scorecardresearch

Premium

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत स्वागत

पावणेपाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडच्या प्रवेशद्वाराजवळ निगडीत पालखीचे आगमन झाले. या वेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत स्वागत

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी उद्योगनगरीत जोरदार स्वागत करण्यात आले. सायंकाळी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखी मुक्कामासाठी पोहोचली. शनिवारी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. विविध संस्था, संघटनांनी पालखीचे जागोजागी स्वागत केले. त्याचप्रमाणे, विविध वस्तूंचे वाटपही केले.                                                                                       आषाढी वारीसाठी संत तुकोबांच्या पालखीचे गुरुवारी देहूगावातून प्रस्थान झाले. तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाडय़ात झाला. शुक्रवारी सकाळी  पालखीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. पावणेपाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडच्या प्रवेशद्वाराजवळ निगडीत पालखीचे आगमन झाले. या वेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. या निमित्ताने पिंपरी महापालिकेने भक्ती शक्ती शिल्पसमूहालगत स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, आयुक्त राजीव जाधव आदींनी पालखीचे स्वागत केले. पालिकेच्या वतीने ३५० दिंडीप्रमुखांना शिल्पाकृती भेट स्वरूपात देण्यात आली. या वेळी देहू देवस्तानचे रामदास मोरे, अशोक मोरे, अभिजित मोरे, सुनील मोरे, जालिंदर मोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी आकुर्डीगावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी पोहोचली. या वेळी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. आकुर्डीतील मुक्कामानंतर शनिवारी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान, पिंपरी पालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना शाळा उपलब्ध करून देण्यासह विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठाविषयक सुविधा दिल्याचे पालिकेने कळवले आहे.

Shivaji Maharaj
लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा – मुनगंटीवार
khamgaon gajanan maharaj viral video
Video : खामगावात कथित ‘गजानन महाराज’ प्रगटले! तोतया की बहुरुपी?, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा…
Whale fish Vomiting seized Mahabaleshwar
सातारा : महाबळेश्वरमध्ये साडेसहा कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त
chital, Chital injured in collision with unknown vehicle gondiya
गोंदिया : अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ जखमी

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wari palanquin tukaram welcome

First published on: 21-06-2014 at 03:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×