योगगुरू, योगतज्ज्ञ आणि या क्षेत्रातील व्यवस्थापन याविषयीचे अभ्यासक्रम आणि संधींविषयी..

Google New App Photomath let you take a picture of a math equation and help you solve it step by step
गूगलकडे आहे ‘असा’ एक ॲप; विद्यार्थ्यांची गणितं सोडवली जातील मिनिटांत, जाणून घ्या
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

२१ जून २०१६ रोजी दुसरा जागतिक योग दिवस साजरा केला जाईल. योग शास्त्रास भारतात प्राचीन काळापासून महत्त्व होतेच. पण गेल्या काही दशकांत योगाभ्यास सर्व जगात केला जात आहे. मानवी मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची उपयुक्तता आता सिद्ध झाली आहे. काही योगगुरूंनी अथक परिश्रम आणि निष्ठेने योगाचा प्रचार-प्रसार केला आहे. सध्याच्या  काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरू वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढली आहे.

योग विषयाचे शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था

  • मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ योग या संस्थेमार्फत (१) बी.एस्सी इन योगा हा तीन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. अर्हता- १२ वी विज्ञान परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयात सरासरीने ५० टक्के गुण. १ ऑगस्ट रोजी उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा अधिक नसावे. हा अभ्यासक्रम गुरू गोिवद सिंघ इंद्रप्रस्थ युनिव्हर्सटिीशी संलग्न आहे. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या प्रत्येक उमेदवारास ३ हजार रुपयाचे विद्यावेतन दिले.
  • डिप्लोमा इन योग सायन्स हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम असून कोणत्याही विद्याशाखेतील ५० टक्के गुणप्राप्त पदवीधरास करता येतो. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गासठी ४५ टक्के गुण. पदव्युत्तर पदवी असल्यास प्रवेशाच्या वेळेस ५ टक्के वेटेज दिले जाते. वयोमर्यादा १ ऑगस्ट रोजी ३० वर्षांपेक्षा कमी असावे. पहिल्या सत्रातील निकालावर आधारित १३ गुणवंत उमेदवारांना दरमहा ३००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
  • सर्टििफकेट कोर्स इन योगासना फॉर हेल्थ प्रमोशन- कालावधी- ३ महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी. अभ्यासक्रम अंशकालीन, ५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
  • सर्टििफकेट कोर्स इन प्राणायम अ‍ॅण्ड मेडिटेशन फॉर हेल्थ प्रमोशन- कालावधी- ३ महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२ वी. अभ्यासक्रम अंशकालीन, एकूण जागा ५०.
  • मॉडय़ुलर सर्टििफकेट कोर्स इन योगा सायन्स- जागतिक पातळीवर योगाचे महत्त्व वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाची संरचना. योग प्रशिक्षक व गुरूंसाठी उपयुक्त. मानसिक, आध्यात्मिक व शारीरिक क्षमता वाढीसाठीचे आवश्यक असणारे प्रशिक्षण अभ्यासक्रमात दिले जाते. कालावधी- साडेतीन महिने. अर्हता – कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण.
  • फाउंडेशन कोर्स इन योगा सायन्स फॉर प्रमोशन ऑफ हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस अभ्यासक्रम. एकूण जागा ५०. कालावधी- एक महिना, संपर्क- मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ योग, ६८, अशोका रोड गोल डाकखाना, नवी दिल्ली- ११०००१, संकेतस्थळ- http://www.yogamdniy.nic.in, आणि mdniy@yahoo.co.in
  • स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था या संस्थेस डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेचे अभ्यासक्रम * बी.एस्सी इन योग अ‍ॅण्ड कॉन्सियसनेस- अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी. कालावधी- ३ वष्रे. अभ्यासक्रमाचा प्रारंभ १ ऑगस्टपासून. उमेदवारांना स्वत:चे योग केंद्र काढण्याची क्षमता आणि कौशल्य प्राप्त होईल असे शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते.

* बी.एस्सी इन योग अ‍ॅण्ड एज्युकेशन- अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील १२ वी. कालावधी- ३ वष्रे. हा निवासी स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. उच्च माध्यमिक शाळांमध्ये योग शिकवण्याचे क्षमता आणि कौशल्य या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केले जाते. इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे.

* बी.एस्सी इन योग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट- अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२वी. कालावधी- ३ वष्रे. या  योग व व्यवस्थापन ज्ञानशाखेचा समन्वय यावर आधारित.

* बी.एस्सी इन योग थेरपी- अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२वी. कालावधी- ३ वष्रे. या अभ्यासक्रमात रुग्णालये, शुश्रूषा गृहे, निसर्गोपचार केंद्रे, हेल्थ क्लब यासाठी लागणाऱ्या योगोपचारतज्ज्ञ निर्मितीचे शिक्षण आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमाद्वारे दिले जाते. स्वत:चे योग केंद्र चालवण्याचे कौशल्यही शिकवले जाते. निवडीसाठी परीक्षा ३० जुल २०१६ रोजी संस्थेच्या कॅम्पसमध्ये घेतली जाईल.

* बॅचलर ऑफ नेचरोपथी अ‍ॅण्ड योगिक सायन्स- अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही विषयातील १२ वी. कालावधी- ५ वष्रे. यात वैद्यकीय निसर्गोपचार आणि योग विज्ञान यांचा समन्वय साधला जातो. निवड मुलाखत वा चाळणी परीक्षेद्वारे केली जाते.

* योग इन्स्ट्रक्टर- या अभ्यासक्रमाचा कालावधी एक महिन्याचा आहे. योगाचे धडे इतरांना देण्या इतपत या प्रशिक्षणाद्वारे संबंधित उमेदवारांना सक्षम केले जाते. अर्हता- ५० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील १२वी.

  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ योगिक सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च- या संस्थेचे अभ्यासक्रम- =सर्टििफकेट कोर्स इन योगिक सायन्स अ‍ॅण्ड नेचर क्युअर. कालावधी- ३ महिने. अर्हता- १० वी.

संपर्क- द, िप्रसिपल, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ योगिक सायन्स अ‍ॅण्ड रिसर्च, सत्यानंद धाम, प्लॉट नंबर बी /१३९, एचआयजी बीडीए डुप्लेक्स, आरबीआय कॉलनी, बारामुंडा, भुवनेश्वर- ७५१००३ ओडिशा. संकेतस्थळ- http://www.iiysar.co.in ईमेल- iiysar.office@gmail.com

* ाास्टर्स डिग्री इन योगा- कालावधी- दोन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. हा अभ्यासक्रम उत्कल युनिव्हर्सटिी ऑफ कल्चरशी संलग्नित आहे. संपर्क- प्रशांती, कुटिरम, विवेकानंद रोड, कल्लूबल्लू, पोस्ट जिगानी अनेकल, बेंगळुरू- ५६०१०५. संकेतस्थळ- http://svyasa.edu.in ईमेल-  info@svyasa.edu.in

  • गुरूकुल कांग्री विश्वविद्यालय हरिद्वार- संस्थेचे अभ्यासक्रम

*सर्टििफकेट कोर्स इन योग. कालावधी सहा महिने. * बॅचलर ऑफ आर्ट्स इन योग. कालावधी- तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही शाखेतील १२वी उत्तीर्ण. * पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन ह्य़ुमन कॉन्शिएसनेस अ‍ॅण्ड योगिक सायन्स * मास्टर ऑफ आर्ट्स इन ह्य़ुमन कॉन्शिएसनेस अ‍ॅण्ड योगिक सायन्स. कालावधी- दोन वष्रे. संपर्क- रजिस्ट्रार, गुरुकूल कांग्री विश्वविद्यालय, गुरुकुल कांग्री, हरिद्वार-२४९४०४. संकेतस्थळ- http://gkv.ac.in ई-मेल- registrar@gkv.ac.in

  • देव संस्कृती विश्वविद्यालय- संस्थेचे अभ्यासक्रम- *सर्टििफकेट कोर्स इन योग अ‍ॅण्ड अल्टरनेटीव्ह थेरपी. *सर्टििफकेट कोर्स इन होलिस्टिक हेल्थ मॅनेजमेंट *बॅचलर ऑफ आर्ट्स इन योगिक सायन्स * बॅचलर ऑफ सायन्स इन योगिक सायन्स * मास्टर ऑफ आर्ट्स इन अप्लाइड योगा अ‍ॅण्ड ह्य़ुमन एक्सलेन्स * बॅचलर ऑफ सायन्स इन योगिक सायन्स अ‍ॅण्ड होलिस्टिक हेल्थ *मास्टर ऑफ आर्ट्स इन ह्य़ुमन कांशिएसनेस अ‍ॅण्ड योगिक सायन्स =पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन ह्य़ुमन कॉन्शिएसनेस अ‍ॅण्ड योगिक थेरपी * इंटिग्रेटेड मास्टर्स डिग्री प्रोग्रॅम इन एम.ए. इन अप्लाइड योग अ‍ॅण्ड ह्य़ुमन एक्सलन्स * इंटिग्रेटेड मास्टर्स डिग्री प्रोग्रॅम इन एम.एस्सी. इन योगिक सायन्स अ‍ॅण्ड होलिस्टिक हेल्थ * डॉक्टारेट इन ह्य़ुमन कॉन्शिएसनेस अ‍ॅण्ड योगिक सायन्स संपर्क- देव संस्कृती विश्वविद्यालय, गायत्रिकुंज- शांतिकुंज, हरिद्वार- २४९४११, संकेतस्थळ- http://www.dsvv.ac.in/, इ-मेल- info@dsvv.ac.in
  • राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन योग थेरपी अ‍ॅण्ड स्ट्रेस मॅनेजमेंट- कालावधी- एक र्वष. इंटर्नशीप- सहा महिने. अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी. पतंजली योगशास्त्राची मानवी मन व शरीर सुदृढ राहण्यासाठी उपयुक्तता यावर आधारित अभ्यासक्रमात. संस्कृत भाषेचे ज्ञान असल्यास उत्तम. संपर्क- राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, तिरुपती- ५१७५०७, आंध्रपदेश, संकेतस्थळ http://rsvidyapeetha.ac.in , ईमेल-registrar_rsvp@yahoo.co.in’