20 January 2018

News Flash

…म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी मतदान करणार नाहीत

वाजपेयी पाचवेळा लखनऊचे खासदार राहिले आहेत

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: March 21, 2017 5:16 PM

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

उत्तर प्रदेशातील १४१ क्रमांकाचे मतदार असलेले अटल बिहारी वाजपेयी (९२) यंदाही मतदान करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. माजी पंतप्रधान वाजपेयी पाचवेळा लखनऊमधून खासदार म्हणून निवडून आले आहेत. वाजपेयी यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत शेवटचे मतदान केले आहे, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय असलेल्या शिवकुमार यांनी दिली आहे. वाजपेयी यांनी २००४ मध्ये शेवटची लोकसभा निवडणूक लढवली आहे.

‘वाजपेयी २००४ मध्ये अखेरची लोकसभा निवडणूक लढले आहेत. यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत मतदान केले नाही. यासोबतच वाजपेयी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही मतदान करु शकलेले नाही,’ अशी माहिती शिवकुमार यांनी दिली आहे. ‘वाजपेयी काही वर्षांपासून प्रकृती अस्वस्थामुळे सार्वजनिक जीवनात फारसे सक्रीय नाहीत. यासोबतच वाजपेयी यांचे वय जास्त असल्याने त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो आहे,’ असेही शिवकुमार यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये शनिवारी मतदान होणार आहे. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाजपेयी मतदान करणार नसल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली आहे. ‘लखनऊ महापालिकेच्या कार्यालयातील मतदान केंद्रात वाजपेयी यांचे नाव येते. त्यांचा मतदार ओळखपत्र क्रमांक XGF0929877 आहे,’ असे शिवकुमार यांनी सांगितले आहे.

अटल बिहारी वाजपेयी लखनऊमधून १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये लोकसभेत निवडून गेले होते. यानंतर २००९ मध्ये लालजी टंडन आणि २०१४ मध्ये राजनाथ सिंह यांनी लखनऊ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

‘अटल बिहारी वाजपेयी यंदाच्या निवडणुकीत मतदान करणार नसले तरीही त्यांचा आशीर्वाद कायम आहे. याच आशीर्वादामुळे आम्ही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक जिंकू,’ असा विश्वास भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी म्हटले आहे. आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी देशाचे पहिले गैरकाँग्रेसी पंतप्रधान आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सभेत हिंदीत भाषण करणारे वाजपेयी हे पहिले परराष्ट्रमंत्री आहेत.

First Published on February 17, 2017 6:58 pm

Web Title: former pm atal bihari vajpayee unlikely to cast his vote in up assembly election
  1. No Comments.