scorecardresearch

ज्वेलरी डिझाइन

ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्राशी संबंधित करिअर संधींचा आढावा आणि विविध अभ्यासक्रमांची माहिती..

ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्राशी संबंधित करिअर संधींचा आढावा आणि विविध अभ्यासक्रमांची माहिती..
दागिन्यांची निर्मिती आणि दागिन्यांचे डिझायनिंग ही क्षेत्रे वेगाने वाढत आहेत. सोने, चांदी, हिरे, मोती, विविध रंगांचे मौल्यवान खडे, मणी, धातू आदींपासून बनवण्यात येणाऱ्या दागिन्यांच्या निर्मितीत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील करिअरच्या संधीही विस्तारत आहेत. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही भारत हा ब्रँडेड दागिने निर्यात करणारा आघाडीचा देश बनू पाहतोय. या क्षेत्रातील तज्ज्ञांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रातही करिअर करण्याची संधी मिळू शकते. भारतीय उद्योगजगताशी निगडित शिखर संस्था ‘असोचॅम’च्या निरीक्षणानुसार पुढील एक-दोन वर्षांत मौल्यवान खडे आणि दागिन्यांच्या क्षेत्राची वाढ २.१३ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. हे क्षेत्र गेल्या काही वर्षांत सातत्य राखून दरवर्षी १५ टक्क्यांनी वाढत आहे.
करिअर संधी :
या क्षेत्रात पुढीलप्रमाणे करिअर संधी मिळू शकतात- ज्वेलरी डिझायनर, ज्वेलरी र्मचडायजर, एक्झिबिशन मॅनेजर, प्रॉडक्शन मॅनेजर, कािस्टग मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर इन एक्सप्लोरेशन, एम्ब्रॉयडरी मेकर अ‍ॅण्ड इनोव्हेटर, मॅनेजर इन म्युझियम अ‍ॅण्ड आर्ट गॅलरी, ज्वेलरी सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, ज्वेलरी फॅशन कन्सल्टंट, ज्वेलरी इलुस्ट्रेटर, उद्योजक, ज्वेलरी प्लॅिनग अ‍ॅण्ड कन्सेप्ट मॅनेजर, जेम ग्रायंडर, जेम पॉलिशर, जेमस्टोन अप्रायझर, ज्वेलरी सेंटर्स, जेम्स असॉर्टर, ज्वेलरी हिस्टॉरियन, ग्रेिडग कन्सल्टंट.

ज्वेलरी डिझाइन अभ्यासक्रम आणि शिक्षणसंस्था :
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी :
या संस्थेची स्थापना जेम्स आणि ज्वेलरी निर्यात मंडळाने केली आहे. या मंडळास केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहाय्य लाभले आहे. जेम्स आणि ज्वेलरी या उद्योगासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळासाठी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेला ज्वेलरी आणि जेम्स उद्योगाचे संपूर्ण सहकार्य प्राप्त झाले आहे. या संस्थेचे संचालन या उद्योगाशी संबंधित ज्येष्ठ मंडळी करतात. या संस्थेत विविध प्रकारचे आणि कालावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. संस्थेचे अभ्यासक्रम
पुढीलप्रमाणे आहेत-

बी.ए. इन ज्वेलरी डिझाइन अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चुिरग टेक्निक : ही पदवी मेवार विद्यापीठामार्फत दिली जाते. अर्हता- कोणत्याही ज्ञानशाखेतील बारावी उत्तीर्ण. कालावधी- तीन वष्रे. या अभ्यासक्रमात दागदागिन्यांची ओळख, दागिन्यांची डिझाइन्स, निर्मिती, दागिन्यांच्या अनुषंगाने सांस्कृतिक अभ्यास, समकालीन दागिन्यांचा अभ्यास, हिरे आणि त्याचे श्रेणीकरण, जेमॉलॉजी, दागिन्यांची विक्री, दागिने डिझाइन संशोधन आणि प्रकल्प, निर्मिती तंत्रज्ञान, धातूशास्त्र, विक्री आणि विपणन, बाजारपेठेचे संशोधन आदी विषय शिकवले जातात. दागिन्यांचे डिझाइन आणि विक्री किंवा निर्मिती किंवा विक्री आणि विपणन यांपकी एका विषयात स्पेशलाझेशन करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाइन अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चुिरग टेक्नॉलॉजी: कालावधी- ३ वष्रे. अर्हता- बारावी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाचा प्रारंभ- जुल.

डिप्लोमा इन ज्वेलरी टेक्निक अ‍ॅण्ड मॅनेजमेंट : कालावधी-
३ वष्रे. अर्हता- बारावी उत्तीर्ण. अभ्यासक्रमाचा प्रारंभ- जुल. या अभ्यासक्रमात ज्वेलरी डिझाइन, निर्मिती आणि व्यवस्थापन या तीन बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांमध्ये व्यवस्थापकीय कौशल्य आणि निर्मिती कौशल्य यांची उत्तम जाण निर्माण होण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो.

पोस्ट गॅ्रज्युएट डिप्लोमा इन ज्वेलरी टेक्निक अ‍ॅण्ड मॅनेजमेंट: कालावधी- १ वर्ष. अर्हता- पदवी उत्तीर्ण.

डिप्लोमा इन ज्वेलरी मॅनेजमेंट : कालावधी- सहा महिने. अर्हता- बारावी उत्तीर्ण. हा अभ्यासक्रम वेिलगकर स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे.

प्रोफेशनल सर्टििफकेट कोर्स : प्रत्येकी ५४० तासांचे हे अभ्यासक्रम ज्वेलरी डिझाइन, ज्वेलरी मॅन्युफॅक्चुिरग, कॉम्प्युटर एडेड टेक्निक्स इन ज्वेलरी या विषयांमध्ये करता येतात.
अर्हता- बारावी.
संपर्क- बागमल लक्ष्मीचंद पारिख कॅम्पस, प्लॉट क्र. १११/२, १३वा मार्ग, एमआयडीसी अंधेरी- पूर्व,
मुंबई- ४०००९३. संकेतस्थळ- http://www.iigj.org
ईमेल- admission@iigjmumbai.org, info@iigj.org connect@iigijmumbai.org, tardeo@iigjmumbai.org

जेमॉलॉजिकल इन्स्टिटय़ूट ऑफ अमेरिका (जीआयए) :
मणी आणि रंगीत खडे यांबाबत शिक्षण-प्रशिक्षण देणारी, संशोधनास वाव देणारी आणि तसेच या क्षेत्रातील उद्योग-व्यवसाय वाढीस साहाय्य करणारी अशी ही संस्था आहे. या संस्थेमार्फत पुढील अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत-

ग्रॅज्युएट डायमंड डिप्लोमा : हिऱ्यांचे श्रेणीकरण, कार्यप्रणाली, हिऱ्याचे मूल्य निर्धारित करणारी रंगसंगती, स्पष्टता, कॅरेट, वजन यासारखी घटकमूल्ये, हिऱ्याची गुणवत्ता पारखण्याकरता उपयुक्त ठरणारे घटक, हिऱ्यांची पारख, उद्योग क्षेत्रातील विविध घटक, ग्राहकांवर प्रभाव पाडण्याचे कौशल्य आदी विषय या अभ्यासक्रमात शिकवले जातात.

ग्रॅज्युएट जेमॉलॉजिस्ट डिप्लोमा : या अभ्यासक्रमात विविध मौल्यवान खडय़ांची पारख आणि श्रेणीकरण तंत्र शिकवले जाते आणि ही पारख करण्यासाठी मायक्रोस्कोप, पोलॅरिस्कोप, स्पेक्ट्रोस्कोप आणि इतर अत्याधुनिक संसाधनाचा वापर करण्याचे कौशल्य शिकवले जाते.

ग्रॅज्युएट कलर्ड स्टोन्स डिप्लोमा : या अभ्यासक्रमात विविध मौल्यवान खडय़ांची आणि मण्यांची पारख, रेफ्रॉक्टोमीटर, स्पेक्ट्रोस्कोप, पोलॅरिस्कोप आदी आधुनिक संसाधनांचा पारख करण्यासाठी अचूक वापर कसा करावा, नसíगक प्रकिया केलेले आणि कृत्रिम खडय़ांचे अचूक निदान करण्याचे तंत्र, खडय़ांच्या रंगांचा किमतीवर होणारा परिणाम, वाणिज्यिकदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले खडे, ६० हून अधिक खडय़ांचा अभ्यास आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

ज्वेलरी डिझाइन : या अभ्यासक्रमात दागिन्यांच्या डिझाइनची मूलभूत संकल्पना, कलाकुसर, धातूला विविध आकर्षक आकार देणे, निर्मितीसाठी आवश्यक विविध साधने आणि साहित्याचा वापर आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाते.
संपर्क- जीआयए, इंडिया लेबॉरेटरी प्रायव्हेट लिमिटेड, दहावा मजला, ट्रेड सेंटर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व),
मुंबई- ४०००५१. संकेतस्थळ- http://www.giaindia.in
ई-मेल-eduindia@gia.edu

पर्ल अकॅडेमी :
या संस्थेने चार वष्रे कालावधीचा लाइफ स्टाइल अ‍ॅक्सेसरी डिझाइन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. यामध्ये ज्वेलरी डिझाइन या शाखेचा समावेश आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. संपर्क- ए २१/१३, नारायण इंडस्ट्रियल एरिया, फेज टू, शादिपूर मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली- ११००२८. संकेतस्थळ- pearlacademy.com
ईमेल- counsellor@ pearlacademy.com

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, गांधीनगर :
या संस्थेत बॅचलर ऑफ डिझाइन इन अ‍ॅक्सेसरी डिझाइन हा चार वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी. या संस्थेने ज्वेलरी डिझाइन अ‍ॅण्ड हॅण्ड क्राफ्ट हा एक वर्ष कालावधीचा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी. संपर्क- जीएच-ओ सर्कल, गांधीनगर- ३८२००७.
संकेतस्थळ- http://www.nift.ac.in/gandhinagar

मराठीतील सर्व way to success ( Way-to-success ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jewellery designing

ताज्या बातम्या