मार्केटिंग आणि ब्रँडिंग विषयक अभ्यासक्रम विविध अभ्यासक्रमांची ओळख..
मार्केटिंग आणि ब्रँडिंग हे आज कॉर्पोरेट विश्वाचा महत्त्वाचे भाग बनले आहेत. मार्केटिंग कम्युनिकेशनच्या क्षेत्रात आता इंटरनेटही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आंतरशाखीय विषयांच्या योग्य समन्वयातून यशस्वी ब्रँिडगसोबत विक्रीच्या विविध माध्यमांना गती मिळू शकते. व्यवस्थापन आणि विपणन या विषयांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले उमेदवार या क्षेत्रांत वेगाने प्रगती करू शकतात. मार्केटिंगविषयक तज्ज्ञाने कंपनीच्या वस्तूंचा आणि उत्पादनांचा दर्जा उच्च प्रतीचा राहील याकडे कंपनीचे लक्ष सातत्याने वेधणे आवश्यक आहे, कारण कमी प्रतीची गुणवत्ता आणि दर्जाहीन उत्पादनांची विक्री यामुळे मार्केटिंग पुरते अयशस्वी ठरू शकते.
गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्या कंपनीला ब्रँिडग करणे शक्य होत नाही. अशा कंपन्या ग्राहकांचा विश्वास प्राप्त करू शकत नाहीत. मार्केटिंग कम्युनिकेटर हा ग्राहक व कंपनी आणि विविध माध्यमे यांच्यातील महत्त्वाचा व प्रभावी दुवा ठरू शकतो. एखाद्या कंपनीचे बाजारपेठेतील सध्याचे स्थान आणि भविष्यात या स्थानात होणारी घट अथवा वाढ याविषयी मार्केटिंग कम्युनिकेटर आपल्या कौशल्याद्वारे अथवा ज्ञानाद्वारे कंपनी व्यवस्थापकांना योग्य अशी माहिती देत सावधगिरीच्या उपयोजनाही सूचित करू शकतात.
मार्केटिंग कम्युनिकेटरला जीवनशैलीत सातत्याने होणारे बदल आणि त्यामुळे विविध वस्तू अथवा उत्पदकांची मागणी अथवा घट यांचा अंदाज येऊ शकतो. त्यानुसार कंपनीच्या विक्री अथवा उत्पादनांच्या बाबतच्या व्यूहनीतीत सातत्याने बदल करता येणे शक्य होऊ शकते. कम्युनिकेशन आणि मॅनेजमेंट या दोन विषयांतील पदवीधर तसेच पदव्युत्तर पदविका प्राप्त उमेदवार मार्केटिंग कम्युनिकेशनच्या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात.
मुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हर्टायजिंग, झेवियर इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन या संस्था मार्केटिंग कम्युनिकेशन या विषयांत स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम चालवतात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि कंपन्या, कॉर्पोरेट मीडिया एजन्सीज आणि डिपार्टमेंट्स, कम्युनिकेशन कन्सल्टंट्स यांत मार्केटिंग कम्युनिकेटर विषयक करिअरच्या संधी मिळू शकतात.

संस्था आणि अभ्यासक्रम
* एस.पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट : या संस्थेने बॅचलर ऑफ बिझनेस कम्युनिकेशन हा चार वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमामध्ये ई-कम्युनिकेशन आणि रेप्युटेशन मॅनेजमेंट या विषयांवर भर दिला जातो.
संपर्क संकेतस्थळ- spjaininstitute.com/bba

* सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सटिी : या संस्थेने बीबीए इन मार्केटिंग मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम सुरूकेला आहे. कालावधी-तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
संपर्क संकेतस्थळ- smude.edu.in

* युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम अ‍ॅण्ड एनर्जी स्टडीज : अभ्यासक्रम- बीबीए विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग, कालावधी- तीन वष्रे. अर्हता- दहावी-बारावीमध्ये किमान
५० टक्के गुण. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
संकेतस्थळ- upes.ac.in

* सिम्बॉयसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज, नॉयडा : अभ्यासक्रम- बीबीए विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग, कालावधी- तीन वष्रे. अर्हता- बारावीमध्ये किमान ५० टक्के गुण. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
निवड- चाळणी परीक्षेद्वारे http://www.set-test.org
संकेतस्थळ- http://www.scmsnoida.ac.in

* अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी- अभ्यासक्रम: बीबीए विथ मार्केटिंग अ‍ॅण्ड सेल्स. कालावधी- तीन वष्रे. अर्हता- बारावीमध्ये किमान ६० टक्के गुण. कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.
संकेतस्थळ- amity.edu

* मुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन : या संस्थेने सुरू केलेले अभ्यासक्रम :
पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा प्रोग्रॅम इन मार्केटिंग कम्युनिकेशन- कालावधी- दोन वष्रे. कोणत्याही विषयातील पदवीधर हा अभ्यासक्रम करू शकतात.
संपर्क- मुद्रा इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, अहमदाबाद- ३८००५८. संकेतस्थळ- http://www.mica.ac.in
ईमेल- admissionenquiry@micamail

* पोस्ट ग्रॅज्युएट सर्टििफकेट प्रोग्रॅम इन मार्केटिंग अ‍ॅण्ड ब्रॅण्ड मॅनेजमेंट. हा अभ्यासक्रम ऑनलाइन करता येतो. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ जून महिन्यात होतो. कालावधी- चार महिने. हा अभ्यासक्रम कोणत्याही विषयातील पदवीधर करू शकतात. संपर्क- http://www.talentedge.in

* झेवियर इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायिझग अ‍ॅण्ड मार्केटिंग कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- झेवियर इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन,सेंट झेवियर्स महाविद्यालय,
मुंबई- ४००००१. संकेतस्थळ- xaviercomm.org
ईमेल- admin@xaviercomm.org

* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हर्टायजिंग : अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन मॅनेजमेंट. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. कालावधी- दोन वष्रे. संपर्क- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हर्टायजिंग, नॉयडा- २०१३०१. संकेतस्थळ- niaindia.org
ईमेल- admissions@niaindia.org

* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन : या संस्थेने मास्टर ऑफ डिझाइन इन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट डिझाइन हा अभिनव अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- अडीच वष्रे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन, पालडी, अहमदाबाद- ३८०००७.
संकेतस्थळ- http://www.nid.edu

* इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अ‍ॅडव्हर्टायजिंग अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन. कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. संपर्क- इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशन, जेएनयू
न्यू कॅम्पस, अरुणा आसिफअली रोड, न्यू दिल्ली- ११००६७.
संकेतस्थळ- http://www.iimc.nic.in

 

प्री-सी जनरल पर्पज रेटिंग्ज (शिप क्रू)
ओरिसा मेरिटाइम अ‍ॅकॅडेमी या संस्थेने व्यापारी, प्रवासी आणि व्यावसायिक जहाजांवर विविध प्रकारच्या कामांसाठी आवश्यक असे कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्मितीसाठी प्री-सी जनरल पर्पज रेटिंग्ज (शिप क्रू) हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- ४० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण. इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयात किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे किंवा बारावी किंवा आयटीआय. दहावीत किंवा बारावीमध्ये इंग्रजी विषयात ४० टक्के गुण मिळणे आवश्यक. वयोमर्यादा- साडेसतरा ते २५ वष्रे. अभ्यासक्रमाचा कालावधी- ६ महिने. शुल्क- एक लाख ५ हजार रुपये. यामध्ये निवास व भोजनव्यवस्था, शिकवणी शुल्क आणि परीक्षा शुल्काचा समावेश आहे. संपर्क- ओरिसा मेरिटाइम अ‍ॅकॅडमी, पॅरॉदीप, ओडिशा- ७५४१४२.
संकेतस्थळ – http://www.odishamaritime.com, admnof.oma@gmail.com