इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट या संस्थेने सुरू केलेल्या पर्यटन विषयक व्यवस्थापन अभ्यासक्रमाची ओळख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पर्यटन व्यवसाय वेगाने वाढत आहे. कोणत्याही उद्योगासाठी आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरज या क्षेत्रासही जाणवू लागली आहे. या अनुषंगाने इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट या संस्थेने या क्षेत्राला उपयुक्त ठरतील असे व्यवस्थापन शाखेतील एमबीए अभ्यासक्रम सुरू केले आहेत.

ही संस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे. पर्यटन विषयक सर्व प्रकारचे प्रशिक्षण देणारी ही देशातील आघाडीची संस्था आहे. या संस्थेची स्थापना १९८३ साली करण्यात आली. या संस्थेत पर्यटन क्षेत्राच्या विविधांगी पलूंचे संशोधन केले जाते तसेच विविध प्रकारच्या सल्ला सेवाही संस्थेत उपलब्ध आहेत. या संस्थेचे कॅम्पस ग्वाल्हेर, नेल्लोर, नॉयडा, गोवा, भुवनेश्वर येथे आहेत.

या संस्थेने आधुनिक जगातील पर्यटनविषयक उद्योगाच्या विविध गरजा आणि कौशल्ये लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना केली आहे. या संस्थेत प्रत्यक्ष सराव आणि आधुनिक बदलत्या प्रवाहांचे शिक्षण दिले जाते. ग्वाल्हेर आणि भुवनेश्वर कॅम्पसमध्ये टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल अभ्यासक्रम, नॉयडा कॅम्पसमध्ये टुरिझम अ‍ॅण्ड लेजर अभ्यासक्रम, ग्वाल्हेर कॅम्पसमध्ये टुरिझम सíव्हस अभ्यासक्रम, ग्वाल्हेर कॅम्पसमध्ये इंटरनॅशनल टुरिझम बिझनेस अभ्यासक्रम, भुवनेश्वर कॅम्पसमध्ये इंटरनॅशनल टुरिझम बिझनेस अभ्यासक्रम (लॉजिस्टिक्स), नेल्लोर कॅम्पसमध्ये टुरिझम अ‍ॅण्ड कार्गो अभ्यासक्रम, गोवा कॅम्पसमध्ये इंटरनॅशनल टुरिझम बिझनेस अभ्यासक्रम हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

प्रवेश जागा :

सर्व संस्थांमध्ये एकूण ६०० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. यामध्ये १५ टक्के जागा अनुसूचित जाती, ७.५ टक्के जागा अनुसूचित जमातींसाठी, नॉन क्रिमीलेअर इतर मागास वर्ग संवर्गासाठी २७ टक्के आणि शारीरिकदृष्टय़ा अपंगांसाठी ३ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात.

अर्हता : या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या खुल्या गटातील व इतर मागास वर्ग संवर्गातील उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि जमाती आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग संवर्गातील उमेदवारांसाठी गुणांची टक्केवारी किमान ४५ टक्के. ओबीसी उमेदवारांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असल्यासच त्यांना या संवर्गासाठी असलेल्या सोयीसुविधांचा लाभ मिळतो.

प्रवेश प्रक्रिया :

संस्थेतील प्रवेशासाठी पुढील प्रक्रियेचा अवलंब केला जातो-

  • मॅट- मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- aima.in
  • कॅट- कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट- iimcat.ac.in
  • सीमॅट- कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट- aicte-cmat.in
  • झ्ॉट- झेवियर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- xatonline.net
  • जीमॅट- गॅ्रज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन टेस्ट- mba.com
  • एटीएमए-एआयएमस टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन.

या परीक्षेतील गुण किंवा संस्थेच्या चाळणी परीक्षेतील गुण- ७० टक्के वेटेज, समूह चर्चा- १५ टक्के वेटेज, मुलाखत- १५ टक्के वेटेज.

या संस्थेची प्रवेश परीक्षा आयआयटीटीएम- अ‍ॅडमिशन टेस्ट दर वर्षी साधारणत: मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घेतली जाते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात समूह चर्चा आणि मुलाखती घेतल्या जातात. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडय़ात निकाल घोषित केला जातो. प्रत्यक्ष शैक्षणिक सत्राचा प्रारंभ १८ जुलपासून होतो.

शुल्क :

या संस्थेतील अभ्यासक्रमांचे शुल्क पुढीलप्रमाणे आहे- सत्राच्या प्रारंभी हे शुल्क भरावे लागते. पहिल्या सत्रामध्ये प्रवेश व शिकवणी, परीक्षा, संगणक शुल्क, अनामत रक्कम (५,५०० रुपये), विमा हप्ता, विद्यार्थी कल्याण निधी, क्रीडा, सांस्कृतिक निधी, दुसऱ्या सत्रामध्ये शिकवणी शुल्क, परीक्षा शुल्क, अभ्यास दौरा शुल्क, संलग्नता शुल्क, तिसऱ्या सत्रामध्ये वाचनालय व संगणक शुल्क, नोंदणी शुल्क, प्लेसमेंट शुल्क, पदवीदान, चौथ्या सत्रामध्ये शिकवणी शुल्क अणि परीक्षा शुल्काचा समावेश असतो.

विविध अभ्यासक्रमांचे शुल्क– =एमबीए- टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल : पहिले सत्र- ७१ हजार २५० रुपये, दुसरे सत्र- ७८,९०० रुपये, तिसरे सत्र- ७१,२५० रुपये. =एमबीए- टुरिझम अ‍ॅण्ड लेजर : पहिले सत्र- ७१ हजार २५० रुपये, दुसरे सत्र- ७८,९०० रुपये, तिसरे सत्र- ७१,२५० रुपये. =एमबीए- टुरिझम सíव्हस : पहिले सत्र- ८८ हजार  रुपये, दुसरे सत्र- ८३,५०० रुपये, तिसरे सत्र- ८२,२०० रुपये. =एमबीए- इंटरनॅशनल टुरिझम बिझनेस- पहिले सत्र- ८८ हजार रुपये, दुसरे सत्र- ८३,५०० रुपये, तिसरे सत्र- ८२,२०० रुपये, चौथे सत्र- ५४ हजार ५०० रुपये. =एमबीए- इंटरनॅशनल टुरिझम बिझनेस (लॉजिस्टिक्स)- पहिले सत्र- ८८ हजार रुपये, दुसरे सत्र- ८३,५०० रुपये, तिसरे सत्र- ८२,२०० रुपये, चौथे सत्र- ५४ हजार ५०० रुपये, =एमबीए- टुरिझम अ‍ॅण्ड कार्गो- पहिले सत्र- ८८ हजार  रुपये, दुसरे सत्र- ८३,५०० रुपये, तिसरे सत्र- ८२,२०० रुपये, चौथे सत्र- ५४ हजार ५०० रुपये, =एमबीए- इंटरनॅशनल टुरिझम बिझनेस- पहिले सत्र- ८८ हजार  रुपये, दुसरे सत्र- ८३,५०० रुपये, तिसरे सत्र- ८२,२०० रुपये, चौथे सत्र- ५४ हजार ५०० रुपये.

सोयीसुविधा : या संस्थेत जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक सेवासुविधा उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. यामध्ये २४ तास वायफाय, एअर कंडिशनर, प्रोजेक्टर आदींचा समावेश आहे. ग्वाल्हेर कॅम्पसमध्ये पर्यटन उद्योगाशी संबंधित सवरेत्कृष्ट वाचनालय, संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधा, खेळ सुविधासुद्धा आहेत.

ग्वाल्हेर, भुवनेश्वर आणि नॉयडा येथील कॅम्पसमध्ये वसतिगृहाची सोय आहे. प्रत्येक सत्रासाठी याचे शुल्क ५,५०० रुपये ७,५०० रुपये आहे. भोजनालयाचे शुल्क दरमहा ३ हजार रुपये ते ३६०० रुपयांच्या दरम्यान आहे.

शिष्यवृत्ती 

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट या संस्थेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांसाठी विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. या शिष्यवृत्ती पर्यटन क्षेत्राशी निगडित कंपन्या व उद्योजकांनी प्रायोजित केल्या आहेत. साधारणत: १५० उमेदवारांना याचा लाभ मिळतो. प्रत्येक अभ्यासक्रमातील प्रत्येक सत्रात सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या एका महिला व एक पुरुष उमेदवारास संस्थेच्या नियमानुसार शुल्कमाफी दिली जाते.

संपर्क : इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड ट्रव्हल मॅनेजमेंट, गोिवदपुरी, ग्वाल्हेर- ४७४०११.

ई-मेल : csbarua0003@rediffmail.com

 

इंटलेक्चुएल प्रॉपर्टी राइट्स अ‍ॅण्ड इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी इन इंटरनेट एज

द इंडियन लॉ इन्स्टिटय़ूट या संस्थेने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम ऑनलाइनरीत्या करता येतो.

या अभ्यासक्रमात पॅटेन्ट, कॉपीराइट्स, ट्रेडमार्क आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. बारावीनंतर कोणत्याही विषयातील पदवी अथवा पदविका प्राप्त केलेला उमेदवार हा अभ्यासक्रम करू शकतात. अभ्यासक्रमाचे शुल्क ५ हजार रु.

संपर्क : भगवानदास रोड, न्यू दिल्ली- ११०००१

संकेतस्थळ : www.ili.ac.in

ई-मेल :  e_cyber@ili.ac.in

 

 

 

मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mba in tourism
First published on: 27-04-2016 at 06:54 IST