अपंग व्यक्ती, भिन्नमती व्यक्ती, रुग्ण तसेच आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या व्यक्तींची सेवा करण्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकविणाऱ्या अभ्यासक्रमांची माहिती-

रुग्ण, अपंग व्यक्ती, वृद्ध व्यक्ती, आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या व्यक्ती यांना योग्य ती मदत, योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी ती व्यक्ती प्रशिक्षित असणे आज अत्यावश्यक मानले जाते. सामाजिक उत्तरादायित्व आणि भावनिक गुंतवणुकीची आवश्यकता असलेले हे सेवाव्रत आज व्यावसायिक संधी मिळवून देते.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल डिफेन्स या संस्थेने सर्टिफिकेट कोर्स इन जेरिअ‍ॅट्रिक केअर हा सहा महिने कालावधीचा पूर्ण वेळेचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. ही संस्था केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे.
अर्हता- दहावी उतीर्ण. १ ऑक्टोबर २०१४ रोजी उमेदवाराची १८ वर्षे पूर्ण असायला हवीत. उच्च वयोमर्यादा- ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी ४५. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोलकाता, नवी दिल्ली, भुवनेश्वर, आगरताळा, बेंगळुरू, कुन्नम कुलम/कोचीन आणि हैदराबाद या ठिकाणी कॉमन अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट आणि त्यानंतर मुलाखत व समूह चर्चा घेतली जाईल. अर्ज व माहितीपत्रकासाठी संपर्क पत्ता- डेप्युटी डायरेक्टर, ओल्ड एज केअर डिव्हिजन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, वेस्ट ब्लॉक-१, विंग-३, फर्स्ट फ्लोर, आर. के. पुरम, न्यू दिल्ली- ११००६६. वेबसाइट-  www.nisd.gov.in
या अभ्यासक्रमासाठी २७ टक्के जागा इतर मागासवर्गीयांसाठी राखीव असतात. ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती आणि १५ टक्के जागा अनुसूचित जाती संवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येतात. तीन टक्के जागा शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी राखीव आहेत. अर्ज socialjustice.nic.in या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतो. हा डाऊनलोड केलेला अर्ज ८० रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसह संस्थेला पाठवावा लागेल. प्रत्येक केंद्रासाठी प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या अभ्यासक्रमाला कोणतीही फी नाही. हा अभ्यासक्रम अनिवासी स्वरूपाचा असल्याने विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था स्वत: करावी लागते. वृद्धांसाठी काम करत असलेल्या उमेदवारांना प्रवेशाच्या वेळी प्राधान्य दिले जाते. वृद्धांची काळजी घेण्यासाठी कौशल्य प्राप्त केलेल्या उमेदवारांची मोठय़ा प्रमाणावर गरज भासत आहे. हा अभ्यासक्रम त्याच हेतूने चालविण्यात येतो. स्वयंसेवी संस्थांना असे कौशल्य प्राप्त असलेल्या आणि क्षेत्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते.
नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स वुइथ मल्टिपल डिसॅबिलिटीज- नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स वुइथ मल्टिपल डिसॅबिलिटीज ही संस्था केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असणारी महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेने पुढील  अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
*    बॅचलर ऑफ एज्युकेशन इन स्पेशल एज्युकेशन (मल्टिपल डिसॅबिलिटीज)- अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष.
प्रवेश जागा- २०. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
*    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अर्ली इंटरव्हेन्शन- अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. एकूण जागा- १५. अर्हता- एमबीबीएस किंवा बॅचलर ऑफ एज्युकेशन इन स्पेशल एज्युकेशन (मल्टिपल डिसॅबिलिटीज) किंवा मास्टर्स इन चाइल्ड डेव्हलपमेंट किंवा मास्टर्स इन चाइल्ड सायकॉलॉजी.
*    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेव्हलपमेन्टल थेरपी- फिजिकल अ‍ॅण्ड न्यूरॉलॉजिकल. अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष आणि तीन महिने. एकूण जागा- २५. अर्हता- एमबीबीएस किंवा बीएस्सी इन लाइफ सायन्स किंवा बॅचलर इन डिसॅबिलिटी रिहॅबिलिटेशन किंवा मास्टर्स इन चाइल्ड डेव्हलपमेंट किंवा मास्टर्स
इन चाइल्ड सायकॉलॉजी.
*    डिप्लोमा इन एज्युकेशन- स्पेशल एज्युकेशन- डेफ ब्लाइंडनेस. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे. एकूण जागा- ३१. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण.
*    डिप्लोमा इन एज्युकेशन- स्पेशल एज्युकेशन- सेरेब्रल पाल्सी. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे. एकूण जागा- ३१,
अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण.
*    डिप्लोमा इन एज्युकेशन- स्पेशल एज्युकेशन- ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. अभ्यासक्रमाचा कालावधी- दोन वर्षे. एकूण जागा- ३१, अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण. पत्ता- नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स वुइथ मल्टिपल डिसॅबिलिटीज, ईसीआर, मुत्तूकडू, कोवालम,
चेन्नई-६०३११२. वेबसाइट- http://www.niepmd.tn.nic
    ईमेल- niepmd@gmail.com
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे विविध अभ्यासक्रम- केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन या विषयाशी निगडित विविध अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने चालविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
*    कॉम्प्रिहेन्सिव्ह डिझास्टर रिस्क मॅनेजमेंट फ्रेमवर्क-अभ्यासक्रमाचा कालावधी- सहा आठवडे.
*    डॅमेज अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन नीड्स असेसमेन्ट-
अभ्यासक्रमाचा कालावधी- चार आठवडे.
*    रिस्क सेन्सेटिव्ह अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन- अभ्यासक्रमाचा कालावधी- चार आठवडे.
*    रिस्क अ‍ॅनालिसीस- अभ्यासक्रमाचा कालावधी- चार आठवडे
*    कम्युनिटी बेस्ड डिझास्टर मॅनेजमेंट, अभ्यासक्रमाचा कालावधी- चार आठवडे
*    क्लायमेट चेंज अ‍ॅण्ड डिझास्टर रिस्क- अभ्यासक्रमाचा कालावधी- चार आठवडे.
*    फायनान्शिअल स्ट्रॅटेजीज फॉर मॅनेजिंग द इकॉनॉमिक इम्पॅक्ट्स ऑफ नॅचरल डिझास्टर- अभ्यासक्रमाचा कालावधी- चार आठवडे.
*    अर्थक्वेव रिस्क रिडक्शन- अभ्यासक्रमाचा कालावधी-
चार आठवडे.
*    सेफ सिटीज- अभ्यासक्रमाचा कालावधी- चार आठवडे.
*    जेंडर अ‍ॅस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर रिकव्हरी अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन- अभ्यासक्रमाचा कालावधी- चार आठवडे. पत्ता-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, आयआयपीए कॅम्पस, आयपी इस्टेट, रिंग रोड,
न्यू दिल्ली- ११०००२. वेबसाइट-  www.onlinenidm.gov.in

पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया-
पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत सार्वजनिक आरोग्याशी निगडित विविध नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-
पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत-
*    इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड पीएच.डी इन क्लिनिकल रिसर्च- हा अभ्यासक्रम दिल्ली कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
*    इंटिग्रेटेड मास्टर ऑफ सायन्स अ‍ॅण्ड पीएचडी इन हेल्थ इन्फर्मेटिक्स- हा अभ्यासक्रम हैदराबाद कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
*    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पब्लिक हेल्थ मॅनेजमेन्ट. हा अभ्यासक्रम दिल्ली, गांधीनगर, हैदराबाद आणि भुवनेश्वर कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
*    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हेल्थ इकॉनॉमिक्स, हेल्थ केअर फायनान्सिंग अ‍ॅण्ड हेल्थ पॉलिसी. हा अभ्यासक्रम दिल्ली कॅम्पसमध्ये शिकवला जातो.
*    पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बायोस्टॅटिस्टिक्स अ‍ॅण्ड डाटा मॅनेजमेन्ट. हा अभ्यासक्रम हैदराबाद कॅम्पसमध्ये शिकवला जातो. पत्ता- मॅनेजर अ‍ॅकॅडेमिक प्रोग्रॅम, पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया, इन्स्टिटय़ूट ऑफ स्टडीज इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट, ४ इन्स्टिटय़ूशन एरिया, वसंत कुंज,
न्यू दिल्ली- ११००७०. इमेल- acad@phfi.org
    वेबसाइट- http://www.phfi.or