Permutation and Combination (2)
(मांडणी व जुळवणी)
Permutation या प्रकारात काही उदाहरणे स्वर आणि व्यंजनाशी संबंधित असतात. ती उदाहरणे खालीलप्रमाणे सोडवावीत.
१) POLICY या शब्दातील सर्व अक्षरे फक्त एकदाच वापरून, असे किती ६ अक्षरी शब्द तयार होतील, की  ज्यांची सुरुवात स्वराने झालेली असेल?
१) १२२    २) १२४    ३) १४४        ४) २४०
स्पष्टीकरण : इंग्रजीत A,E,I,O,U हे स्वर आहेत. यांपकी  POLICY  या शब्दात I  व O  हे स्वर आहेत, म्हणून त्यांची मांडणी खालील प्रकारे होऊ शकते-
आता I व O  एक गट मानल्यास उरलेल्या ५ ठिकाणी अक्षरांची मांडणी
up09

अशा प्रकारे करता येईल तसेच I व O  या गटातील अक्षरांची मांडणी, एक तर O  पहिल्या ठिकाणी व  I दुसऱ्या ठिकाणी किंवा क पहिल्या ठिकाणी व ड दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे
up08

UPSC Civil Services Result 2023 Marathi News
UPSC Result 2023: नागरी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल जाहीर; असा पाहा ऑनलाइन निकाल
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
IB Recruitment 2024
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ६६० पदांसाठी भरती; अशा प्रकारे करता येणार अर्ज
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…

प्रकारे करता येईल, म्हणून स्वर पहिल्या ठिकाणी ठेवून POLICY या शब्दापासून 2 x 120 = 240 शब्द तयार होतील.
२) POLICY या शब्दातील सर्व अक्षरे फक्त एकदाच वापरून, असे किती ६ अक्षरी शब्द तयार होतील, की ज्यांच्यामध्ये व्यजंन हे एकत्र असतील?
    १) १२२    २) १२४    ३) १४४    ४) २४०
स्पष्टीकरण : POLICY  या शब्दात ४ व्यंजने आहेत, P,L,C,Y , या चार व्यंजनांचा एक गट मानल्यास, हा ४ अक्षरांपासून तयार झालेल्या व्यंजनांचा एक गट म्हणजे हे एक अक्षर मानले व उरलेले  I व O  ही २ अक्षरे म्हणजे ३ अक्षरांचा गट तयार होतो. त्यांची मांडणी खालीलप्रमाणे करता येते :  
up07

up06

आता ४ व्यंजनांचा तयार केलेल्या गटातील अक्षरांची मांडणी
up05

इतक्या प्रकारे करता येईल.
म्हणून शब्दातील अक्षरे एकदाच वापरून व्यंजने एकत्र असलेले
शब्द = 24x 6 = 144 इतके असतील.
३) POLICY या शब्दातील सर्व अक्षरे फक्त एकदाच वापरून, असे किती ६ अक्षरी शब्द तयार होतील, की ज्यामध्ये स्वर हे सम स्थानावर असतील?
    १) १२२    २) १२४    ३) १४४    ४) २४०
स्पष्टीकरण : POLICY या शब्दात I व O  हे स्वर आहेत,
up04    

या ६ अक्षरांच्या शब्दात आकृतीत दाखविल्याप्रमाणे फक्त ३ समस्थानके आहेत.
(२,४,६) व फक्त २ स्वर आहेत व उरलेले ४ शब्द हे व्यंजने आहेत. आता ३ समस्थानके २ स्वरांनी
up03

जेव्हा आपण दोन स्वरांची समस्थानकांवर मांडणी करतो तेव्हा ४ स्थानके ही शिल्लक राहतात, म्हणजे आता ४ व्यंजने ४ ठिकाणी मांडणी खालील प्रकारे करता येईल-
up02

म्हणून सर्व अक्षरे फक्त एकदाच वापरून, ६ अक्षरी एकूण शब्द    
 = 24x 6 = 144
४) २, ३, ४, ५, ६ या अंकांचा फक्त एकदाच वापर करून असे चार अंकी किती अंक तयार होतील?
    १) १२०    २) १३०    ३) १४०    ४) १२४
स्पष्टीकरण : दिलेले अंक २, ३, ४, ५, ६ असे असून यापासून चार अंकी अंक तयार करायचे आहे, म्हणजे थोडक्यात २३४५, ३४५६, ३२४५, ४५६२ इ.
    म्हणून तयार होणारे अंक = ५ पैकी ४
up01

डॉ. जी. आर. पाटील- grpatil2020@gmail.com