आपण भारताची प्राकृतिक रचना (हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण) पाहणार आहोत. प्राकृतिकदृष्टय़ा भारताचे विभाजन पुढील पाच प्रकारे होते- १) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश २) उत्तर भारतीय मदानी प्रदेश ३) भारतीय द्विपकल्पीय पठारी प्रदेश
४) भारतीय किनारी मदानी प्रदेश ५) भारतीय बेटे.
*    उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश : हिमालय. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे. सिंधू नदी व ब्रह्मपुत्रा नदीच्या घळयांदरम्यान हिमालयाच्या तीन समांतर पर्वतरांगा असून त्यांना बहिर्वक्र आकार प्राप्त झाला आहे. हिमालय पर्वतप्रणाली गुंतागुंतीची असून हिमालयाची उत्त्पती व क्रांती याबाबत निरनिराळ्या भूशास्त्रज्ञांनी वेगवेगळी मते
मांडली आहेत.
*    हिमालय पर्वताच्या रांगा
=    ट्रान्स हिमालय : बृहद्  हिमालयाच्या उत्तरेस ट्रान्स हिमालयाच्या रांगा आहेत. ट्रान्स हिमालयाचा विस्तार पश्चिम – पूर्व दिशेने असून त्याची सरासरी लांबी एक हजार किमी इतकी आहे. ट्रान्स हिमालयात खालील रांगांचा समावेश होतो- अ) काराकोरम रांगा ब) लडाख रांगा
क) कैलास रांगा.
अ)    काराकोरम रांगा : भारतातील सर्वात उत्तरेला असलेल्या या रांगांमुळे भारताची अफगाणिस्तान आणि चीनसोबत सरहद्द निर्माण होते. काराकोरमचा विस्तार पामीरपासून पूर्वेकडे गिलगिट नदीच्या पूर्वेला ८०० किमी. पर्यंत आहे. जगातील सर्वात उंचीचे २ नंबरचे आणि भारतीय सरहद्दीमधील सर्वात उंच शिखर के-2 (गॉडविन ऑस्टिन) याच रांगेमध्ये आहे. जगातील काही मोठय़ा हिमनदीची निवासस्थाने या रांगेत आहेत. उदा. सियाचिन, बाल्टेरो, बायाफो, हिस्पर. काराकोरम रांगेत अत्यंत उंच शिखरे आहेत. काही शिखरांची उंची ८,००० मी. पेक्षा जास्त आहे.
ब)    लडाख रांग : सिंधू नदी आणि तिची उपनदी श्योक यांच्या दरम्यान लडाख रांग आहे. लडाख रांगेची लांबी ३०० किमी आणि सरासरी उंची ५,८०० मी. आहे.
क) कैलास रांग : लडाख रांगेची शाखा पश्चिम तिबेटमध्ये कैलास रांग या नावाने परिचित आहे. सर्वात उंच शिखर कैलास आहे.
*    बृहद् हिमालय (Greater Himalaya)
    वैशिष्टय़े : लेसर हिमालयाच्या उत्तरेकडे भिंतीसारखे पसरलेली बृहद् हिमालयाची रांग आहे. बृहद् हिमालय मुख्य मध्यवर्ती प्रणोदामुळे लेसर हिमालयापासून वेगळा झाला आहे. बृहद् हिमालयाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या रांगेत जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. या रांगेत जगातील सर्वात उंच शिखर मांऊट एव्हरेस्ट आहे. या रांगेतील अन्य शिखरे उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे आहेत- १) एव्हरेस्ट
२) कांचनगंगा ३) मकालू ४) धवलगिरी ५) अन्नपूर्णा
 ६) नंदादेवी ७) कामेत ८) नामच्या बरवा ९) गुरला मंधता १०) बद्रिनाथ.
*    लेसर  हिमालय/मध्य हिमालय (Lesser or Middle Himalaya) : दक्षिणेकडील शिवालिक रांगा व उत्तरेकडील बृहद् हिमालय या दोघांना समांतर असा, लेसर हिमालय पसरलेला आहे. लेसर हिमालयाची रचना गुंतागुंतीची असून या पर्वताची सरासरी उंची ३,५०० ते ५,००० मी.  दरम्यान आहे. लेसर हिमालयात पुढील रांगांचा समावेश होतो- पीरपंजाल,  धौलाधर, मसुरी व नागतिब्बा, महाभारत.
=    पीरपंजाल : काश्मीरमधील ही  सर्वात लांब रांग असून हिचा विस्तार झेलमपासून उध्र्व बियास नदीपर्यंत सुमारे ४०० किमी पर्यंतचा आहे. रावी नदीच्या आग्नेयकडे ही रांग पुढे धौलाधर म्हणून ओळखली जाते.
=    धौलाधर रांग : पीरपंजाल रांग पूर्वेकडे ‘धौलाधर’ या नावाने प्रसिद्ध आहे. ही रांग पुढे धर्मशाळा व सिमलामधून जाते.
=    मसुरी, नागतिब्बा रांग : लेसर हिमालयाच्या पूर्वेकडे जाताना फक्त काही रांगाच स्पष्टपणे ओळखता येतात. यापकी मसुरी आणि नाग तिब्बा या रांगा आहेत.
=    महाभारत रांग : मसुरी रांग पुढे नेपाळमध्ये महाभारत रांग म्हणून ओळखली जाते.
*    महत्त्वाच्या खिंडी : पीरपंजाल, बिदिल खिंड, गोलाबघर खिंड, बनिहल खिंड.
*    महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे : लेसर हिमालयात सिमला (हिमाचल प्रदेश), मसुरी, राणीखेत, ननिताल, अल्मोडा (उत्तराखंड), दार्जििलग (प. बंगाल)

डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
Household Consumption Expenditure Survey report
विश्लेषण : दरडोई घरगुती खर्च किती वाढतो आहे?
secularism in india conception of secularism in indian constitution
संविधानभान : भारतीय धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप