22 November 2019

News Flash

यूपीएससी

मित्रांनो, यूपीएससीच्या पेपर- २मध्ये आकलन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याचे कारण असे की, यूपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सीसॅट पेपर- २ महत्त्वाचा आहे.

| March 9, 2015 02:07 am

मित्रांनो, यूपीएससीच्या पेपर- २मध्ये आकलन हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याचे कारण असे की, यूपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सीसॅट पेपर- २ महत्त्वाचा आहे. या प्रश्नपत्रिकेत होण्यासाठी आकलन हा घटक समजणे महत्त्वाचे आहे. आकलन या उपघटकावर आधारित प्रश्न सोडवताना सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना उतारे वाचण्यासाठी वेळ पुरत नाही. आकलन या घटकावरील उतारे इंग्रजी तसेच िहदीमध्ये भाषांतरित केलेले असतात. मात्र, भाषांतरित िहदी समजण्यासाठीही अत्यंत अवघड असते. (या विरोधात उत्तर भारतीय विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते हे आपल्याला ठाऊक असेल.)

यूपीएससीची परीक्षा महाराष्ट्रातून देणारे बरेच विद्यार्थी हे उतारे िहदीमध्ये वाचतात. त्यामुळे एकतर ते उतारे समजत नाहीत किंवा त्याला वेळ पुरत नाही. काही विद्यार्थी हे उतारे इंग्रजीमध्ये वाचतात. एखादा उतारा समजला नाही तर तो अध्र्यावर सोडून लगेच तो उतारा िहदीमधून वाचून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एकाच उताऱ्याला खूप वेळ दिल्याने वेळ
पुरत नाही.
काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत वेगळे घडते. परीक्षेच्या आधी हे विद्यार्थी कधीच या घटकाकडे लक्ष देत नाहीत. थेट परीक्षा केंद्रात जाऊन प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतरच उतारे सोडवण्यासाठी सुरुवात करतात. अशा परिस्थितीत ते उतारे योग्य पद्धतीने सोडवू शकत नाहीत, म्हणून या उपघटकांवर तयारी करण्यासाठी आजपासून विद्यार्थ्यांनी दररोज किमान दोन उतारे सोडविण्याचा सराव करावा. या उपघटकावर सुमारे ४० ते ५० प्रश्न विचारले जातात. आकलन या घटकांवर दोन प्रकारचे उतारे असतात.
आकलन (Comprehesion)-
आकलन म्हणजे एखादी गोष्ट समजून त्यावर योग्य निर्णय घेणे.
* इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य (English Language Comprehesion)-
इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य जाणून घेण्यासाठी जो उतारा दिलेला असतो, तो इंग्रजीत असतो. तो मराठीत भाषांतरित केलेला नसतो. २०१४ मध्ये इंग्रजी भाषेचे आकलन कौशल्य या उपघटकावर प्रश्न विचारले नव्हते, कदाचित आगामी परीक्षेतही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता नाही.
परीक्षेमध्ये आकलन विषयक उतारे सोडवताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत-
* परीक्षा कक्षात प्रचंड मानसिक ताण असतो. त्यामुळे बऱ्याचदा घाईगडबडीत माहिती असलेल्या गोष्टींतही चुका होतात. आकलन हा घटक असा आहे, जेथे अधिक गुण मिळविण्याची संधी असते. या घटकाच्या तयारीसाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची आवश्यकता नसते. दिलेल्या उताऱ्यातून उत्तरांची निवड करावी लागते. त्यामुळे सर्वप्रथम उताऱ्यांची संख्या किती आहे, लहान उतारे किती व मोठे उतारे किती आहेत, इंग्रजी उतारे किती आहेत हे पाहून वेळेचे नियोजन करावे लागते.
* उतारा योग्य गतीने एकाग्र होऊन वाचावा. उतारा असा वाचावा की तो पुन्हा वाचण्याची गरज पडणार नाही.
* उतारा वाचताना महत्त्वपूर्ण वाक्य पेन किंवा पेन्सिलने अधोरेखित करून ठेवावेत. उताऱ्यात लेखकाला काय मांडायचे आहे ते समजून घ्यावे.
* सीसॅट पेपर- २ चा पेपर सोडवताना आकलनक्षमता या घटकाला जास्तीत जास्त ५५ ते ६० मिनिटेच देता येतात आणि या ठरावीक वेळेमध्ये साधारण १०-११ उतारे वाचून त्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. या सर्व बाबींचा विचार केला तर एक उतारा वाचून त्यावरील प्रश्न सोडवण्यास जास्तीत जास्त सहा ते सात मिनिटे वेळ मिळतो.
* सर्वप्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवावेत, की प्रश्न वाचून उतारा सोडवावा, याबाबत मतमतांतरे आहेत. आपला ज्या पद्धतीने सराव असेल व ज्या पद्धतीने वेळ वाचत असेल ती पद्धत स्वीकारावी, उतारा वाचताना तो शब्द न् शब्द न वाचता उताऱ्यातील महत्त्वाच्या वाक्यांवर नजर फिरवल्यास, आपल्या वाचण्याचा वेग वाढतो.

First Published on March 9, 2015 2:07 am

Web Title: upsc 6
Just Now!
X