News Flash

‘ज्या लोकांना सर्जिकल स्ट्राइकवर संशय आहे त्यांनी हुतात्म्यांच्या कुटुंबियांना भेटावे’

पंतप्रधान यांनी आज जौनपूर येथे प्रचारसभा घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मतदारसंघात आज प्रचार केला. त्यांच्या लोकसभा मतदार संघातील जौनपूर या ठिकाणी त्यांनी आज सभा घेतली. जे लोक सर्जिकल स्ट्राइकवर संशय आहे त्यांनी जौनपूर येथील हुतात्म्यांच्या पत्नीला, मुलांना भेटावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. याआधी ४० वर्षांपासून एक श्रेणी एक निवृत्ती वेतन (ओआरओपी) ही योजना आम्ही लागू केली असे पंतप्रधानांनी म्हटले. ज्यावेळी नोटाबंदीची घोषणा करण्यात आली, तेव्हापासून देशात माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

या लोकांना देशाची चिंता नाही असे पंतप्रधानांनी म्हटले. या लोकांना जनतेची चिंता नाही असे पंतप्रधानांनी म्हटले. ज्या लोकांना नोटाबंदीमुळे त्रास झाला ते सर्व लोक एकत्र झाले आहेत. गेल्या पंधरा वर्षांमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकमेकांविरोधात भांडत आहेत. परंतु या वेळी मात्र ते एकत्र झाले आहेत असे ते म्हटले. या कठीण प्रसंगामध्ये हे दोन्ही शत्रू देखील एकसारखे बोलू लागले असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस पूर्णपणे साफ झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपल्या देशातील लोकांकडे केवळ दोनच डोळे नसतात. महादेवाप्रमाणे त्यांना देखील तिसरे नेत्र असून ते चांगले वाईट सर्व जाणतात असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.मागील सत्तर वर्षांमध्ये भारतीय जनतेकडून जे लुटण्यात आले आहे. ते परत सर्वांना मिळणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ज्या लोकांनी गेली सत्तर वर्षे देशाला लुटण्याचा प्रयत्न केला त्यांना मी कदापिही सोडणार नाही असे ते म्हणाले.

उत्तर प्रदेशामध्ये चोरीचा सुद्धा लिलाव केला जातो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. सध्या परीक्षा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. परीक्षा केंद्रांचा लिलाव होतो हे उत्तर प्रदेशातील शैक्षणिक जीवनाचे हे वास्तव आहे. त्यानंतर मुले नक्कल करतात. अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले तुम्ही तर विदेशात जाऊन शिक्षण घेऊन आलात, तुमची मुलेही खासगी विद्यालयांमध्ये शिकतात परंतु या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे काय हाल होतात याकडे आपण लक्ष दिले आहे का असा सवाल त्यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2017 4:34 pm

Web Title: narendra modi up election 2017 samajwadi party jaunpur rally bjp
Next Stories
1 PM Modi Varanasi road show: चलो काशी; वाराणसीमध्ये मोदींचा मेगा इव्हेंट
2 Uttar pradesh elections 2017: सहाव्या टप्प्यासाठी उत्तर प्रदेशात ५७ टक्के मतदान
3 मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मुक्काम पोस्ट वाराणसी..
Just Now!
X