उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातील मोर्चेबांधणीसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहे. मोदी शनिवारी त्यांच्या मतदारसंघात अर्थात वाराणसीमध्ये दाखल झाले आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाच्या गेटजवळून भव्य रोड शोमध्ये मोदी सहभागी झाले होते. पुढील तीन दिवस मोदी वाराणसीमध्ये मुक्काम करणार आहेत.

शनिवारी सकाळी नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये दाखल झाले. वाराणसीमध्ये दाखल होताच मोदींनी पंडीत मदन मोहन मालवीय यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाच्या गेटपासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. मोदींच्या रोड शोमध्ये रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची अलोट गर्दी झाली होती. खुद्द मोदी येणार असल्याने भाजपनेही हा रोड यशस्वी व्हावा यासाठी अथक मेहनत घेतली होती. रोड शोनंतर मोदींनी काशी विश्वनाथ मंदिर आणि कालभैरव मंदिरात जाऊन पूजाही केली. यानंतर काशी विद्यापीठाच्या मैदानावर त्यांची जंगी सभा होईल.

BJP and TMC
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी अन् भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानावेळी राडा; एकजण गंभीर जखमी
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
nagpur girl injured, generator skin peeled off
धक्कादायक! दहा वर्षीय मुलीचे केस जनरेटरमध्ये अडकून त्वचा सोलली…
Samajwadi Party akhilesh yadav
मुरादाबादमध्ये सपाकडून दोन दिवसांत दोन अर्ज; रामपूरमध्ये उमेदवार जाहीर, आणखी एका दावेदाराने वाढवला तणाव

वाराणसी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. १९९१पासून इथे भाजपचा खासदार आहे. या लोकसभा मतदारसंघात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी शहरात तीन आहेत आणि तिघेही भाजपचे आमदार आहेत. पण उमेदवारीवरून नाराजीचे पडसाद भाजपमध्ये उमटले आहेत. मोदींच्या मतदारसंघात कोणताही धोका न स्वीकारण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. पंतप्रधानांचा आजपासून (शनिवार) जवळपास तीन दिवस मुक्काम असेल. रविवारी मोदी वाराणसीतील टाऊनहॉल मैदानावर दोन हजार विशेष निमंत्रितांशी चर्चा करतील. सोमवारी म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वाराणसीतील रोहानियामध्ये सभा घेऊन प्रचाराची समाप्ती करतील. पण दुसरीकडे वाराणसीमध्ये पराभव चाखायला लावून मोदींचे नाक कापण्यासाठी काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनीही वाराणसीत तळ ठोकला आहे.