इंटिरिअर डिझाइनची उपशाखा मानली जाणारी फर्निचर डिझायिनग ही आज स्वतंत्र शाखा म्हणून विकसित होत आहे. फर्निचर डिझायिनगचे पदवी, पदविका तसेच अंशकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्याविषयी..
अलीकडे इंटिरिअर डिझायनिंगसंबंधातील अनेक घटकांना-उपघटकांना महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. त्यामुळे इंटिरिअरशी निगडित विविध कामांच्या स्वतंत्र शाखा विकसित होऊ लागल्या आहेत.
घराच्या स्टाइलला आकार देण्यात घरातील फर्निचर महत्त्वाचे ठरते. अलीकडच्या काळात डिझायनर फर्निचरची मागणी वाढली आहे. यामुळे या क्षेत्रात करिअर आणि व्यवसायाच्या विविध संधी मिळू शकतात. फर्निचर डिझायिनगची कला गेल्या अनेक दशकांत चांगली विकसित झाली. त्यात कालानुरूप बरेच बदल झाले. या क्षेत्रात आज अत्यंत प्रयोगशील बदल होताना दिसतात. फर्निचर डिझायिनगमध्ये समकालीन कलेच्या विविध बाबींचा मुक्तपणे आणि सर्जनशीलरीत्या वापर केला जात आहे. त्यामुळे अफलातून अशा स्टाइलच्या फर्निचरची निर्मिती होत आहे. अशा वेगळ्या फर्निचरला ग्राहकांकडून उत्तम मागणीही आहे.
फर्निचर डिझायनरना फर्निचरविषयक नव्या संकल्पना विकसित कराव्या लागतात. संकल्पनेनुसार  फर्निचरच्या आकृतीचे रेषाटन सुयोग्य रंगसंगतीसह करावे लागते. याकरता विविध संगणकीय सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग चित्रसंकल्पन नावीन्यपूर्ण आणि कलात्मक करण्यासाठी होतो. संगणकीय सॉफ्टवेअरमुळे चित्रसंकल्पना सुस्पष्ट आणि सूक्ष्म मुद्दय़ांसकट तयार करता येतात. या चित्रसंकल्पनेनुसार डिझायनर छोटी आकृती तयार करतात. काही डिझायनर निर्मात्यांसाठी अशा प्रतिकृती तयार करून देतात तर काही डिझायनर ग्राहकांच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार प्रतिकृती तयार करतात. फर्निचर  बनवताना ते आरामदायी आणि उपयुक्त होणे गरजेचे असते.
मोठय़ा फर्निचर कंपन्या डिझायनरना कामाच्या संधी उपलब्ध करून देतात. फर्निचर कंपन्यांकडून ग्राहकांना परवडतील अशा फर्निचरची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती केली जाते. काही कंपन्या व्यक्तिगत फर्निचरवर अधिक लक्ष केंद्रित करतात. कार्यालये, उंची घरे अशा ठिकाणी संबंधितांच्या आवडीनिवडीनुसार फर्निचरची निर्मिती करावी लागते. फर्निचर डिझायनर स्वतंत्र व्यवसाय करू शकतात. कामाचा दर्जा आणि गुणवत्तेनुसार ग्राहकवर्ग फर्निचरला पसंती देतो.
*    बॅचलर ऑफ डिझायिनग इन फर्निचर डिझायिनग
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थेने बॅचलर ऑफ डिझायिनग इन फर्निचर डिझायिनग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. कालावधी चार वष्रे.
या संस्थेने फíनचर अ‍ॅण्ड इंटिरिअर डिझाइन या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- बीई/ बीटेक/ बॅचलर ऑफ डिझाइन/ बी आर्क/ बॅचलर ऑफ इंटिरिअर डिझाइन किंवा मान्यताप्राप्त संस्थेची इंटिरिअर डिझाइन विषयातील पदविका. डिझायिनगच्या क्षेत्रात उत्कृष्ट करिअर घडविणारी संस्था असा नावलौकिक नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन या संस्थेने निर्माण केला आहे. ही आपल्या देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील एकमेव संस्था आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा नागपूर, नॉयडा, भोपाळ, चंदिगड, हैदराबाद, गुवाहाटी, अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई, कानपूर, कोची, दिल्ली या केंद्रांवर दरवर्षी जानेवारी महिन्यात घेतली जाते. या परीक्षेमधून निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अहमदाबाद येथे स्टुडियो टेस्ट आणि मुलाखतीसाठी एप्रिल/मेमध्ये बोलावले जाते. जूनच्या मध्यापासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला प्रारंभ होतो.
बी. डिझाइन या अभ्यासक्रमाचा दरवर्षीचा खर्च साधारणत: २ लाख दहा हजार रुपये आहे. पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी चार वर्षांचा आहे. एम. डिझाइन या अभ्यासक्रमाचा दरवर्षीचा खर्च साधारणत: २ लाख ५५,८०० रुपये आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा कालावधी अडीच वर्षांचा आहे.
गांधीनगर येथील कॅम्पसमध्येच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी होस्टेलची सोय आहे. अहमदाबाद आणि बेंगळुरू येथील कॅम्पसमध्ये अशी सोय उपलब्ध नाही. या संस्थेतील दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना केंद्र सरकार, एनआयडी संस्था आणि फोर्ड फाऊंडेशनची शिष्यवृत्ती दिली जाते. संस्थेच्या अभ्यासक्रमाची भाषा इंग्रजी असल्याने उमेदवारांना कामचलाऊ इंग्रजी येणे आवश्यक आहे. पत्ता- एनआयडी, पालडी, अहमदाबाद- ३८०००७, गुजरात. वेबसाइट- http://www.nid.edu
* ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटिरिअर स्पेस अ‍ॅण्ड फर्निचर डिझाइन :
पुणे येथील महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ इंजिनीअिरग अ‍ॅण्ड एज्युकेशनल रिसर्च या संस्थेअंतर्गत कार्यरत असणारी एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन ही खासगी क्षेत्रातील महत्त्वाची संस्था होय. या संस्थेने फर्निचर डिझायिनग या विषयातील ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटिरिअर स्पेस अ‍ॅण्ड फर्निचर डिझाइन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांला हा अभ्यासक्रम करता येतो.
या अभ्यासक्रमाच्या निवड प्रक्रियेमध्ये डिझाइन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट, स्टुडिओ टेस्ट आणि मुलाखत या दोन बाबींचा समावेश आहे. प्रवेश परीक्षा पुणे, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, दिल्ली या केंद्रांवर घेण्यात येते.
पत्ता- एमआयटी इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, राजबाग, लोणी काळभोर, हडपसरच्या बाजूला, पुणे- ४१२२०१.
ई-मेल- admissions@mit.edu.in
वेबसाइट- http://www.mitid.edu.in
*    टेक्निकल डिप्लोमा प्रोग्रॅम इन फर्निचर डिझायिनग :
सृष्टी स्कूल ऑफ आर्ट, डिझायिनग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेने टेक्निकल डिप्लोमा प्रोग्रॅम इन फर्निचर डिझायिनग हा
३ वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी. या अभ्यासक्रमाला प्रवेशपरीक्षा, मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो. पत्ता- सी.ए. साइट नंबर १६, येलाहंका, न्यू टाऊन, दोद्दाबल्लापूर रोड, बेंगळुरू- ५६०१०६.
ई-मेल- marketing@srishti.ac.in/admissions@srishti.ac.in
वेबसाइट- http://www.srishti.ac.in
*    फ्लोरेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन इंटरनॅशनल :
परदेशात फर्निचर डिझायिनगमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करायचा असेल तर फ्लोरेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन इंटरनॅशनल हा अभ्यासक्रम करता येईल. इंग्रजीमध्ये शिकवला जाणारा हा अभ्यासक्रम अल्पकालीन आहे. या संस्थेने फर्निचर डिझायिनगमधील चार महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम सुरू केला आहे. संपर्क- फ्लोरेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन इंटरनॅशनल बॉर्गो ओग्निस्सॅन्टी, फ्लोरेन्स इटली.
वेबसाइट- http://www.florencce-institute.com
ई-मेल- registrar@Florence-Institute.com

नया है यह!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स-
हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या
डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय अभ्यास केंद्राने सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- एक वर्ष. पत्ता- जे. पी. नाईक, पहिला मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व)- ४०००९८.
सुरेश वांदिले – ekank@hotmail.com