News Flash

मोदींनी ‘डीडीएलजे’ दाखवला, प्रत्यक्षात गब्बर आणला: राहुल गांधी

मोदींनी नोटाबंदीच्या माध्यमातून ५० कुटुंबाचे कर्ज माफ केल्याचा आरोप

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी रायबरेलीमध्ये प्रचारसभा घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेले आश्वासन पूर्ण न करणा-या नरेंद्र मोदींवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. मोदींनी २०१४ मध्ये सांगितले अच्छे दिन येतील, सर्वांना डीडीएलजे हा चित्रपटही दाखवला, पण नंतर प्रत्यक्षात त्यांनी गब्बर आणला असा चिमटा त्यांनी काढला आहे.

उततरप्रदेशमधील फत्तेहपूरमध्ये शुक्रवारी राहुल गांधी यांनी प्रचारसभा घेतली. या सभेत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदी फक्त त्यांच्या कामाविषयीच बोलतात. पण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचे संपूर्ण काम त्यांनी स्वतःकडे घेतले आणि आता त्या दोघांकडे काम राहिले नाही असा टोलाही त्यांनी लगावला. फक्त बोलून नातेसंबंध तयार होत नाही, तर ते निभावल्यानेच तयार होतात असेही ते म्हणालेत. रायबरेलीमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत प्रियांका गांधी यादेखील मंचावर होत्या. मोदींनी नोटाबंदीच्या माध्यमातून ५० कुटुंबाचे कर्ज माफ केले. याऊलट त्यांनी सर्वसामान्यांना रांगेत उभे केले असा आरोप त्यांनी केला. वाराणसीमध्ये भोजपूरी फिल्म सिटी तयार करण्याचा आणि गंगा सफाईचे मोदींनी आश्वासन दिले. पण ते अजूनही आश्वासन पूर्ण झालेले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव आणि अखिलेश यादव यांनीदेखील मोदींवर टीकास्त्र सोडले. सत्तेवर आल्यास ते शेतक-यांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. मग त्यांनी ३ वर्षात हे काम का केले नाही असा प्रश्न डिंपल यादव उपस्थित केला. आता मन की बात पुरे त्यांनी काम की बात करावी असे त्यांनी सांगितले.  समाजवादी पक्षाच्या सायकलवर आता काँग्रेसचा हातही आला आहे. त्यामुळे समाजवादीची सायकल जोमात धावणार असे अखिलेश यादव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 4:05 pm

Web Title: uttar pradesh election 2017 rahul gandhi takes jib at narendra modi over achhe din
Next Stories
1 बाहेरून गर्जना; आतून हवालदिल
2 ‘आरएसएस’वाले लग्न का करत नाहीत, ‘कमजोरी’ आहे का?; आझम खान यांची जीभ घसरली
3 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सत्तेची वाट का पाहताय?; राहुल गांधींचा मोदींना सवाल
Just Now!
X