशिक्षण आणि संशोधनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. संस्थेने बीएस्सी इन स्पोर्ट्स अ‍ॅण्ड एक्झरसाइज सायन्स हा नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम युनिव्हर्सिटी ऑफ केपटाऊन आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहकार्याने
सुरू केला आहे.
अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे. यामध्ये एक वर्ष कालावधीच्या इंटर्नशिपचा समावेश आहे.
करिअर संधी – हा अभ्यासक्रम केल्यावर क्रीडा संघ आणि क्लब यांमध्ये सल्लागार म्हणून करिअरची संधी मिळू शकते. फिटनेस सेंटरमध्ये प्रशिक्षण आणि सल्लागार म्हणून सेवा देता येऊ  शकते. खासगी सेवा सुरू करता येऊ  शकते. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता आणि क्रीडा कौशल्यावर संनियंत्रण ठेवून त्यात सुधारणा करण्यासाठी सल्लागार म्हणून भूमिका पार पाडण्याची संधी मिळू शकते. मोठय़ा कॉर्पोरेट्स आणि उद्योगांना लाइफस्टाइल आणि फिटनेस कन्सल्टंट हवे असतात. हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर ही संधी मिळू शकते.
पत्ता- श्री रामचंद्र युनिव्हर्सिटी, पोरुर, चैन्नई- ६००११६.
ईमेल- registrar@shriramchandra.edu.in
वेबसाइट- http://www.shriramchandra.edu.in
*    बीबीए इन टुरिझम
हा अभ्यासक्रम अविनाशलिंगम इन्स्टिटय़ूट फॉर होम सायन्स अ‍ॅण्ड हाय एज्युकेशन फॉर वुमेन युनिव्हर्सिटीने सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.
पत्ता- अविनाशलिंगम इन्स्टिटय़ूट फॉर होम सायन्स अ‍ॅण्ड हाय एज्युकेशन फॉर विमेन युनिव्हर्सिटी, मेटूपल्लायम रोड, भारथी पार्क रोड कोइम्बतोर- ६४१०४३.
वेबसाइट- http://www.avinuty.ac.in
ईमेल – vc@avinuty.ac.in
* बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट इन सप्लाय चेन मॅनेजमेंट
हा अभ्यासक्रम एनएसएचएम नॉलेज कॅम्पस संस्थेने सुरू केला आहे.
अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.
पत्ता- एनएसएचएम नॉलेज कॅम्पस, १२४ (६०) बी. एल. सहा रोड, कोलकाता- ७०००५३.
वेबसाइट- http://www.nshm.com
*    बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम
    उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाने इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेमार्फत पर्यटनविषयक विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त ठरतील असे पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
*बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन  
हा अभ्यासक्रम लखनौ विद्यापीठाशी संलग्न आहे.
अभ्यासक्रमाचा कालावधी- प्रत्येकी तीन वर्षे.
कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा
अभ्यासक्रम करता येतो.
*  बॅचलर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम  
हा अभ्यासक्रम लखनौ युनिव्हर्सिटीशी संलग्न आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी- प्रत्येकी तीन वर्षे. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो.
*  डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड एअर टिकेटिंग वुईथ कॉम्प्युटर रिझर्वेशन सिस्टीम
अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो.
 हा अभ्यासक्रम उत्तर प्रदेश पर्यटन संस्थेशी संलग्न आहे.
*  पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम मॅनेजमेंट. कालावधी- एक वर्ष.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
प्रवेश परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
*   एअर होस्टेस/ फ्लाइट स्टिवर्ड ट्रेनिंग प्रोग्रॅम
अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासक्रम उत्तर प्रदेश पर्यटन संस्थेशी संलग्न आहे.
*   पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टुरिझम मॅनेजमेंट
कालावधी- एक वर्ष.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
हा अभ्यासक्रम उत्तर प्रदेश पर्यटन संस्थेशी संलग्न आहे.
एअरपोर्ट पॅसेंजर सव्र्हिस एजंट
कालावधी- सहा महिने.
अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
हा अभ्यासक्रम उत्तर प्रदेश पर्यटन संस्थेशी संलग्न आहे.
पत्ता- विकल्प खंड, सीबी- सीआयडी ऑफिस, गोमती नगर, लखनौ- २२६०१०. वेबसाइट-    http://www.mkitm.com    ईमेल- info@mkitm.com (उत्तरार्ध)