नेव्हल आर्किटेक्चर आणि ओशन इंजिनीअिरग हा करिअरची उत्तम संधी देणारा अभ्यासक्रम आहे.
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी :
विद्यापीठाने नेव्हल आíकटेक्चर आणि ओशन इंजिनीअिरग या विषयातील पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले आहेत. जहाजबांधणी, दुरुस्ती आणि cr02बंदर अभियांत्रिकी यामध्ये कौशल्य प्राप्त करून देणारे हे अभ्यासक्रम आहेत.
ओशन इंजिनीअिरग या अभ्यासक्रमात सागरी वाहतूक आणि सागरी पर्यावरणाच्या अनुषंगाने रचना, निर्मिती, विकास, कार्यान्वय, नियोजन यांचे प्रशिक्षण दिले जाते. नेव्हल आíकटेक्चर या शाखेतील अभियंते आणि तज्ज्ञांना जागतिक पातळीवर विविध करिअर संधी उपलब्ध होतात. यामध्ये डिझायनर, बांधकाम निरीक्षक, सल्लागार, विपणन आणि विक्री, कामाचे नियमन, सर्वेक्षण, संशोधन, विकास, शिक्षण-प्रशिक्षण यांचा समावेश करता येतो. हा अभ्यासक्रम केल्यावर कोस्टल इंजिनीअर, एन्व्हायरॉन्मेन्टल इंजिनीअर म्हणून संधी मिळू शिकते. किनारा संरक्षणाच्या विविध संसाधनांची निर्मिती, बंदरे आणि जेट्टींचे डिझाइन, बांधणी, देखभाल, दुरुस्ती आदी जबाबदाऱ्या कोस्टल इंजिनीअरला पार पाडाव्या लागतात.
घातक मानवी प्रदूषण तसेच इतर कृत्यांपासून समुद्र आणि किनाऱ्यांचे संरक्षण करण्याचे काम मुख्यत्वे एन्व्हायरॉन्मेन्टल इंजिनीअरना करावे लागते. सागरी खनिजे, लाटांद्वारे निर्माण होणारी ऊर्जा अशा विविध घडामोडींचा अभ्यास हे अभियंते करतात. सागराचे सर्वेक्षण करणे, त्यासंबंधित नकाशे तयार करणे ही कामे ओशन इंजिनीअरला करावी लागतात. याकरता अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा विकास हे अभियंते करतात. सागरातील वादळे, इतर अडथळे यांपासून जहाजे अथवा इतर साधनसामग्रीचे संरक्षण करण्यासाठी अशा आरेखनांचा उपयोग होतो. या अभियंत्यांना सागराच्या आतील ध्वनिलहरींचा अभ्यास करावा लागतो. त्याद्वारे सागरतळाचा सविस्तर अभ्यास करणे शक्य होते. लाटांच्या वेगाचे गणित, त्याचे विविध परिणाम याविषयीचे काम या अभियंत्यांना करावे लागते. सागरी जीवशास्त्र, सागरी भूगर्भशास्त्र आदी शाखांच्या अभ्यासातही या तज्ज्ञांचा सहभाग घेतला जातो.
=    इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिीच्या स्कूल ऑफ नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरगने चार वष्रे कालावधीचा बीटेक- नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरग हा अभ्यासक्रम विशाखापट्टणम कॅम्पस येथे सुरू केला आहे. अर्हता- बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरीने ६० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. प्रत्येक वर्षांला अभ्यासक्रमाची फी- २ लाख २५ हजार रुपये.
=    तीन वर्षे कालावधीचा बी.एस्सी- शिप बििल्डग अ‍ॅण्ड रिपेअर हा अभ्यासक्रम कोचीन कॅम्पसमध्ये सुरू करण्यात आला आहे. अर्हता- बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात सरासरी ५० टक्के गुण आणि इंग्रजीमध्ये ५० टक्के गुण मिळायला हवेत. प्रत्येक वर्षांला अभ्यासक्रमाची फी मुलांसाठी- २ लाख रुपये, मुलींसाठी- १ लाख ४० हजार ५०० रुपये.
=    पदव्युत्तर अभ्यासक्रम अर्हता/ फी- एमटेक- नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरग आणि एमटेक- ड्रेजिंग अ‍ॅण्ड हार्बर इंजिनीअिरग- ६० टक्के गुणांसह मेकॅनिकल/ सिव्हिल/ एरॉनॉटिकल/ मरिन/ नेव्हल आíकटेक्चर. एम.टेक अभ्यासक्रमाची फी दरवर्षी- सव्वादोन लाख. पत्ता- इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी, ईस्ट कोस्ट रोड, उत्थंडी, चेन्नई-६००११९.
    वेबसाइट- http://www.imu.edu.in
अ‍ॅकॅडेमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अ‍ॅण्ड ट्रेिनग :
=    बी.ई. नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ऑफशोअर इंजिनीअिरग.
=    बी.ई. हार्बर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरग हे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमांना संस्थेच्या चाचणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
=    पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- एम.टेक इन नेव्हल आर्किटेक्चर अ‍ॅण्ड ऑफशोअर इंजिनीअिरग.
=    इतर अभ्यासक्रम- एम.टेक- मरिन इंजिनीअिरग मॅनेजमेंट, एम.टेक- पॉवर सिस्टीम्स अ‍ॅण्ड ऑफशोअर इंजिनीअिरग, एम.एस्सी इन मरिन बायोटेक्नॉलॉजी, एम.एस्सी इन फ्लीट ऑपरेशन्स मॅनेजमेंट. पत्ता- एएमईटी युनिव्हर्सटिी, १३५, कांथूर- ६०३११२. वेबसाइट-  http://www.ametuniv.in
    ई-मेल- office@ametuniv.ac.in
ल्ल    इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रास : मद्रास येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिपार्टमेंट ऑफ ओशन इंजिनीअिरग या संस्थेने बीटेक इन नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरग आणि बीटेक-एमटेक नेव्हल आíकटेक्चर अ‍ॅण्ड ओशन इंजिनीअिरग हा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमांना JEE-ADVANCED  या परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो.
=    पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- एम.टेक इन ऑफशोअर स्ट्रक्चरल इंजिनीअिरग आणि एमटेक इन ओशन इंजिनीअिरग. या अभ्यासक्रमांना GATE परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. पत्ता- डिपार्टमेंट ऑफ ओशन इंजिनीअिरग, आयआयटी मद्रास, चेन्नई- ६०००३६.
    वेबसाइट- www. iitm.ac.in
    ई-मेल- headoec@iitm.ac.in
व्यवस्थापकीय अभ्यासक्रम
सागरी वाहतूक, संशोधन, व्यापार, उद्योग या क्षेत्रांत वित्तीय नियोजन, अर्थशास्त्र, व्यापारशास्त्र, कायदे, व्यावसायिक व्यूहनीती, मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय व्यापार, ब्रँिडग, पुरवठा साखळीचे व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन आदी बाबी हाताळण्यासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते. या बाबी लक्षात घेऊन पुढील स्पेशलाइज्ड एमबीए अभ्यासक्रम सुरू
करण्यात आले आहेत-
इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सटिी– = कोलकाता कॅम्पस- एमबीए (इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स), एमबीए (पोर्ट अ‍ॅण्ड शििपग मॅनेजमेंट) = चेन्नई कॅम्पस- एमबीए- इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स
= कोचिन कॅम्पस- एमबीए- इंटरनॅशनल ट्रान्सपोर्टेशन अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स, एमबीए- पोर्ट अ‍ॅण्ड शििपग मॅनेजमेंट. एमबीए अभ्यासक्रमाची फी दरवर्षी- २ लाख रुपये.
अ‍ॅकॅडेमी ऑफ मेरिटाइम एज्युकेशन अ‍ॅण्ड ट्रेिनग- एमबीए- शििपग अ‍ॅण्ड लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, एमबीए- ऑइल अ‍ॅण्ड शििपग मॅनेजमेंट. कालावधी- प्रत्येकी २ वष्रे. संस्थेने बीबीए इन शििपग अभ्यासक्रम सुरू केला आहे.
कोईम्बतूर मरिन कॉलेज- एमबीए- लॉजिस्टिक्स अ‍ॅण्ड शििपग. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी. पत्ता- २९६, पोल्लाची मेन रोड, मायलेरिपल्यम, कोईम्बतूर- ६४१०३२. वेबसाइट- http://www.cms.ac.in
 िहदुस्थान इन्स्टिटय़ूट ऑफ मेरिटाइम ट्रेिनग– या संस्थेने चेन्नई येथे तामिळनाडू मुक्त विद्यापीठाच्या साहाय्याने दोन वष्रे कालावधीचा एमबीए- शििपग अ‍ॅण्ड लॉजिस्टिक मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
    वेबसाइट- http://www.himtmarine.com
    ई-मेल- himt@vsnl.com ÎIYUF infor@himt

नया है यह!
मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ इन ऑक्युपेशनल अ‍ॅण्ड एन्व्हॉयरन्मेन्टल हेल्थ –
हा अभ्यासक्रम श्री रामचंद्र युनिव्हर्सटिीने सुरू केला आहे. कालावधी- दोन वष्रे. अर्हता- बी.टेक- केमिकल इंजिनीअिरग/ बी.ई- सिव्हिल/ एम.एस्सी- रसायनशास्त्र/ प्राणिशास्त्र/ वनस्पतीशास्त्र/ पर्यावरणशास्त्र/ एमबीबीए/ बीडीएस/ पत्ता- चेन्नई- ६००११६.
वेबसाइट- http://www.sriramchandra.edu.in

-सुरेश वांदिले – ekank@hotmail.com