26 November 2020

News Flash

यादव कुटुंबात सर्व काही ठीक, अखिलेशच होईल पुढचा मुख्यमंत्री- मुलायम सिंह

शिवपाल सिंह नवीन पार्टी स्थापन करणार नाहीत असे ते म्हणाले.

गायत्री यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अत्याचार केला जात आहे. दहशतवाद्यासारखी वागणूक मिळत आहे.

यादव कुटुंबात सर्व काही ठीक असून शिवपाल सिंह यादव हे आपला नवा पक्ष तयार करणार नसल्याचे मुलायम सिंह यादव यांनी स्पष्ट केले आहे. घरामध्ये कुणाचेही मतभेद नाहीत असे ते म्हणाले. याबरोबरच, अखिलेश यादव हेच पुढील मुख्यमंत्री होतील असे देखील ते म्हणाले.  पहिल्या फेरीच्या मतदानाला एक आठवडा बाकी असताना मुलायम सिंह यांनी अखिलेश यादवच्या पाठिशी पूर्णपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर ‘अखिलेश हमारा’ या प्रचारगीतामध्ये अखिलेश यादव म्हणजे ‘नेताजींची’ सावली आहे असे म्हटले आहे.

निवडणुकीनंतर आपण नवीन पक्ष तयार करणार आहोत असे विधान शिवपाल सिंह यांनी केले होते. शिवपाल हे नवा पक्ष स्थापन करणार नाहीत. त्यांना पक्ष स्थापन करण्याची आवश्यकताच काय? असे, मुलायम यांनी म्हटले. शिवपाल हे त्यावेळी रागात असतील असा खुलासा मुलायम सिंह यादव यांनी केला. लवकरच मुलायम सिंह यादव हे देखील पक्षप्रचारात उतरणार आहेत. याआधी काँग्रेससोबत युती केल्यामुळे आपण समाजवादीच्या प्रचारात उतरणार नाहीत असे त्यांनी म्हटले होते. परंतु, आता आपण प्रचार करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेससोबत युती करण्याची काही आवश्यकता नव्हती. समाजवादी पक्ष स्वतःच्या जीवावर निवडून येऊ शकतो असे ते म्हणाले होते. परंतु आता अखिलेश आणि आपल्यात काहीही मतभेद नाहीत असे म्हणत उद्यापासून आपण प्रचार करणार आहोत असे ते म्हणाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 2:49 pm

Web Title: up election 2017 rahul gandhi mulayam singh yadav akhilesh yadav shivpal yadav
Next Stories
1 Uttar pradesh election 2017: स्क्रू टाईट केल्याने विरोधक माझ्यावर चिडले: मोदी
2 सर्वात मोठा रावण दिल्लीत राहतो; आझम खान यांचा मोदींवर निशाणा
3 उत्तर प्रदेशची निवडणूक ही भाजपसाठी ‘स्कॅम’विरोधातील (सपा, काँग्रेस, अखिलेश, मायावती) लढाई- मोदी
Just Now!
X