साई पालखीचे २ जुलैला शिर्डीकडे प्रस्थान

गुरुपौर्णिमेनिमित्त ‘श्री साई पालखी सोहळा २०१४’ चे आयोजन करण्यात आले आहे.पालखी २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कसबा गणपती मंदिर येथून शिर्डीकडे प्रस्थान ठेवणार आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त ‘श्री साई पालखी सोहळा २०१४’ चे आयोजन करण्यात आले आहे. पालखी २ जुलै रोजी सकाळी ९ वाजता कसबा गणपती मंदिर येथून शिर्डीकडे प्रस्थान ठेवणार आहे.
पालखी १० जुलै रोजी शिर्डीत दाखल होणार आहे. मोहनबुवा रामदासी यांच्या हस्ते पालखीची सुरुवात होणार आहे. या वेळी अप्पासाहेब शिंदे, अनिरुद्ध देशपांडे आणि माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यंदा खास पालखीसाठी आधुनिक सुविधा व आकर्षक दिसणारा ‘साईरथ’ तयार करण्यात आला आहे. रिलीजियर्स आर्ट गॅलरीचे जयंतीभाई सारस्वत यांनी हा रथ तयार केला आहे. प्रस्थानादरम्यान बंडगार्डन येथील पर्णकुटी चौकात हेलिकॉप्टरद्वारे पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sai palanquin from 2nd july for shirdi

ताज्या बातम्या